Rahu Transit: व्यक्तीच्या आयुष्यात जेव्हा अचानक मागोमाग वाईट घटना घडू लागतात, तेव्हा राहू मागे लागला की काय? असे आपोआप तोडांतून येते. वैदिक ज्योतिषशास्त्रात राहू हा प्रत्यक्ष ग्रह नसून एक छायाग्रह मानला जातो. तो महत्त्वाकांक्षा, भौतिक सुख, अचानक घडणाऱ्या घटना, परदेश, तंत्रज्ञान, राजकारण, प्रसिद्धी, भ्रम आणि मायाजाल यांचा कारक मानला जातो. जन्मकुंडलीत राहूची स्थिती व्यक्तीच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींवर प्रभाव टाकते. ज्योतिषशास्त्रानुसार, राहूचा नक्षत्र बदल हा एक अत्यंत महत्त्वाचा खगोलीय घटनाक्रम मानला जातो. राहू ला कलयुग चा राजा म्हणतात. ज्योतिषींच्या मते, राहू 30 जून 2026 रोजी कुंभ राशीत भ्रमण करत असताना धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. राहूच्या या नक्षत्र बदलाचा सर्व 12 राशींवर वेगवेगळा प्रभाव दिसून येईल.
राहू-मंगळ – 2 भिन्न ऊर्जांचा मिलाफ, अंगारक योग आव्हानं घेऊन येणार? (Rahu Transit 2026)
ज्योतिषशास्त्रानुसार, धनिष्ठा नक्षत्राचा स्वामी मंगळ (Mars) आहे. जेव्हा राहू मंगळाच्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा या दोन भिन्न ऊर्जांचा मिलाफ होतो. यामुळे ‘अंगारक योगासमान’ प्रबळ आणि उग्र स्थिती निर्माण होते. हा काळ अतिशय गतिमान, काहीसा आव्हानात्मक आणि व्यक्तीला अत्यंत महत्त्वाकांक्षी बनवणारा मानला जातो.
मेष : तुमच्या साहस आणि पराक्रमात मोठी वाढ होईल. रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील आणि कामाच्या ठिकाणी तुम्हाला योग्य ते श्रेय मिळेल. मात्र, मोठी आर्थिक गुंतवणूक करताना घाई करू नका आणि आरोग्याची काळजी घ्या.
वृषभ : नोकरी आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ अत्यंत सकारात्मक राहील. प्रशासकीय, सरकारी किंवा व्यवस्थापन क्षेत्रात असणाऱ्यांना पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती आणि समाजात मान-सन्मान वाढेल.
मिथुन : प्रलंबित असलेली करिअरची स्वप्ने पूर्ण होण्यास सुरुवात होईल. उच्च शिक्षण, परदेश प्रवास आणि डिजिटल माध्यमांशी संबंधित कामांमध्ये मोठे यश मिळण्याची शक्यता आहे. भाग्याची साथ मिळेल.
कर्क : या काळात तुम्हाला अचानक काही मोठे बदल अनुभवायला मिळू शकतात. शेअर बाजार किंवा इतर कोणत्याही जोखमीच्या ठिकाणी गुंतवणूक करणे टाळा. आरोग्याच्या बाबतीत, विशेषतः पोटाच्या विकारांबाबत कोणताही निष्काळजीपणा करू नका.
सिंह : विरोधक आणि शत्रू सक्रिय राहतील, परंतु ते तुमचे काहीही बिघडू शकणार नाहीत. कोर्ट-कचेरी आणि कायदेशीर बाबींमध्ये निकाल तुमच्या बाजूने लागण्याची शक्यता आहे. मात्र, वैवाहिक जीवनात सामंजस्य टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.
कन्या : करिअर आणि व्यापारासाठी हा काळ वरदानासारखा असेल. अचानक धनलाभ होण्याचे योग आहेत आणि दीर्घकाळापासून रखडलेली पदोन्नती मिळू शकते. परंतु, अति-महत्त्वाकांक्षी होऊन चुकीच्या मार्गाने काम करण्याचे टाळा.
तूळ : तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. कौटुंबिक तणाव हळूहळू कमी होईल आणि घरात सुख-शांतीचे वातावरण राहील. विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल राहील.
वृश्चिक : मालमत्ता आणि घराशी संबंधित कामांमध्ये प्रगती होईल. हा काळ करिअरसाठी चांगला असला तरी, मंगळ-राहूच्या एकत्रित प्रभावामुळे तुमच्यातील राग आणि आक्रमकता वाढू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक आहे.
धनु : तुम्ही अधिक धाडसी निर्णय घ्याल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मात्र, कोणत्याही कायदेशीर किंवा महत्त्वाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना सर्व बाजू नीट तपासून पाहणे गरजेचे आहे.
मकर : बँक बॅलन्स आणि आर्थिक बचतीकडे अधिक लक्ष देण्याची गरज भासेल. या काळात तुमच्या बोलण्यातून गैरसमज निर्माण होऊ शकतात, त्यामुळे कुटुंबात आणि कार्यस्थळी संवाद साधताना शब्दांचा वापर अतिशय जपून करा.
कुंभ : राहू याच राशीत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्त्वात आणि विचारसरणीत मोठे बदल घडतील. दीर्घकालीन योजनांना यश मिळेल, परंतु मानसिक ताणतणाव आणि द्विधा मनःस्थिती टाळण्यासाठी ध्यान धारणा करावी.
मीन : या काळात तुमचे खर्च अचानक वाढू शकतात. परदेशाशी संबंधित कामांमध्ये किंवा प्रवासात वाढ होण्याची शक्यता आहे. मानसिक शांती टिकवण्यासाठी अध्यात्म किंवा धार्मिक कार्याचा आधार घेणे फायदेशीर ठरेल.
-डॉ भूषण ज्योतिर्विद
हेही वाचा :
July 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या राशी सज्ज व्हा! जुलै महिन्यात मोठा यू-टर्न, 4 राशी श्रीमंतीच्या मार्गावर..मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?