आदिनाथ आणि उर्मिला यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत घटस्फोटाची माहिती दिली आहे. त्यांनी लेक जिजासाठी कायम एकत्र येणार असल्याचे देखील म्हटले आहे. “जोडीदार म्हणून आमचा प्रवास इथे संपत असला, तरी आमची मुलगी जिज़ा हिच्यासाठी आम्ही नेहमी एकत्र आहोत. ती आमचं सर्वस्व आहे. तिला भरपूर प्रेम, सुरक्षितता आणि पाठिंबा मिळावा, यासाठी आम्ही आनंदाने आणि पूर्ण जबाबदारीने एकत्र येऊन तिचे संगोपन (Co-parenting) करत आहोत” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.