Amitabh Bachchan Shares Health Update: अमिताभ बच्चन यांच्यावर महत्त्वाची शस्त्रक्रिया; स्वतः बिग बींनी दिली हेल्थ अपडेट, म्हणाले, ‘रिकव्हरीचा काळ खूप कठीण…’


Amitabh Bachchan Shares Health Update: बॉलिवूडचे (Bollywood News) शहनशाह म्हणजेच, बिग बी (Big B) यांना रुग्णालयातून डिस्चार्ज (Discharge From Hospital) देण्यात आलाय. त्यांच्यावर एक महत्त्वाची शस्त्रक्रिया पार पडली असून त्यासाठीच ते रुग्णालयात दाखल झालेले, अशी माहिती स्वतः अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी दिलीय. महत्त्वाची बाब म्हणजे, अमिताभ बच्चन यांना शस्त्रक्रियेनंतर (Amitabh Bachchan Surgery) ICU मध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलेलं. आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. रिकव्हरीचा काळ खूप कठीण होता, असं स्वतः अमिताभ बच्चन म्हणाले आहेत. 

अमिताभ बच्चन यांनी अलिकडेच आपल्या ब्लॉगवर स्वतःच्या शस्त्रक्रियेबद्दल आणि रुग्णालयातील वास्तव्याबद्दल माहिती दिली. शस्त्रक्रियेनंतर, रुग्णालयातून घरी परतल्यावर बरं होण्याच्या प्रक्रियेतील आव्हानांवर भाष्य करणारी एक भावूक पोस्ट त्यांनी शेअर केलीय. एका रात्री उशिरा लिहिलेल्या ब्लॉग पोस्टमध्ये, दिग्गज अभिनेत्यानं लिहिलंय की, रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतरचा काळ हा त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासातील सर्वात कठीण टप्पा ठरलाय. अमिताभ बच्चन यांनी शस्त्रक्रियेचं नेमकं स्वरूप उघड केलेलं नाही. ‘बिग बी’ यांनी बरं होण्याच्या प्रक्रियेतील शारीरिक आणि भावनिक अशा दोन्ही पैलूंवर भाष्य केलं आणि खंबीर राहण्याबाबतचा मेसेजही दिलाय.

अमिताब बच्चन यांनी रिकव्हरीबाबत उघडपणे सांगितलं (Amitabh Bachchan On Recovery)

आपल्या लेटेस्ट ब्लॉग पोस्टमध्ये अमिताभ बच्चन यांनी लिहिलंय की, “…रुग्णालयातील शस्त्रक्रिया आणि सक्षम डॉक्टर, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली आयसीयू (ICU) मधील काळ… रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणं… आणि घरी परतणं. घरी परतल्यानंतरचा काळ हा शारीरिक, मानसिक आणि वर्तणुकीच्या दृष्टीनं सर्वात कठीण टप्पा असतो…” अभिनेत्यानं आपल्या शस्त्रक्रियेचं कारण स्पष्ट केलं नसलं तरी, घरी येण्यापूर्वी त्यांना आयसीयूमध्ये राहावं लागलं होतं, असं त्यांनी नमूद केलंय.

“एखाद्या दिवशी, पराभव तुमच्या समोर उभा ठाकतो…” (Amitabh Bachchan On Surgery)

आयुष्यातील आव्हानं किंवा पराभवाचा सामना करण्याबाबत अमिताभ यांनी एक फिलॉसॉफिकल विचारही मांडला. त्यांनी लिहिलंय की, “…तुम्ही एक नावाजलेले विजेते असता आणि एखाद्या दिवशी, पराभव तुमच्या समोर उभा ठाकतो… हा तुमच्या आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा असतो…”

अभिनेत्यानं पुढे म्हटलंय की, काही लोक अशा प्रसंगांतून पुढे जातात, तर काहीजण मात्र भूतकाळातील यशाच्या आठवणींतच अडकून राहतात. “काहीजण धैर्य दाखवतात… तर काहीजण हार मानतात… जे प्रयत्न करतात आणि धैर्य दाखवतात, तेच नेहमी विजेते ठरतात… जे तसे करत नाहीत, ते तडजोड करतात आणि भूतकाळातील वैभवाच्या आठवणींवरच जगत राहतात… हा सर्वस्वी वैयक्तिक निवडीचा प्रश्न आहे…”

“दोन्हीपैकी कशातही काहीच गैर नाही… निरोगी राहा, आनंदी राहा… बस, एवढंच…”

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या आरोग्याबाबत अधिक तपशील दिलेला नसला तरी, चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केलाय. 

बिग बींच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झाल्यास, अमिताभ बच्चन यांना शेवटचं ‘कल्की 2898 एडी: पार्ट 2’ (Kalki 2898 AD: Part 2) मध्ये पाहिलं गेलं होतं. यानंतर ते ‘कौन बनेगा करोडपती 18’ (Kaun Banega Crorepati 18) चे सूत्रसंचालक म्हणून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Riteish Deshmukh, Genelia Deshmukh Supports CJP Student Protest: महाराष्ट्राचे दादा-वहिनी तरुणांसाठी मैदानात, रितेश-जेनेलियाचा आंदोलक विद्यार्थ्यांना उघड पाठिंबा, म्हणाले, ‘चला आपण…’



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *