Savitribai Jyotirao Phule Promo: ‘मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले’ मालिकेची गेल्या काही दिवसांपासून मोठी आहे. स्टार प्रवाहवर सुरु असणारी ही मालिका TRP चे कारण देत बंद करण्यात आली. अतिशय महत्वाच्या टप्प्यावर मालिका बंद झाल्यामुळे अभिनेते अमोल कोल्हे यांच्यासह चाहत्यांचा मोठं हिरमोड झाला होता. पण, अभिनेते अमोल कोल्हे यांनी ही गोष्ट ‘मराठी वारसा’ या यूट्यूब चनेलवर प्रसारित करण्याचा निर्णय घेतलाय. 20 जूनपासून ही मालिका प्रेक्षकांना थेट युट्यूबवर पाहता येणार आहे.दरम्यान, या मालिकेचा नवा कोरा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला आहे. मराठी मनोरंजनसृष्टीत पहिल्यांदाच हा प्रयोग केला जाणार आहे. वाहिनीने बंद केलेली मालिका पुन्हा एकदा नव्याने यूट्यूब चॅनलवर येणार असल्याने प्रेक्षकांमध्ये कुतूहल आहे.
काय दाखवलंय प्रोमोमध्ये?
गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचा अधिकृत प्रोमो ‘मराठी वारसा’ या यूट्यूब channelवर प्रदर्शित झाला आहे. स्टार प्रवाह वरील या मालिकेला महाराष्ट्रातील लाखो प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिल. आता पुन्हा एकदा ही प्रेरणादायी गोष्ट नव्या पर्वासह प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेचा पहिला एपिसोड 20 जून 2016 रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता शिक्षकांना पाहता येईल. दरम्यान क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचा संघर्ष, त्याग, शिक्षणासाठीची लढाई आणि सामाजिक क्रांतीचा इतिहास आता नव्या जोमाने अनुभवता येणार आहे. नव्या मालिकेच्या प्रोमोमुळे सध्या प्रेक्षकांमध्ये कुतूहल वाढलं आहे.
या प्रोमोमध्ये ‘ महात्मा गांधींचा जयघोष सुरू असतो. त्याचवेळी ते डॉक्टर आंबेडकर आले का? असं विचारतात. येरवडा जेलमध्ये महात्मा गांधींना भेटायला आंबेडकर येतात. ‘ हरिजनांविषयी माझ्या मनात किती प्रेम आहे हे तुम्हाला माहित आहे डॉक्टर आंबेडकर.’ असं म्हणतात डॉक्टर आंबेडकर म्हणतात ‘ अस्पृश्यांना हरिजन नाव दिले म्हणजे त्यांचे परिस्थिती बदलणार नाही मिस्टर गांधी. असं म्हणतात त्यांच्या बाजूला उभा असलेला व्यक्ती मिस्टर गांधी नाही, महात्मा गांधी. आपल्या देशाचे एकमेव महात्मा आहेत ते..डॉ.आंबेडकरांना सांगतात. त्यावेळी पण आता ही विलंब न करता ‘माझ्यासाठी महात्मा तो,ज्याने स्त्रीला शिक्षणाचा हक्क दिला, सामाजिक आणि धार्मिक बाबीतील मानवनिर्मित अनिष्ट प्रथा, रुढी, बंधने नष्ट करण्यासाठी गुलामगिरीवर पहिला घाव घातला.ज्याला जनसामान्यांनी महात्मा ही पदवी दिली तोच . क्रांतीच्या क्षितिजा वरती उभा राहिलेला क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले. ‘ हीच महत्त्वाची होती महात्म्याची सावली. सावित्री माऊली.. ‘ शांतनाचा हा प्रमुख सध्या शेअर करण्यात आला आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष