वसई विरारकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आता यापुढे लाईट जाणार नाही, विधानसभेत थेट प्लानच सांगितला | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वसई विरारकरांसाठी मोठी घोषणा केली आहे.त्यामुळे आता यापूढे वसई विरारमध्ये पुर आला तरी लाईट जाणार नाही आहे.त्यामुळे वसई विरार करांना मोठा दिलासा मिळाला आहे.

News18
News18

Vasai Virar Flood : वसई विरारमध्ये तीन दिवसांपूर्वी आलेल्या पुरातून आता कुठे नागरीक सावरले आहेत. सगळ्या गोष्टी पुर्वपदावर यायला हळुहळु सूरूवात झाली आहे. पण सगळं सुरळीत सूरू असताना वसई विरारकरांना दरवर्षी भेडसावणाऱ्या या समस्येच काय? असा प्रश्न स्थानिक उपस्थित करत आहेत. अशात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत वसई विरारकरांसाठी मोठी घोषणा केली आहे.त्यामुळे आता यापूढे वसई विरारमध्ये पुर आला तरी लाईट जाणार नाही आहे.त्यामुळे वसई विरार करांना मोठा दिलासा मिळाला आहे.

खरं तर मागच्या काही दिवसांपूर्वी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वसई विरार 72 तासांसाठी अंधारात गेले होते. त्यामुळे वसई विरारमध्ये ना लाईट होती, ना नेटवर्क होते, ना पाणी ना जेवण अशी परिस्थिती होती. या घटनेमुळे वसई विरारचा मुंबईशी संपर्क तुटला होता. वसई विरारमध्ये विजेचे डीपी जमीनीला लागून असल्याने नाईलास्तव पूरा दरम्यान लाईट बंद ठेवावी लागायची. यामुळे नागरीकांना अनेक दिवस अंधारात राहावे लागायचे. त्यामुळे वसई विरारकरांची या समस्येवर आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना भाष्य केले. यावेळी त्यांनी वसई विरारकरांसाठी मोठी घोषणा केली.

वसई विरारमध्ये आलेल्या पुराने एक गोष्ट लक्षात आली. आतापर्यंत ज्या सखल भागात पाणी भरायचे, त्या भागात देखील आता पाणी भरायला लागले आहे.त्यामुळे आता तिथे आम्ही सगळं पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर (विजेची डीपी) हे उंचीवर तयार करणार आहोत. एक स्टेज बांधायचा आणि त्याच्या उंचीवर पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर (विजेची डीपी) बांधायचे. त्यामुळे आता यावर्षी जेवढा भाग पाण्याखाली होता, त्या सगळ्या भागात आता वरील हे बदल करण्यात येणार आहेत,अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

त्यामुळे आता जर स्टेज बांधून त्यावर डीपी बसवले तर पुराच्या पाण्यात देखील वसई विरारचा वीजपुरवठा खंडीत होणार नाही.त्यामुळे आता वसई विरारची सतत वीज खंडीत होण्यापासून सुटका होणार आहे.त्यामुळे वसई विरारला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

मराठी बातम्या/मुंबई/

वसई विरारकरांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, आता यापुढे लाईट जाणार नाही, विधानसभेत थेट प्लानच सांगितला



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *