आता वराती मागून घोडे फिरतायेत, मी त्यांना चांगलच कामाला लावलंय, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल 


Eknath Shinde on Uddhav Thackeray :  आम्ही टीम म्हणून काम करत आहोत, आमचा अजेंडा हा खुर्ची नाही तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देणे हा असल्याचे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. काही लोक पहिले घरात देखील भेटत नव्हते, ते आता लोकांच्या दारात जात आहेत, त्यांना मी चांगलंच कामाला लावलं आहे. आता वराती मागून घोडे फिरतायेत, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर टीका केली. ते आपल्याला बेईमान बोलतात, हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी कोणी केली. देवेंद्रजींसोबत बेईमान कोणी केली? देवेंद्रजींबद्दल हे आता बोलतायेत, पण त्यांना खोटं अडकवण्याच काम यांनीच केलं, बंगल्यावर पोलीस यांनीच पाठवले. ही आता शिवसेना राहिली नसून शिव्यांची सेना झाली असल्याची टीका एकनाथ शिंदेंनी केली. 

शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात होते, तेव्हा हे घरात होते

शेतकरी, वारकरी, कार्यकर्ते संकटात होते, तेव्हा हे घरात होते. आता हे वरात काढून फिरत आहेत असे टीका एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. ज्या पद्धतीने महाराष्ट्रात शिवसेना पुढे जात आहे, काही लोक म्हणतं होते की, ही शिवसेना फक्त ठाण्यापूर्ती आहे, निकाल बघा आपला पक्ष दुसऱ्या नंबरचा पक्ष आता झाला आहे.  हे भाषा आधी करायचे एक तर तू राहशील नाही तर मी राहील, त्यांना आता पुतणा मावशीच प्रेम आलंआहे.  देवेंद्रजी आणि मी खंबीरपणे उभा आहे, बाकी मेळाव्यात मी समाचार घेईलच असे एकनाथ शिंदे न्हणाले. 

मी आणि देवेंद्रजींनी राज्याला गती देण्याचं काम केलं

खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच अभिनंदन आणि स्वागत आहे.  6 खासदारांनी बाळासाहेब ठाकरे आणि दिघे साहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन प्रवेश केला आहे.  आज नांदेडमधील पदाधिकाऱ्यांचा आणि मातंग समाजाच्या कार्यकर्त्यांचा प्रवेश होत आहे. ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत देखील आपलं पॅनल बहुमताने निवडून आलं त्यांच  देखील अभिनंदन करतो. शिवसेना सर्वसामान्य लोकांच्या पाठीशी उभी आहे असे एकनाथ शिंदे म्हणाले. तुम्ही ज्या भावना व्यक्त केल्या आपल्या समाजासाठी तर अण्णाभाऊ साठे यांच काम महाराष्ट्राने पाहिलं आहे. म्हणून मी मुख्यमंत्री असताना आरटीई स्थापन केली. मी आणि देवेंद्रजींनी राज्याला गती देण्याचं काम केलं नंतर अजित दादा सोबत आले. तुमच्या भावना समाजाला न्याय देण्यासाठी आहेत. लवकर आपण एक बैठक घेऊ, त्यात सकारात्मक चर्चा होईल असे एकनाथ शिंदे म्हणाले. आम्ही टीम म्हणून काम करतोय, आमचा अजंडा खुर्ची नाही तर सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण आहे.  अमेझॉन इंडिया ने ठाणे शहरात 80 मोबाईन व्हॅनच्या माध्यमातून आश्रय केंद्र उभी करण्याच्या निर्णय घेतला आहे.  याचा फायदा सर्व डिलिव्हरी बॉय यांना होणार आहे. त्यांच्यासाठी विश्रांतीसाठी ही व्हॅन आहे,त्यांना मोबाईल चार्जिंगची सुविधा यात उपलब्ध आहे,सर्व डिलिव्हरी बॉयच्या आरोग्याची काळजी या व्हॅन मधून घेतली जाणार आहे. सीपीआर या व्हॅन मध्ये असणार आहे, सीएसआर मधुन याचा खर्च केला जाणार आहे. खासदार वाघचौरे यांच्या माध्यमातून आपण शिर्डी येथे भव्य मेळावा आपण करणार आहोत, हा मेळावा मोठा असणार आहे असे शिंदे म्हणाले. 



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *