Calcium : खास महिलांसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी लक्षात ठेवा कॅल्शियमयुक्त पदार्थ, आहाराची घ्या योग्य काळजी | लाइफस्टाईल बातम्या


Last Updated:

आपलं शरीर कॅल्शियम तयार करत नसल्यामुळे, कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी महिलांनी याचा आपल्या आहारात सुधारणा करणं आवश्यक आहे. मेयो क्लिनिकनुसार, एकोणीस ते पन्नास या वयोगटातील लोकांना दररोज 1,000 मिग्रॅ कॅल्शियमची आवश्यकता असते. यापेक्षा जास्त वय असलेल्यांना 1,000 ते 1,200 मिग्रॅ कॅल्शियमची गरज असते.

News18
News18

मुंबई : महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाची माहिती. महिलांसाठीच नाही तर सर्वांसाठीच कॅल्शियम महत्त्वाचं आहे, पण महिलांसाठी ते विशेष महत्त्वाचं का आहे, त्यासाठी काय करायला हवं समजून घ्या.

हाडांच्या मजबुतीसाठी आणि निरोगी शरीरासाठी कॅल्शियम हे आवश्यक खनिज आहे. महिलांना कॅल्शियमच्या कमतरतेचा सर्वाधिक धोका असतो. स्तनपान, रजोनिवृत्तीसारखे हार्मोनल बदल, व्हिटॅमिन डीची कमतरता आणि अयोग्य आहार ही महिलांमधे कॅल्शियमची कमतरता निर्माण करणाऱ्या अनेक कारणांपैकी काही आहेत. आहाराची योग्य काळजी घेऊन ही समस्या दूर केली जाऊ शकते.

आपलं शरीर कॅल्शियम तयार करत नसल्यामुळे, कॅल्शियमच्या कमतरतेवर मात करण्यासाठी महिलांनी याचा आपल्या आहारात सुधारणा करणं आवश्यक आहे. मेयो क्लिनिकनुसार, एकोणीस ते पन्नास या वयोगटातील लोकांना दररोज 1,000 मिग्रॅ कॅल्शियमची आवश्यकता असते. यापेक्षा जास्त वय असलेल्यांना 1,000 ते 1,200 मिग्रॅ कॅल्शियमची गरज असते.

दुग्धजन्य पदार्थ – रोजच्या आहारात एक ग्लास फुल-क्रीम दूध, एक वाटी दही किंवा एक कप पनीरचा समावेश करा. हे सर्व कॅल्शियमचे उत्तम स्रोत आहेत.

हिरव्या पालेभाज्या – हिरव्या पालेभाज्या भारतीय स्वयंपाकघरात शिजतातच, त्यात वैविध्य आणण्यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्यांचा सॅलड, सूपमधे समावेश करता येऊ शकतो. हिरव्या पालेभाज्यांमधे कॅल्शियम तर असतंच तसंच लोह आणि फायबरसारखे अनेक पोषक घटकही भरपूर प्रमाणात असतात.

बिया – सीड्स – सीड्स म्हणजेच विविध बियांमधे, कॅल्शियम, प्रथिनं आणि आरोग्यदायी चरबी असते. यांपैकी, तीळ आणि चिया सीड्स विशेष फायदेशीर आहेत.

अंजीर – दुधात अंजीर घालून पिणं देखील फायदेशीर ठरू शकतं. अंजीरातून कॅल्शियम, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन के मिळतं. सॅलडमधे आणि नाश्त्याच्या वेळीही अंजीर हा चांगला पर्याय आहे.

सोया उत्पादनं – कॅल्शियम असलेले टोफू आणि सोयाबीनदेखील बाजारात उपलब्ध आहेत, त्यांचा देखील आपल्या आहारात समावेश केला जाऊ शकतो.

व्हिटॅमिन डी युक्त पदार्थ – केवळ आहारात कॅल्शियमयुक्त पदार्थांचा समावेश करणं पुरेसं नाही. व्हिटॅमिन डी देखील आवश्यक आहे. यामुळे शरीराला कॅल्शियम शोषून घेण्यास मदत होते.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/

Calcium : खास महिलांसाठी, हाडांच्या मजबुतीसाठी लक्षात ठेवा कॅल्शियमयुक्त पदार्थ, आहाराची घ्या योग्य काळजी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *