Last Updated:
लोकांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदू खरात शंभर दिवसाहून अधिक दिवस जेलमध्ये असल्याने सध्या चिंतेत असून त्याने मौन धारण केल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक : आपल्याकडे दैवीशक्ती असल्याचे भासवून शेकडो महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप नाशिकच्या अशोक खरातवर आहे. लैंगिक अत्याचार तसेच आर्थिक फसवणूक प्रकरणातील दाखल असलेल्या गुन्ह्यात अशोक खरात चार महिन्यापासून जेलची हवा खात आहे. लोकांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदू खरात शंभर दिवसाहून अधिक दिवस जेलमध्ये असल्याने सध्या चिंतेत असून त्याने मौन धारण केल्याची माहिती समोर आली आहे. एका वर्तमानपत्राला जेलमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खराचा जेलमध्ये मोठा दरारा आहे.
दैवी शक्तीच्या नावाखाली अनेक महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणूक करणारा भोंदूबाबा अशोक खरात सध्या नाशिकमधील नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात आहे. अशोक खरातला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक मिळत आहे. खरात सध्या अंडरट्रायल कैदी आहे. त्याला वेगळ्या बराकीत ठेवले आहे. त्याला कोणतीही व्हीआयपी सुरक्षा दिलेली नाही. अंडरट्रायल कैद्यांच्या सुरक्षेची जबाबदारी तुरुंग प्रशानाची असल्याने त्याला वेगळ्या बराकीत ठेवले आहे. मात्र तिथे त्याला इतर कैद्यांप्रमाणेच वागणूक देत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जेलमध्ये खरातल कोणाची आठवण येते?
गेल्या काही दिवसांपासून अशोक खरातने बोलणे कमी केले असून तो कोणाशीही बोलत नाही. अशोक खरात तुरुंगात असला तरी कुटुंबियांच्या आठवणीने व्याकूळ होतो. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक खरातला सर्वाधिक आठवण त्याची पत्नी कल्पना खरात आणि मुलगा हर्षवर्धन खरात याची येते. एवढच नाही तर त्याने ही गोष्ट तुरुंगातील इतर कैद्यांजवळ बोलून देखील दाखवली आहे. खरातला अटक झाल्यापासून त्याची पत्नी कल्पना खरात एकदाही त्याला भेटायला आलेली नाही. खरातच्या पत्नीला एका प्रकरणात जामीन मिळाला आहे तर दुसऱ्या प्रकराणत पोलीस शोध घेत आहे. खरातच्या वागण्यातून असे दिसून येत आहे की, त्याला कळून चुकले आहे ती आपण लवकर बाहेर येणार नाही.
लैंगिक शोषण आणि आर्थिक गैरव्यवहार
खरातवर सर्वात गंभीर आरोप म्हणजे धार्मिक विधींच्या नावाखाली त्याने केलेले महिलांचे लैंगिक शोषण. अनेक पीडित महिलांनी त्याच्या विरोधात तक्रारी दिल्या असून, ‘आध्यात्मिक शक्ती’ मिळवून देण्याच्या बहाण्याने त्याने महिलांना आपल्या जाळ्यात ओढले होते. याव्यतिरिक्त, त्याने कोट्यवधी रुपयांचे आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही उघड झाले आहे. खरातच्या अटकेनंतर आता अनेक नवीन तक्रारदार समोर येत असून, तपासात आणखी मोठे आणि धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हे ही वाचा :
Mumbai,Maharashtra
