Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: ‘ती’ तीन नावं चर्चेत ठेवून एकनाथ शिंदेंनी सगळ्यांना गाफील ठेवलं अन् ठाकरेंचा विश्वासू मोहरा फोडला, सचिन अहिर शिंदे गटात


Sachin Ahir joins Eknath Shinde Shivsena: उद्धव ठाकरे यांचा पक्ष ऑपरेशन टायगरच्या धक्क्यातून सावरत नाही तोच एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी ठाकरे गटाला (Uddhav Thackeray Camp) आणखी एक जबर धक्का दिला. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरे गटाचे विधान परिषदेचे आमदार सचिन अहिर यांना गळाला लावले आहे. सचिन अहिर (Sachin Ahir) शिंदे गटात जाणार असल्याची बातमी शेवटपर्यंत गुप्त ठेवण्यात आली. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार हे तिघेही विधानपरिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाकडून अर्ज भरायला पोहोचले तेव्हा या सगळ्याचा उलगडा झाला. सचिन अहिर शिंदे गटाकडून अर्ज भरतानाचा फोटो समोर आल्यानंतर सुरुवातीला अनेकांना यावर विश्वास बसला नाही. मात्र, थोड्याचवेळात सचिन अहिर हे ठाकरे गटातून फुटून शिंदे गटात गेल्याचे कळताच एकच भूकंप झाला.

एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन सचिन अहिरबाबत अगदी कोणालाही थांगपत्ता लागून दिला नाही. त्यासाठी कालपासून शिंदे गटातून विधान परिषदेच्टया उपसभापती पदासाठी पद्धतशीरपणे तीन नावं चर्चेत ठेवण्यात आली. यामध्ये नीलम गोऱ्हे, चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांचा समावेश होता. यापैकी चंद्रकांत रघुवंशी आणि कृपाल तुमाने यांची नावं समोर आल्यानंतर अनेकजण बुचकाळ्यात पडले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी पद्धतशीरपणे वातावरणनिर्मिती केली. चंद्रकांत रघुवंशी हे उपसभापती व्हावेत यासाठी उत्तर महाराष्ट्रातील 9 आमदारांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र दिले होते. अमोल पाटील, गोकुळ गिते, सत्यजीत तांबे, आमशा पाडवी, किशोर पाटील, चंद्रकांत सोनावणे, चंद्रकांत पाटील , मंजूळा गावात, तुळशीराम गावीत यांनी चंद्रकांत रघुवंशी यांना उपसभापतीपद दिलं जावं, अशी मागणी केली होती. यामुळे सगळ्यांचे लक्ष या तीन जणांकडे लागले होते. तेवढ्यात एकनाथ शिंदे यांनी सचिन अहिर यांना आपल्यासोबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे नेऊन थेट त्यांचा उमेदवारी अर्ज भरून टाकला. यानंतर ठाकरे गटाला सचिन अहिर फुटल्याचे लक्षात आले.

ठाकरेंचे आधीच सहा खासदार गेले आहे. विधानसभेतील ठाकरेंचे आमदार आहेत, तेदेखील एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यातच आता सचिन अहिर हे शिंदे गटाच्या गळाला लागल्याने उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांच्या विजयात महत्त्वाची भूमिका असणारे सचिन अहिर शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे आगामी काळ आदित्य ठाकरे यांच्यासाठी कठीण असेल. वरळी मतदारसंघात ग्राऊंड लेव्हलची कार्यकर्त्यांची फळी सचिन अहिर यांच्या माध्यमातून काम करते. या भागात सचिन अहिर यांचा गेल्या अनेक वर्षांपासून दबदबा आहे. त्यामुळे वरळी आणि दक्षिण मुंबईत शिंदे गटाची ताकद आगामी काळात वाढणार आहे. 

आणखी वाचा

मोठी बातमी : एकनाथ शिंदेंचा सर्वात मोठा धक्का, सचिन अहिर यांचा शिंदेंच्या शिवसेनेकडून उपसभापती पदासाठी अर्ज!

 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *