Horoscope Today 30 June 2026: जून महिन्याचा शेवटचा दिवस 6 राशींचं नशीब पालटणारा! ग्रहांचे शुभ योग, बाप्पा कृपेने कोण भाग्यशाली? आजचे राशीभविष्य…


Horoscope Today 30 June 2026: वैदिक पंचांगानुसार, आज 30 जून 2026, आजचा वार मंगळवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, आज जूनचा शेवटचा दिवस अनेक राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. कारण आजच्या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. बाप्पाच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.

मेष रास (Aries Horoscope Today)

मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कुटुंबामधील दोन पिढ्यांतील अंतर जाणवल्याशिवाय राहणार नाही, वैचारिक तफावत निर्माण होऊ शकते 
  

वृषभ रास (Taurus Horoscope Today)

वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस घरातील मोठ्या माणसांचे आरोग्य सांभाळा, वैवाहिक जीवनात संसारिक कटकटीला सामोरे जावे लागेल 
 

मिथुन रास (Gemini Horoscope Today)

मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय नोकरीमध्ये नवीन कल्पना प्रत्यक्षात उतरवाल, धाडसी कल्पनांचे चांगले वाईट प्रतिसादही मिळतील 
 

कर्क रास (Cancer Horoscope Today)

कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस तुम्ही केलेल्या कामाचे स्वागत होईल, न कंटाळता न थकता खूप काम कराल 
 

सिंह रास (Leo Horoscope Today)

सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राजकारणातील लोकांना सत्तेसाठी आपला जम बसवण्याची चांगली संधी चालून येईल 
 

कन्या रास (Virgo Horoscope Today)

कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस जनमानसामध्ये स्वतःची प्रतिमा ठसवण्याचे काम तुमच्याकडून चांगले होईल 
 

तूळ रास (Libra Horoscope Today)

तूळ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कोणत्याही प्रसंगाला न घाबरता, जशास तसे धोरण ठेवून काम पुढे न्याल, महिला तडफदार बनतील 
 

वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी काम करताना वातावरणातील मरगळ थोडीशी जाणवणार आहे 
 

धनु रास (Saggitarius Horoscope Today)

धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काम करण्यामध्ये कमतरता करणार नसलात, तरी उत्साह मात्र कमी राहील. 
 

मकर रास (Capricorn Horoscope Today)

मकर राशीच्या लोकांसाठी आज तज्ज्ञांच्या सल्ल्याने एखादी आर्थिक गुंतवणूक करायला हरकत नाही, व्यवसायात जादा भांडवलाची गरज भासेल 
 

कुंभ रास (Aquarius Horoscope Today)

कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस ज्यांना त्वचारोगाचे विकार आहेत, त्यांनी डॉक्टरी इलाज आणि पथ्य पाणी सांभाळावे 
 

मीन रास (Pisces Horoscope Today)

मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस महिलांनी कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नये, नाहीतर तब्येत बिघडण्याची शक्यता राहील 

हेही वाचा :

Weekly Horoscope: तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींपैकी 5 राशींचा भाग्योदय! आजपासून नवा आठवडा सुरू, पैसा, नोकरी, प्रेम..साप्ताहिक राशीभविष्य

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *