Maharashtra Rain Updates : आधीच उशिरा आगमन झालेल्या मान्सूनमुळे (Monsoon Update) बळीराजाची कामे खोळंबली असताना बहुतांश भागात समाधानकारक पाऊस (Rain Updates) न पडल्याचे चित्र आहे. अशातच आता देशाची काहीशी चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. देशभरात पावसाची तूट आता 43 टक्क्यांवर जाऊन पोहचली आहे. सरासरीच्या 43 टक्के पाऊस कमी झाल्याची आकडेवारी समोर आल्याने चिंतेत अधिक भर पडली आहे. (Maharashtra Rain News Updates)
Brought News Updates : सरासरीच्या कमी पावसामुळं देशभर दुष्काळाचे सावट
दरम्यान, पुढल्या महिन्यात पाऊस देशभर सक्रीय होण्याचा अंदाज देखील व्यक्त करण्यात आला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान 60% पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. तर यंदा सरासरीच्या 10 टक्के कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आले असून सरासरीच्या कमी पावसामुळं देशभर दुष्काळाचे सावट घोंगावत असून त्या दृष्टीने आता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे.
Shivraj Singh : सरासरीपेक्षा 43% कमी पाऊस , खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
दरम्यान, भारतात मान्सूनचा हंगाम सुरू असतानाच मोठी तूट दिसून येत आहे. आतापर्यंत सरासरीपेक्षा 43% कमी पाऊस नोंदवला गेला आहे. एल निनोमुळे कमकुवत मान्सूनची संभाव्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि त्याचा परिणाम आता दिसू लागला आहे. कारण मान्सूनला सध्या लक्षणीय विलंब झाला आहे. तर हवामान अंदाजानुसार, 2 जुलैच्या आठवड्यातही परिस्थिती कमकुवत राहण्याची शक्यता आहे. तर यंदा भारताला तुलनेने कमकुवत मान्सूनचा सामना करावा लागत असून खरीप पिकांवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने, कमी पावसामुळे सर्वाधिक प्रभावित होण्याची शक्यता असलेल्या जिल्ह्यांसाठी कृषी मंत्रालयाने आपत्कालीन योजना तयार केल्या आहेत. यासह 25 टक्के किंवा त्याहून कमी सिंचन व्याप्ती असलेल्या 111 जिल्ह्यांना ‘उच्च प्राधान्य’ देऊन हस्तक्षेपाची गरज असल्याचे ओळखले आहे, असे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले आहे.
देशाच्या कृषी क्षेत्रासाठी आणि जलाशये भरण्यासाठी मान्सून अत्यंत महत्त्वाचा आहे. यंदा केरळात मान्सूनला उशीर झाला. सरकारी अधिकाऱ्यांनी तातडीने जल व्यवस्थापन आणि पायाभूत सुविधांची देखभाल करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. मुंबईसारख्या शहरांमध्ये पाणी वापरावरील निर्बंधही लागू करण्यात आले आहेत. 2026 च्या उत्तरार्धात एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे, ज्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊन $4 ट्रिलियन अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. अशी देखील भीती व्यक्त केली जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Uddhav Thackeray Full Speech Yavatmal : आईची शपथ घेऊन गद्दारी केली, भरसभेत दाखवला फुटीर खासदाराचा ‘तो’ जुना व्हिडिओ