Pm Modi: महत्त्वाचे निर्णय होणार, पंतप्रधान मोदींनी बोलावली ‘हाय लेव्हल’ची बैठक | राष्ट्रीय बातम्या


Last Updated:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सेवा तीर्थ इथं सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांसोबत ही उच्चस्तरीय बैठक होत आहे.

News18
News18

नवी दिल्ली :  देशाच्या प्रशासनिक आणि धोरणात्मक दिशेसाठी महत्त्वाची मानली जाणारी बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवास्थानी बोलावली आहे.   आज सेवा तीर्थ इथं ही महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला केंद्रीय मंत्री आणि सचिवांची उपस्थिती आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सेवा तीर्थ इथं सर्व केंद्रीय मंत्रालयांच्या सचिवांसोबत ही उच्चस्तरीय बैठक होत आहे. बैठकीपूर्वी विविध मंत्रालयांचे सचिव सेवा तीर्थ येथे दाखल झाले आहे. प्रशासन, विकासकामे आणि आगामी धोरणात्मक विषयांवर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसंच या बैठकीत विविध धोरणात्मक निर्णय, प्रलंबित प्रस्ताव आणि महत्त्वाच्या प्रशासकीय विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीकडे राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(सविस्तर बातमी लवकरच )

मराठी बातम्या/देश/

Pm Modi: महत्त्वाचे निर्णय होणार, पंतप्रधान मोदींनी बोलावली ‘हाय लेव्हल’ची बैठक



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *