*ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 मे 2026 | बुधवार*
*1*. नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी अपडेट, GOD म्हणून नंबर सेव्ह केलेल्या तेजस शाहसह डॉ. मनोज शिरूरेला अटक, आतापर्यंत 13 जणांना बेड्या https://tinyurl.com/5btmphca नीट पेपरफुटीप्रकरणी डॉ. मनोज शिरूरेला पाच दिवसांची सीबीआय कोठडी, आरोपी प्रल्हाद कुलकर्णी, शिवराज मोटेगावकरची न्यायालयीन कोठडीत रवानगी https://tinyurl.com/y2jvzw87
*2*. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नेते दिल्लीत, तिन्ही पक्षांच्या प्रमुखांची अमित शाहांसोबत बैठक, मात्र विधान परिषदेच्या जागावाटपाचा निर्णय मुंबईतच होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांची प्रतिक्रिया, सर्व जागा वाटप जवळपास निश्चित, केवळ दोन जागांवर चर्चा सुरू असल्याची माहिती https://youtu.be/vbaWvuaLdt0 महाविकास आघाडी विधान परिषदेच्या सर्व 17 जागा लढवणार, जागावाटपही जवळपास निश्चित झाल्याची माहिती https://tinyurl.com/32jp9u5n
*3*. रायगडमध्ये विधान परिषदेसाठी मोठी राजकीय डील, अनिकेत तटकरेंचा रस्ता मोकळा करण्याच्या मोबदल्यात भरत गोगावलेंनी पालकमंत्रिपद मागितल्याची चर्चा https://tinyurl.com/27hc9mzh शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं ठरलं, भाजपमध्ये प्रवेशाची तारीख फिक्स, विधानपरिषदेची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा https://tinyurl.com/432x3y9b
*4*. एसआयआरबाबत सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल, मतदार यादी पुनर्रचना मोहीम वैध असल्याचा निर्वाळा, निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे समर्थन https://tinyurl.com/48vk9db6 पंढरपूर वारी अन् अतिवृष्टीच्या कालावधीत SIR नको, लाखो वारकऱ्यांची नावे वगळली जाण्याची शक्यता, काँग्रेसचे राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र https://tinyurl.com/yf893s55
*5*. पुण्यात दारूच्या नशेत पोर्शे कार भरधाव वेगाने चालवत दोघांचा जीव घेतलेल्या धनिकपुत्राचा बाप विशाल अग्रवालला जामीन मिळाल्यानंतर सेलिब्रेशन, तुरुंगातून सुटताच पार्टी, व्हिडीओ व्हायरल https://tinyurl.com/2dnb4ej2 दोघांचा जीव घेऊन सेलिब्रेशन करतोय, विशाल अग्रवालचा जामीन रद्द करा, पोर्शे कार अपघातातील मृत मुलीच्या वडिलांचा संताप https://tinyurl.com/y2pt447b
*6*. अंतर्गत धुसफुसीनंतर सुनेत्रा पवार निवडणूक आयोगाला राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीची सुधारित यादी पाठवणार, तीन नवख्या नेत्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता https://tinyurl.com/2rmw5uuh अधिवेशनानंतर सात दिवसात अर्थखातं राष्ट्रवादीला देण्याचं ठरलं होतं, मात्र दोन महिन्यानंतरही निर्णय नाही, आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवारांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांची माहिती https://tinyurl.com/4pj558hz विशेष मतदार यादी पुर्ननिरीक्षण मोहीम ही एका विशिष्ट पक्षाच्या फायद्याची, त्यामुळे आपल्याला मिळणारी पारंपरिक मतं कमी करण्याचा डाव, राष्ट्रवादीच्या बैठकीत छगन भुजबळांची चिंता https://tinyurl.com/msw8htkb
*7*. जनगणना करणाऱ्या चार शिक्षकांचा मृत्यू, कोल्हापूर, सांगोला आणि लातूर जिल्ह्यातील शिक्षकाच्या मृत्यूनंतर शिक्षक संघटना संतप्त, मृतांच्या वारसांना 10 लाख रुपयांची मदत आणि अनुकंपाखाली नोकरी देण्याची संघटनेची मागणी https://tinyurl.com/46bj7zbe
*8*. गोकुळ दुधाच्या उत्पादनांना आखाती देशांमध्ये मोठी मागणी, त्यामुळे 2018 मध्येच हलाल प्रमाणपत्र काढल्याचं समोर, विरोधकांकडे मुद्दे नसल्याने असे तथ्यहिन आरोप केले जात असल्याचा मंत्री हसन मुश्रीफ यांचा आरोप https://tinyurl.com/3648cn87
*9*. कर्नाटकात मुख्यमंत्री बदल निश्चित, सिद्धारमय्या राजीनामा देणार तर डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री बनणार, लिंगायत, दलित, OBC आणि अल्पसंख्यांक असे तब्बल 4 उपमुख्यमंत्रीही दिमतीला https://tinyurl.com/36abmjfu केरळचे माजी मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या घरी ईडीचे छापे, विजयन यांच्या कार्यकर्त्यांनी ईडी अधिकाऱ्यांची गाडी फोडली https://tinyurl.com/yd8vyn6j
*10*. आयपीएलमध्ये आज सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्या रंगणार एलिमिनेटर सामना, पराभूत संघ स्पर्धेबाहेर जाणार https://tinyurl.com/3mw4hnju फक्त मार्च-मे नव्हे तर आता 2 फेजमध्ये रंगणार IPL थरार, दिवाळीच्या मोसमातही होणार सामने, बीसीसीआयचा मास्टर प्लॅन तयार https://tinyurl.com/57xkdxau
*एबीपी माझा Whatsapp Channel : https://whatsapp.com/channel/0029Va9dq2u6buMTUrb4GM0w*
आणखी वाचा