पुणे : महाराष्टाला हादरवून सोडणाऱ्या लोहगड केतन अग्रवाल (Ketan agrawal) मृत्यूप्रकरणी त्याची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन यास पोलिसांनी अटक केली असून त्यांना देण्यात आलेली पोलीस कोठडी आज संपत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आरोपी सिया आणि चेतनला न्यायालयात (Court) हजर करण्यात आलं होतं. याप्रकरणी, आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात बाजू मांडताना तपास पूर्ण झाल्याने अधिकच्या पोलीस कोठडीची गरज नसल्याचे म्हटले. तर, केतन अग्रवाल कुटुंबीयांच्यावतीने आणि सरकारी वकिलांनी तपासातील काही बाबी शिल्लक असल्याचा युक्तिवाद करत पोलीस कोठडी वाढवण्याची मागणी केली होती. त्यानुसार, दोन्ही आरोपींना 3 जुलैपर्यंत पोलीस (Pune) कोठडी सुनावण्यात आली आहे.
आरोपींनी कट रचला असल्याचं निष्पन्न झालं आहे, मात्र गुन्हा कसा केला याचा तपास करायचा आहे. कट कुठं बसून केला हे तपासायचे आहे. सियाप्रमाणे चेतनला घेऊन रिक्रियेशन करायचं आहे. लोहगडावर अनेकांशी संवाद साधला आहे, बालीला प्री वेडिंग शूटला जायचं नव्हतं म्हणून, पासपोर्ट फाडले, तो केतनचा पासपोर्ट शोधायचे आहे. लोहगडावर जाऊन रेकी केली का? हे तपासायचे आहे? या कटात कोणी सहभागी आहे का? केतनचा मोबाईल काही वेळाने देण्यात आला, त्यातील माहिती रिकव्हर करायची आहे, त्यांनी माहिती लपवली आहे, ती मिळवायची आहे. तसेच, चेतनचे कपडे हस्तगत करायचे आहेत, त्यामुळे आरोपींना सात दिवसांची पीसी मिळावी, अशी मागणी पोलिसांच्यावतीने करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने 5 दिवसांची पीसी दिली.
दरम्यान, आरोपींना केलेली अटक इलिगल आहे, आमचा अर्ज दाखल करून घ्या, अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी सुरुवातील न्यायालयात केली. याप्रकरणी तांत्रिक तपास, चौकशी, नाट्य रूपांतर झालं. आता पुढचा तपास तांत्रिक आहे, मग पीसीची गरज वाटत नाही, असा युक्तिवाद सियाच्या वकिलांनी केला होता. नाट्य रूपांतर करायची मागणी केली जातीये, हे आपल्या देशात झालेलं नाही. दरीत पडून मृत्यू झालाय, पण इथं हत्या झाली म्हटलं जातंय. आई-वडील म्हणतायेत म्हणून याला हत्या म्हणता येणार नाही. हा गुन्हा बेलेबल आहे? त्यामुळे पीसी देऊ नये, असेही सियाचे वकील विपुल दुष्यम यांनी म्हटले.
चेतनच्या वकिलांचा युक्तिवाद
एफआयआरमध्ये फक्त दोनवेळा चेतनचे नाव आहे, ती सारखं चेतनचे नाव घेते आणि शेवटी चेतनसोबत सियाने कट रचला, मग संपलं. पंचनामा, जप्ती, समोर बसून चौकशी करणे यासाठी 7 दिवस पोलीस कोठडी आधीचं दिली आहे. लोहगडावर आधी सियाचं नाट्यरूपांतर केलं आणि चेतनचे नाट्य रूपांतर करायचं आहे. पॅन्ट जप्त करायची आहे? हुडी, मोबाईल, गाडी जप्त केली, तेंव्हा पॅन्ट जप्त का केली नाही?, असा सवाल चेतनच्या वकिलांनी उपस्थित केला. मोबाईल फोन सियाकडे होता, मग यासाठी चेतनच्या कस्टडीचा काय संबंध? आम्ही सराव केला होता? ते घटनास्थळी जाऊन पाहायचं आहे, मग सात दिवसांत का गेला नाही? कायतरी दाखवायचं म्हणून दोन कारणं दाखवून कस्टडी वाढवून मागायची. गेट येनेलिसिस करायचं हे सात दिवस सुचलं नाही? आता हे काय याचं स्पष्टीकरण द्यावं. आम्ही गाडी स्वतः आणून दिली, पॅन्ट मागितली असती तर ती पण आणून दिली असती. आम्हाला तर सर्व मिडियाकडून कळतंय, असे म्हणत चेतनला पीसी देऊ नये, अशी मागणी चेतनच्या वकिलांनी न्यायालयात केली होती.
सरकारी वकील
चेतन आणि सिया दोघे मित्र आहेत, हे सिद्ध झालं. घटनेच्या आधीचं सीसीटीव्ही जप्त केलंय. त्यामध्ये एकत्र बसून बोलतायेत. 31 मे, 4 आणि 14 जून यावेळी पण लोहगडावर जाऊन हत्या करण्याचा कट झाला होता. त्याचं प्लॅनिंग कुठं झालं हे तपासायचे आहे. चेतनने तिकीट काढलं नाही? कामगार नीरजचा फोन घेऊन गेला? बरं तो लोहगडावर त्यावेळी का आला? म्हणजे कट रचलेला आहे. तपास योग्य दिशेने झालेला आहे. पुढेही तपास होणं गरजेचं आहे. सियानंतर चेतनचे रिक्रियेशन करणे गरजेचे आहे, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली.
चेतनचे वकिल म्हणाले, मीडिया ट्रायल थांबवावं
पंकज बन्सल यांचं जजमेंट आहे, भारतात नॉन बेलेबल ऑफेन्समध्ये अटक व्हायला नको, असं नाही चालत. तुमचं नाव आहे आणि तुम्ही घेऊन गेला. ग्राउंड ऑफ अरेस्ट आणि रिझन्स ऑफ अरेस्ट यात फरक आहे. सियाच्या अटकेच्या कारणांमध्ये 1 ते 5 लिहिलेलं आहे. (ते वाचून वेळ वाया घालवत नाही, हायलाईट्स केलंय, ते आपण पहा). ग्राउंड ऑफ अरेस्ट पर्सनाईज डॉक्युमेंट आहे. चेतनच्या अटकेतील 1 ते 3 कारणं अगदी तशीच आहेत. निमित भुता प्रकरणाचा दाखला देत, ही अटक कशी चुकीची आहे, हे पटवून देण्याचा प्रयत्न चेतनच्या वकिलांनी केला. आता रिमांड वाढवण्यासाठी जे कारण दिलंय, यात कारण एकचं आहे, त्याचे चार भाग देण्यात आलेत. आधीची सात दिवस कोठडी यासाठीचं घेतली होती. सध्या मीडिया ट्रायल सुरुये, या मीडिया ट्रायल थांबवायला सांगणं गरजेचं आहे. कोर्टाच्या आधी माहिती मिडियाकडे कशी काय जाते? आता मीडियाने सगळं दाखवलं म्हणजे, तपास तर पूर्ण झालाय, असेही वकिल विपुल दुशंत यांनी म्हटले.
हेही वाचा
Anandache Paan : ‘खोचक रेषा’ या पुस्तकाच्या निमित्ताने लेखक अभिमन्यू कुलकर्णी यांच्यासोबत गप्पा