चिकन शोरमा, पिझ्झा खाल्यामुळे एकाच वेळी 14 जणांना विषबाधा, भिवंडीत उडाली खळबळ | मुंबई बातम्या (Mumbai News)


Last Updated:

आज सकाळपासूनच काही जणांना अस्वस्थ वाटू लागलं. दुपारपर्यंत त्रास वाढल्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

News18
News18

भिवंडी : भिवंडीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.  चिकन शोरमा, पिझ्झा खाल्ल्याने 14 जणांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील ६ आणि इतर ग्राहक मिळून अशा १४ जणांना विषबाधा झाली आहे. सर्व रुग्णांना तातडीने  उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  भिवंडी शहरातील खंडूपाडा परिसरात ही घटना घडली आहे. चिकन शोरमा, पिझ्झा आणि फालुदा खाल्ल्यानंतर एका कुटुंबातील 6  जण  इतर असे एकूण 14 जणांना अचानक अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.    संबंधित नागरिकांनी शहरातील खंडू पाडा परिसरात एका फेमस शोरमा नावाच्या दुकानात आले होते.

चिकन शोरमा, पिझ्झा खरेदी करून बुधवारी रात्री घरी नेऊन खाल्लं होतं. त्यानंतर आज सकाळपासूनच काही जणांना अस्वस्थ वाटू लागलं. दुपारपर्यंत त्रास वाढल्यानंतर सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. विषबाधा झालेल्या व्यक्तींना उलट्या, पोटदुखी, मळमळ, जुलाब आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणं जाणवू लागली होती. रुग्णांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी प्राथमिक अंदाजानुसार अन्नातून विषबाधा झाल्याचं सांगितलं आहे. या घटनेतील रुग्णांमध्ये 6 पुरुष, 6 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे.

घटनेची माहिती मिळताच  शांतीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

बिर्याणी आणि कलिंगड खाल्यामुळे ४ जणांचा मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच मुंबईमध्ये बिर्याणी आणि कलिंगड खाल्ल्यामुळे पायधुनी परिसरात ४ जणांचा मृत्यू झाला होता. एका कुटुंबातील ४ जणांच्या मृत्यूमुळे देशभरात खळबळ उडाली होती. रात्रीच्या जेवणानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे झालेल्या विषबाधेतून एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश होता. अंधेरीतील मोबाईल ॲक्सेसरीज व्यावसायिक अब्दुल्ला डकोडिया (४४), त्यांच्या पत्नी नसरीन (३५) आणि दोन मुली आयशा (१६) आणि झैनब (१२) अशी मृतांची नावं होती.  या प्रकरणी फॉरेन्सिक आणि पोस्टमार्टमचे वेगवेगळे रिपोर्ट समोर आले होते. यामध्ये कलिंगडमध्ये विषबाधेमुळे मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *