Shahid Kapoors Cocktail box office collection Day 9: शाहीद कपूर (Shahid Kapoor), कृति सेनन आणि रश्मिका मंदाना स्टारर, ‘कॉकटेल 2’ (Cocktail 2) सिनेमानं बॉक्स ऑफिसवर (Box Office Collection) धुमाकूळ घातला. 19 जून रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. प्रदर्शित होताच या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर आपली पकड मजबूत केली आहे. दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटल्यानंतर या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत घट झाली आहे. तर, दुसरीकडे अक्षय कुमार स्टारर ‘वेलकम टू द जंगल’ या सिनेमाला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे ‘कॉकटेल 2’ या सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कमाईत घट झाली असल्याचं बोललं जात आहे.
9व्या दिवशी ‘कॉकटेल 2’ या सिनेमानं किती कोटींचे कलेक्शन केले? (Shahid Kapoors Cocktail box office collection Saturday)
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, ”कॉकटेल 2′ या सिनेमानं शनिवारी 4.25 कोटींचे कलेक्शन केले आहे. या सिनेमाचे भारतात एकूण 3,946 शोज पार पडले होते. या सिनेमानं 9 दिवसांत भारतात एकूण 78.75 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तर, वर्ल्डवाईड या सिनेमानं 120.72 कोटींचे बॉक्स ऑफिस कमाई केली आहे. त्यामुळे वर्ल्डवाईड या सिनेमानं 100 कोटींचा टप्पा पार केला असल्याचं चित्र दिसत आहे.
‘कॉकटेल 2’ या सिनेमानं 8 दिवसांत किती कोटी कमावले?
‘कॉकटेल 2’ या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर दमदार ओपनिंग केली आहे. पहिल्या दिवशी या सिनेमानं 13.50 कोटींचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले. या सिनेमानं पहिल्याच दिवशी अनेक सिनेमांचे रेकॉर्ड्स मोडले. तर, पहिल्या दिवसाच्या तुलनेत दुसऱ्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळालं. दुसऱ्या दिवशी या सिनेमानं 16.25 कोटींचे कलेक्शन केले. तर, तिसऱ्या दिवशीही या सिनेमानं बंपर कमाई केली. तिसऱ्या दिवशी 17.75 कोटींचे कलेक्शन करुन या सिनेमानं जबरदस्त कमाई केली.
तर, चौथ्या दिवशी 6.75 कोटी आणि पाचव्या दिवशी 6.75 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर, सहाव्या दिवशी या सिनेमाच्या कमाईत घट झाली असल्याचं पाहायला मिळालं. सहाव्या दिवशी या सिनेमानं 5.25 कोटींचे कलेक्शन केले. तर, सातव्या दिवशी 4.25 कोटी रुपयांची कमाई केली. तसेच आठव्या दिवशी या सिनेमानं 4 कोटींचे कलेक्शन केले आहे. दरम्यान, रविवारी हा सिनेमा किती कोटींचे कलेक्शन करेल? याची माहिती लवकरच समोर येईल.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष