Last Updated:
विशाखाचे दीड महिन्यापुर्वीच लग्न झाले होते. या लग्नानंतर तिचा छळ सूरू झाला होता, तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते.तसेच तिला शेजाऱ्यांशी बोलण्यास परवानगी नव्हती.या
Ambernath News: अंबरनाथमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एका 26 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विशाखा तिळकर असे या विवाहितेचे नाव आहे. विशाखाचे दीड महिन्यापुर्वीच लग्न झाले होते. या लग्नानंतर तिचा छळ सूरू झाला होता, तिच्यावर पाळत ठेवण्यासाठी घरात सीसीटीव्ही लावण्यात आले होते.तसेच तिला शेजाऱ्यांशी बोलण्यास परवानगी नव्हती.या सगळ्या त्रासाला कंटाळून तिने टोकाचं पाऊल उचललं आहे.या प्रकरणी विशाखाच्या आई वडिलांनी केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विशाखा तिळकर हिने मंगळवारी अंबरनाथ येथील सासरच्या घरात तिने आत्महत्या केली होती. खरं तर विशाखा आणि डॉ. नितीन तिळकर यांचा विवाह 30 एप्रिल रोजी झाला होता. लग्नानंतर सर्व काही सूरळीत चाललं होतं.पण अचानक सासरच्या मंडळीकडून विशाखाचा मानसिक छळ सूरू होता. लग्ना दरम्यान मानपान मिळाला नव्हता.त्यामुळे माहेरून दागिने आणि पैसे घेऊन येण्यासाठी सातत्याने तिच्याजवळ तगादा लावला जात असा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला आहे.
तसेच पतीने घराच्या आत आणि बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते.या कॅमेराच्या माध्यमातून तिच्या हालचालींवर सतत नजर ठेवली जातं होती. शेजाऱ्यांशी साधं बोललं तरी तिची चौकशी केली जात होती. काही वेळा या चौकशीनंतर तिला मारहाणही व्हायची असा आरोप.तसेच विशाखाच्या आत्महत्येच्या दोन दिवसाआधी विशाखाने शेजारी राहणाऱ्या एका महिलेशी संवाद साधला होता. याच कारणावरून तिला मारहाण करण्यात आली होती. यानंतर घरात गळफास घेत विशाखाने आत्महत्या केली होती.
विशेष म्हणजे आत्महत्या करण्यापूर्वी विशाखा हिने आपल्या सोबत घडलेल्या सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला होता. आई-वडील तिला माहेरी आणण्याच्या तयारीत असतानाच विशाखाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली.या प्रकरणी अंबरनाथ शिवाजीनगर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती डॉक्टर नितीन तिळकर, सासू दीर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. डॉक्टर पती नितीन तिळकर याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत.या घटनेने एकच खळबळ माजली आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 18, 2026 11:16 PM IST
Ambernath : शेजाऱ्यांशी बोलायच नाही,घरात CCTV लावले, डॉक्टर पतीच्या छळाला कंटाळून पत्नीचे टोकाचं पाऊल
