Last Updated:
“विकास भागीदारी ही भारत-सेशेल्स संबंधांची एक महत्त्वाची ओळख आहे. भारताने नेहमीच सेशेल्सच्या प्राधान्यक्रमांना, गरजांना आणि आकांक्षांना केंद्रस्थानी ठेवून सहकार्य केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिंद महासागरातील छोट्या द्वीप देश सेशेल्सच्या दौऱ्यावर आहे. यावेळी, ‘आपली भागीदारी कोणत्याही देशाच्या आकारावरून ठरत नाही, तर परस्पर सन्मान, विश्वास आणि समान हितावर आधारित असतो.’ असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेशेल्स दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी संबोधन केलं, “आमचे स्नेहपूर्ण स्वागत आणि आदरातिथ्यासाठी मी राष्ट्रपती एर्मिनी यांचे हार्दिक आभार मानतो. त्यांच्याकडून गार्डियन ऑफ द ब्लू होरायझन या पुरस्काराने सन्मानित होणे हा माझ्यासाठी आणि 140 कोटी भारतीयांसाठी अत्यंत आनंदाचा विषय आहे. या सन्मानाचा मी विनम्रतेनं स्विकार करत असताना तो त्या सर्व देशांना समर्पित करत आहे जे हवामान बदलाच्या आव्हानाशी लढत आहेत. त्याचप्रमाणे पर्यावरण संरक्षणाला भावी पिढ्यांप्रति आपली जबाबदारी मानत आहेत” असं म्हणत पंतप्रधान मोदींनी राष्ट्रपती एर्मिनी यांचे आभार मानले.
“माझा हा दौरा अशा ऐतिहासिक वेळेस होत आहे, जेव्हा सेशेल्स आपल्या स्वातंत्र्याची पन्नास वर्षे पूर्ण करत आहे आणि भारत आणि सेशेल्स यांच्या राजकीय संबंधांना देखील पन्नास वर्ष होत आहेत. या पन्नास वर्षाच्या प्रवासात आम्ही मैत्रीला विश्वासात, विश्वासाला सहकार्यात आणि सहकार्याला जन कल्याणामध्ये बदलले आहे. हिंदी महासागराने शतकानुशतके भारत आणि सेशेल्स यांच्यातील संबंध जोपासले आहेत. त्याच्या लाटांनी आमच्यामधील व्यापार, संस्कृती आणि मानवी संबंधांना सातत्याने पोसले आहे. आमच्या यावर विश्वास आहे की, हिंदी महासागर हे आमचे एकत्रित घर आहे. त्याची सुरक्षा, टिकाऊपणा आणि समृद्धता ही आमची सामायिक जबाबदारी आहे. हीच भावना आमच्या महासागर या दृष्टीकोनाचाही आधार आहे.” असंही यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले.
“या वर्षी फेब्रुवारीमध्ये अध्यक्षांनी आपल्या भारत दौऱ्यामध्ये जारी केलेल्या एका संयुक्त व्हिजनमधून आमच्या भविष्यातील भागीदारीचा आराखडा तयार करण्यात आला होता. यावर पुढे वाटचाल करताना आमचे परस्पर सहकार्य अधिक मजबूत होणार आहे. आज आम्ही आमच्या आर्थिक सहकार्याला अधिक मजबूत आणि भविष्यवेधी करण्यावर चर्चा केली आहे. आम्ही दोन्ही देशांसाठी उद्योगांच्या नव्या संधींचा शोध सुरुच ठेवणार आहोत” असं आश्वासनही मोदींनी दिलं.
“भारत आणि सेशेल्स यांच्यातील संपर्क सुविधा सुधारण्यासाठी देखील काम केले जाईल. यामुळे दोन्ही देशांतील व्यापाराला चालना मिळेलच, शिवाय पूर्व आफ्रिका आणि हिंदी महासागर क्षेत्राशी असलेले संबंधही अधिक दृढ होतील. डिजिटल तंत्रज्ञान हे दोन्ही देशांतील भौगोलिक अंतर कमी करण्याचे प्रभावी माध्यम आहे, असा आमचा विश्वास आहे. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील भारताचा यशस्वी अनुभव आम्ही सेशेल्ससोबत सामायिक करू. तसंच, सेशेलमध्ये यूपीआय सुरू करण्यासाठी आज सामंजस्य करार करण्यात येत असल्याचा मला आनंद आहे” असंही मोदी म्हणाले.
“विकास भागीदारी ही भारत-सेशेल्स संबंधांची एक महत्त्वाची ओळख आहे. भारताने नेहमीच सेशेल्सच्या प्राधान्यक्रमांना, गरजांना आणि आकांक्षांना केंद्रस्थानी ठेवून सहकार्य केले आहे. राष्ट्राध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान आम्ही 175 दशलक्ष अमेरिकन डॉलरच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली होती. या अंतर्गत सामाजिक गृहनिर्माण, वाहतूक, कौशल्य विकास, अन्नसुरक्षा, शिक्षण आणि संरक्षण अशा विविध क्षेत्रांमध्ये काम सुरू आहे. सेशेल्समधील मानवी संसाधन विकासाला सहकार्य करणे ही भारताची विशेष प्राथमिकता राहिली आहे. सेशेल्समधील नागरी सेवकांच्या प्रशिक्षणात भारत योगदान देत असल्याचा मला आनंद आहे. आज प्रोफेशनल अँड टेक्निकल सेंटरच्या आभासी भूमिपूजनाचाही कार्यक्रम होत आहे. हे केंद्र भविष्यात सेशेल्सच्या युवकांच्या कौशल्य, रोजगाराच्या संधी आणि आत्मविश्वासाला नवी उंची देईल, असा आमचा विश्वास आहे” असंही पंतप्रधान म्हणाले.
PM Modi Seychelles Visit: ‘आपली भागीदारीही देशाच्या आकारावून ठरत नाही,’ PM मोदींचं सेशेल्सच्या संसदेत भाषण
