Actress Anu Aggarwal Struggle Life: फक्त तीनच महिन्यांत फळफळलं नशीब, 90 च्या दशकांत रातोंरात प्रसिद्धीचं शिखर गाठलं, तिनं करिष्मा कपूरपासून, रवीना टंडनपर्यंत सर्वांनाच मागे टाकलं, आता कुठे गायब झालीय ‘आशिकी गर्ल’?


Actress Anu Aggarwal Struggle Life: सिनेसृष्टीत (Film Industry) काही कलाकार असे असतात, जे काहीच ठरवून येत नाहीत, ज्यांचा इथला प्रवास कोणत्याही प्लानिंगचा भाग नसतो. नशिब त्यांना अशा वाटेवर घेऊन जातं, ज्याची त्यांनी कधी कल्पनाही केलेली नसते. 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री अनु अग्रवाल (Actress Anu Aggarwal) यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या आयुष्यातील असाच एक अनुभव शेअर केलाय. सिनेमांमध्ये येणं हा तिनं ठरवलेला निर्णय नव्हताच, तर तो एक योगायोग होता, असं तिनं सांगितलंय. 

अनु अग्रवाल (Anu Aggarwal) यांनी काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर एक फोटो कोलाज पोस्ट केला असून त्यात त्या त्यांचा को-स्टार राहुल रॉय यांच्यासोबत दिसत आहेत. या फोटोंसोबतच त्यांनी आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील आणि ‘आशिकी’ सिनेमाशी (Aashiqui Cinema) संबंधित आठवणी सविस्तरपणे मांडल्या. सिनेसृष्टीत प्रवेश करण्याचा कोणताही विचार त्यांनी केला नव्हता, उलट ही संधी स्वतःहून त्यांच्यापर्यंत आली होती, असं त्यांनी नमूद केलं.

सिनेमांत येण्याचा अजिबातच विचार नव्हता (Actress Anu Aggarwal Life Story)

आपल्या पोस्टमध्ये अनु अग्रवाल म्हणाल्या की, “लोकांना वाटतं तसं माझं सिनेसृष्टीत आगमन झालं नव्हतं. मागे वळून पाहताना जाणवतं की, सिनेमांमध्ये काम करण्याचा माझा कधीच प्लॅन नव्हता. त्या काळात मी भारतातील माझं काम पूर्ण करून पुन्हा पॅरिसला परतण्याच्या तयारीत होते. मी मॉडेलिंग करत होते आणि त्याच क्षेत्रात पुढे जाण्याची माझी इच्छा होती. मात्र, याच दरम्यान मला अचानक ‘आशिकी’ सिनेमाची ऑफर मिळाली. हा माझ्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला, ज्यानं माझ्या संपूर्ण आयुष्याची दिशा बदलून टाकली…”

‘आशिकी गर्ल’चं रातोंरात बदललं आयुष्य

अनु अग्रवाल यांनी पुढे सांगितलं की, “या सिनेमाच्या छोट्याशा शूटिंग शेड्यूलसाठी मी होकार दिला होता. काही महिने सिनेमाचं शुटिंग करायचं आणि त्यानंतर पुन्हा माझ्या जुन्या कामाकडे परतायचं, हे मी ठरवून ठेवलेलं. माझं नियोजन केवळ तीन महिन्यांचंच होतं. मात्र, माझं नशीब माझ्यासाठी काहीतरी वेगळंच लिहित होतं…”

‘आशिकी’ प्रदर्शित होताच अनु अग्रवाल रातोंरात प्रसिद्धीच्या झोतात आल्या. हा सिनेमा त्या काळातील सर्वाधिक यशस्वी सिनेमांपैकी एक ठरला. सिनेमांतील गाणीही प्रेक्षकांच्या मनात घर करून गेली. या सिनेमाचं संगीत नदीम-श्रवण यांनी दिलं होतं. आपल्या पोस्टमध्ये अनु यांनी म्हटलंय की, “या एका सिनेमानं माझं संपूर्ण आयुष्य एका रात्रीत बदलून टाकलं. माध्यमांनी मला अशी अभिनेत्री म्हणून ओळख दिली, जी स्वतः सिनेमांकडे गेली नाही, तर सिनेमेच तिच्याकडे आले…”

‘आशिकी’ सिनेमाबाबत थोडसं… 

‘आशिकी’ या सिनेमाच्या कथेबद्दल सांगायचं झाल्यास, ही कथा एका तरुणाची आहे, जो गायक बनण्याचं स्वप्न पाहत असतो. त्याची एका तरुणीसोबत अचानक भेट होते आणि तो तिच्या प्रेमात पडतो. मात्र, त्यांच्या नात्यात अनेक अडचणी आणि आव्हानं निर्माण होतात. या संकटांचा सामना करताना त्यांच्या प्रेमाची कसोटी लागते. हृदयस्पर्शी कथा आणि मधुर संगीतामुळे ‘आशिकी’ हा सिनेमा आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहणार आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Actor Girish Karnad Life Story: वडील डॉक्टर, आई नर्स, पण मुलाला इंग्लंडला जाऊन बनायचं होतं कवी; नशीबानं बनवलं सुपरस्टार, सलमान खानच्या सिनेमात साकारलेला ‘बॉस’

ABP माझाच्या बातम्या LIVE… 

आणखी वाचा





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *