Eknath Shinde on Missing Link: आपल्या प्रकल्पांची बदनामी करणं, ही आमची बदनामी नाही, सरकारची बदनामी नाही, मुख्यमंत्र्याची बदनामी नाही. ही आपल्या राज्याची बदनामी आहे. आज या मिसिंग लिंकला पाहण्यासाठी देशातून नाही, विदेशातून लोक येत आहेत आणि म्हणून या ठिकाणी महाराष्ट्राचे शत्रूही करत नसतील एवढी बदनामी आज लोकशाहीमध्ये आपल्या विरोधी पक्षातील सदस्य किंवा सदस्य नसतील, आपले कोणी असतील, नेते असतील ते करत असतील, पण खऱ्या अर्थाने जे लोक महाराष्ट्राच्या प्रकल्पांची बदनामी करता आहेत, त्यांना आपण काय म्हणणार? आता इथं महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये राहून महाराष्ट्राची बदनामी करणारे कोण? महाराष्ट्र द्रोहीच आहेत. हा महाराष्ट्र द्रोहच होऊ शकतो. हे राज्याचे दुश्मन जे आहेत. कुठलाही प्रकल्प आपला जर बदनाम झाला, तर ती महाराष्ट्राची बदनामी होते, कुठल्या पदाधिकाऱ्याची, मुख्यमंत्र्याची नाही, मंत्र्यांची नाही, त्यामुळे शेवटी आपल्याला हे देखील तारतम्य बाळगलं पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत बोलताना दिली.
मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही
विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना शिंदे म्हणाले, मिसिंग लिंक हा इंजिनिअरिंग मार्वल (Engineering Marvel) आहे. मिसिंग लिंकला एकाही पैशाचा धोका झाला नाही, वाहतूक सुरू झाली. काही लोकांनी जे काही आकाश पाताळ एक केलं की मिसिंग लिंक पडला. अरे मिसिंग लिंक पडला का त्याची कमान पडली? किमान याची तरी तपासणी करून माहिती घेऊन तर बोलायला पाहिजे होतं. या प्रकल्पाची किंमत 6,695 कोटी रुपये, प्रत्यक्ष खर्च 7,189 कोटी रुपये, वाढ फक्त 7.26 टक्के झाली. मंजूर रकमेच्या 10 टक्क्यांपेक्षा देखील कमी, ही वस्तुस्थिती असल्याचे ते म्हणाले. या प्रकल्पामुळे मुंबई-पुणे 40 मिनिटांनी अंतर कमी झालं. पुढचं सातारा, तुमचं कोल्हापूर सगळंच पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा गेम चेंजर प्रकल्प आहे. दर दिवशी एक कोटी रुपयांचं इंधन वाचतंय, प्रदूषण वाचतंय, वाहतूक कोंडी वाचते आहे असे शिंदे यांनी सांगितले.
शिंदे पुढे म्हणाले, मागे अटल सेतूच्या बाबतीमध्ये असच केलं, अटल सेतू उखडला, अरे काय होतं, सर्विस अप्रोच रोडला एक भेग पडली होती. आज अटल सेतूवर ३० हजारांपेक्षा जास्त वाहनं ये-जा करतायत. मुंबईत रस्त्यांची एकूण लांबी 2,050 किलोमीटर आहे. मेगा सीसी रोड प्रकल्पांतर्गत आतापर्यंत 575 किलोमीटर काम पूर्ण झालं आहे. हे पूर्ण झाल्यानंतर शहरामध्ये 1,913 किलोमीटर कॉंक्रीटचे रस्ते असतील. कॉंक्रिटीकरणामुळे दरवर्षी खड्डे दुरुस्तीवर होणारा खर्च कमी झाला असल्याचे त्यांनी सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या
Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj