Amarnath Yatra: शिवभक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे…बाबा बर्फानींच्या भक्तांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे… कारण अमरनाथ यात्रेला जुलै महिन्यात सुरूवात होतेय. खरं सांगायचं झालं तर, अमरनाथ यात्रा अत्यंत कठीण आणि खडतर मानली जाते, तरीही दरवर्षी मोठ्या संख्येने लोक बाबा बर्फानींना भेट देण्यासाठी येतात. जाणून घेऊया की अमरनाथ यात्रा जुलैमध्ये कधीपासून सुरू होतेय? या यात्रेबाबत संपूर्ण माहिती…
अमरनाथ यात्रा कधीपासून सुरू होतेय? (Amarnath Yatra)
धार्मिक मान्यतेनुसार, बाबा बर्फानींच्या केवळ एका दर्शनाने भक्तांची सर्व दुःखे दूर होतात. बाबा बर्फानींचे दर्शन घेतल्याने हजार पटींचे पुण्य मिळते. अमरनाथची यात्रा खरं तर अत्यंत खडतर मानली जाते, परंतु तरीही दरवर्षी मोठ्या संख्येने लोक बाबा बर्फानींना भेट देण्यासाठी येतात. गेल्या काही महिन्यांपासून ही यात्रा स्थगित करण्यात आली होती, मात्र आता हीच यात्रा 3 जुलै 2026 रोजी सुरू होणार आहे. या दिवशी भाविक बाबा बर्फानींच्या दर्शनासाठी आपला प्रवास सुरू करतील.
अमरनाथ गुहेची आख्यायिका जाणून घ्या…
अमरनाथ येथील पवित्र गुहाबद्दल सांगायचं झालं तर हे शिवलिंग गुहेच्या वरच्या भागातून ठिबकणाऱ्या पाण्याच्या थेंबांपासून तयार झाले आहे. धार्मिक मान्यतेनुसार, हे शिवलिंग चंद्राच्या कलांनुसार क्षीण होत जाते. बर्फापासून बनलेल्या या शिवलिंगामुळेच त्याला “बाबा बर्फानी” म्हटले जाते. पौराणिक श्रद्धेनुसार, महर्षी भृगू यांनी सर्वप्रथम अमरनाथ गुहेला भेट दिली होती. असे म्हटले जाते की, जेव्हा काश्मीर खोरे पाण्याखाली बुडाले होते, तेव्हा महर्षी कश्यपांनी नद्या आणि ओढ्यांच्या माध्यमातून ते पाणी काढून टाकले. त्याच काळात, महर्षी भृगू ध्यानासाठी एकांत स्थळाच्या शोधात हिमालयाच्या यात्रेवर असताना त्याच मार्गाने प्रवास करत होते. त्यानंतर त्यांनी बाबा अमरनाथांच्या पवित्र गुहेला भेट दिली. असे म्हटले जाते की यानंतरच अमरनाथ यात्रा सुरू झाली.
अमरनाथ यात्रेबद्दल महत्त्वाची माहिती
- अमरनाथ यात्रेसाठी वयोमर्यादा 13 ते 70 वर्षे आहे. फक्त याच वयोगटातील व्यक्ती Shri Amarnath Ji Shrine Board वर नोंदणी करू शकतात.
- यात्रेदरम्यान, यात्रा नोंदणी पावती अनिवार्य, आरोग्य प्रमाणपत्र (CHC), आधार कार्ड किंवा इतर कोणतेही वैध छायाचित्र असलेले ओळखपत्र सोबत ठेवा.
- अमरनाथ यात्रेदरम्यान, टॉर्च, अतिरिक्त बॅटरी किंवा पॉवर बँक, मोबाईल चार्जर, सनग्लासेस, सनस्क्रीन, लिप बाम, सुका मेवा, एनर्जी बार, ग्लुकोज आणि पाण्याची बाटली सोबत ठेवा.
- उंच ठिकाणी ऑक्सिजनची पातळी कमी असते, त्यामुळे घाई करू नका. श्वास घेण्यास त्रास झाल्यास, चक्कर आल्यास किंवा छातीत दुखल्यास, त्वरित वैद्यकीय मदत घ्या.
- यात्रेत चुकूनही खूप जड सामान, महागडे दागिने, अतिरिक्त रोख रक्कम आणि मद्य, तंबाखू, अमली पदार्थ घेऊन जाऊ नका..
हेही वाचा :
July 2026 Monthly Horoscope: मेष, वृषभ, मिथुन राशींसाठी जुलै महिना नशीब पालटणारा! पैसा, नोकरीत मोठ्ठी संधी, धनलाभाचे योग, मासिक राशीभविष्य
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
Zero Hour : नसरापुरातील प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा, निकालानं गुन्हेगारांवर वचक बसेल असं वाटतं का?