Bollywood Movie Story: वडिलांनी फक्त 3 शब्द उच्चारले, लेकानं धडाधड 3 सिनेमे बनवून टाकले; सर्वच्या सर्व ठरले सुपरहिट, तुम्ही पाहिलेत का?


Bollywood Movie Story: बॉलिवूडमध्ये (Bollywood News) अनेक सिनेमे येतात अन् जातात… काहींची खूप चर्चा होते, प्रेक्षक अक्षरशः सिनेमाला डोक्यावर घेतात, पण काही सिनेमे येतात कधी अन् पडद्याआड जातात कधी हेसुद्धा कळत नाही. पण, यातही काही सिनेमे असे असतात, जे येऊन कित्येक वर्ष लोटली, तरीसुद्धा  प्रेक्षक त्यांच्यावर प्रेम करत राहतात.  जेव्हा हे सिनेमे टीव्हीवर लागतात, तेव्हा लोक रिमोट बाजूला ठेवायलाही विसरून जातात. ‘हम आपके हैं कौन..!’, ‘हम साथ-साथ हैं’ आणि ‘विवाह’ ही अशा सिनेमांची उत्तम उदाहरणं आहेत. विशेष म्हणजे, या तिन्ही सिनेमांमागची मूळ संकल्पना एका वडिलांची होती. राजश्री प्रॉडक्शन्सचे राजकुमार बडजात्या (Raj Kumar Barjatya) यांनी त्यांचे सुपुत्र सूरज बडजात्या (Sooraj Barjatya) यांना कुटुंब, नातेसंबंध आणि एकत्र असण्यातील जिव्हाळा या विषयांवर सिनेमा बनवण्याचा सल्ला दिलेला. आपल्या वडिलांचा सल्ला सूरज बडजात्या यांनी मनापासून स्वीकारला आणि अशा सिनेमांची निर्मिती केली, ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं एक खास स्थान निर्माण केलं. या सिनेमांमध्ये ना धडाकेबाज ॲक्शन होती, ना कोणताही मोठा भपकेबाज देखावा, तरीसुद्धा हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येनं थिएटर्सकडे आकर्षित झाले. 

‘हम आपके हैं कौन’नं प्रेक्षकांच्या मनात मिळवलं हक्काचं स्थान (Hum Aapke Hain Koun Movie)

1994 मध्ये रिलीज झालेल्या ‘हम आपके हैं कौन’ सिनेमानं लोकांना कुटुंबासोबत फिल्म पाहण्याचा आनंद दिला. लग्न सोहळा, त्यानंतर हसत्या खेळत्या कुटुंबातील गंमती जमती, प्रेम आणि नात्यांतील आदर हे सर्व काही एका सिनेमात भरभरुन होतं. या फिल्ममधलं प्रत्येक पात्र लोकांना आपलसं वाटलं. सलमान खान आणि माधुरी दीक्षितच्या जोडीनं तर या सिनेमात धुमाकूळच घातलेला. या सिनेमातल्या गाण्यांपासून डायलॉग्जपर्यंत प्रत्येक गोष्ट आजही सर्वांच्या लक्षात आहे. आजही अनेक लग्नसमारंभांमध्ये या फिल्मची गाणी लावली जातात. महत्त्वाची बाब म्हणजे, असं म्हटलं जातं की, लग्न सोहळ्यांमधील नवरदेवाचे बुट चोरण्याची जी प्रथा आहे, ती या सिनेमापासूनच सुरू झालीय. 

कौटुंबिक मूल्यांची ताकद दर्शवणारा ‘हम साथ-साथ हैं’ (Hum Saath – Saath Hain Movie)

‘हम आपके हैं कौन..!’ च्या यशानंतर, सूरज बडजात्या एका नव्या कथेवर काम करत होते, तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना कुटुंबावर आधारित कथा साकारण्याचा सल्ला दिला. यातूनच ‘हम साथ-साथ हैं’ सिनेमा पडद्यावर आला. या सिनेमात अनेक बड्या सेलिब्रिटींची मांदियाळी होती, या सिनेमाचा खरा ‘हिरो’ कोण असेल तर याची कथा. भावंडांमधील प्रेम, पालक-मुलांमधील नातं आणि कौटुंबिक जिव्हाळा यांचं चित्रण प्रेक्षकांच्या मनाला भावलं. परिणामी, प्रदर्शित होताच या सिनेमानं प्रचंड लोकप्रियता मिळवली.

‘विवाह’ सिनेमाची स्क्रिप्ट एका बातमीवरून सुचली (Shahid Kapoor Amrita Rao Movie Vivah)

‘मैं प्रेम की दिवानी हूँ’ हा सिनेमा अपेक्षेप्रमाणे यशस्वी न झाल्यामुळे सूरज बडजात्या काहीसे निराश झालेले. अशा काळात, त्यांच्या वडिलांनी त्यांना एका जुन्या वर्तमानपत्रातील बातमी दाखवली, ज्यातून ‘विवाह’ सिनेमाच्या स्क्रिप्टची निर्मिती झाली. शाहीद कपूर आणि अमृता राव यांची साधी पण मनाला भिडणारी प्रेमकथा प्रेक्षकांना इतकी आवडली की, हा सिनेमा दीर्घकाळ चर्चेत राहिला. यातली गाणी आणि पात्र आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.

तीन सिनेमे, एकच फॉर्म्युला आणि अमाप प्रेम…

या तीनही सिनेमांचा प्राण म्हणजे, त्यांच्यातला साधेपणा. त्यातील कुटुंब, प्रेम, आदर आणि नातेसंबंधांचं चित्रण प्रेक्षकांच्या मनाला खोलवर भिडलं. कदाचित म्हणूनच, इतक्या वर्षांनंतरही, मूळ प्रेक्षकांप्रमाणेच नव्या पिढीलाही हे सिनेमे तितकेच प्रिय आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bollywood Actress Life Story: कधीकाळी बॉलिवूड गाजवलं, पण लग्नानंतर सगळं सोडून संसाराला लागली; आज 120 कोटींच्या साम्राज्याची मालकीण, 700 लोकांना दिलाय रोजगार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *