Zee Marathis Popular Serials: झी मराठीवरील 3 मालिकांमध्ये जबरदस्त ट्विस्ट; ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ अन् ‘तारिणी’त रंगणार नवा थरार


Major Twist in Zee Marathi Serials:  घराघरात कोणतीही मालिका असो, आवडीने पाहिले जाते. मालिकेत पुढे काय होणार? याची उत्सुकता प्रत्येक प्रेक्षकाला असते. प्रत्येक आठवड्यात कथा नव्या वळणावर येते.  त्यातूनच प्रेक्षकांसाठी अनेक भावनिक, थरारक आणि अनपेक्षित क्षण घेऊन येते. या आठवड्यात झी मराठी वाहिनीवर ‘सनई चौघडे’ , ‘कमळी’ आणि ‘ तारिणी’ या मालिकांमध्ये महत्त्वाचे प्रसंग   पाहायला मिळणार आहे.  नेमके कोणते महत्त्वाचे प्रसंग असणार? जाणून घेऊयात.

झी मराठीवर हा आठवडा ठरणार पॉवर पॅक (Zee Marathi Powerpack Serials)

सनई चौघडे

झी मराठीवरील ‘सनई चौघडे’ या मालिकेला प्रेक्षकांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून येत आहे.  या मालिकेत आता नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. पार्टीमध्ये जयची खोटी गर्लफ्रेंड बनण्याच्या प्रसंगामुळे शरू आणि जयमध्ये तणाव निर्माण होतो. शरू आणि जयमध्ये निर्माण झालेला तणाव एका अनपेक्षित घटनेनंतर बदलताना दिसणार आहे. पण अचानक आलेल्या अनपेक्षित वळणामध्ये जय शरूचा जीव वाचवणार आहे. त्यानंतर दोघांमधील नात्यात जवळीक निर्माण होईल का? हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. सरीकडे, लग्नाला विरोध करणारा जय, गौतम आणि असावरीच्या पाठीशी उभा राहत अंधश्रद्धेलाही न जुमानता त्यांना साथ देणार आहे. तसेच वटपौर्णिमेचा विशेष भागही मालिकेत साजरा होणार आहे. 

कमळी

कमळी या मालिकेत सरोजवर गोळीबार होतो. या धक्कादायक घटनेनंतर कमळी सरोजचे अंतिम संस्कार पार पाडते. तसेच सरोजच्या मृत्यूमागचे सत्य शोधण्याची शपथ घेते. त्यासाठी ती मुंबईकडे रवाना होते. या प्रवासात ती केवळ सत्याचा शोध घेणार नाही, तर स्वतःच्या भूतकाळाशीही सामना करणार आहे. अनेक अनोळखी धागे उलगडत असताना कमळीसमोर नवी आव्हाने उभी राहणार  आहेत. दरम्यान, कमळीच्या आयुष्यातील महत्त्वाचे सत्य समोर येण्याची चाहूल या आठवड्यात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

तारिणी

केदारने घटस्फोटाच्या कागदांवर केलेल्या सहीमुळे तारिणी आणि केदारच्या नात्यात गैरसमज निर्माण होतो. मात्र याच दरम्यान केदार आपल्या मनातील प्रेमाची कबुली देत तारिणीला प्रोपोज करतो. दुसरीकडे, तारिणी गुलाबची सखोल चौकशी करत असताना तिचे वरिष्ठ सर यांची बदली होते. त्यांच्या जागी नव्या अधिकाऱ्याची नियुक्ती झाल्याचं कळणार आहे. या बदलांमुळे तपासाला नवे वळण मिळणार असून, तारिणीसमोर अनेक नवे चॅलेंजेस  उभी राहणार आहेत.

हा पावरपॅक आठवडा पाहायला विसरु नका, ‘सनई चौघडे’ दररोज रात्री 8:30 वाजता, ‘कमळी’ दररोज रात्री  9 वाजता, आणि ‘तारिणी’ दररोज रात्री 9:30 वाजता फक्त आपल्या झी मराठी वाहिनीवर.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

‘ईठा’ सिनेमात ‘द केरळ स्टोरी 2’ फेम अभिनेत्रीची एन्ट्री; श्रद्धा कपूरसोबत नृत्याचा जलवा दाखवणार, कोण आहे ती?



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *