Meera Joshi: मनोरंजनसृष्टी झगमगटामागची दुनिया ही कलाकारांसाठी अनेकदा डोकेदुखीच ठरते. अनेक बऱ्या वाईट अनुभवातून हे कलाकार प्रेक्षकांसमोर येत असतात. विशेषतः महिला कलाकारांना येणाऱ्या बऱ्या वाईट अनुभवांची कायम इंडस्ट्रीत चर्चा रंगते. कास्टिंग काऊच, सोशल मीडियावर होणारे ट्रॉलिंग, दिग्दर्शक निर्मात्यांकडून येणारे वाईट अनुभव अशा अनेक गोष्टींविषयी आता कलाकार उघडपणे व्यक्त होताना दिसत आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीने तिच्यासोबत ऑडिशनमध्ये घडलेला एक हादरवून टाकणारा प्रसंग सांगितलाय. मराठी इंडस्ट्रीत मिळालेल्या वागणुकीवरही ती फार स्पष्टपणे बोलली आहे. अनेक मालिकांमध्ये, वेब सिरीज चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री मीरा जोशीने मराठी इंडस्ट्रीतील तिचा अनुभव शेअर केलाय. मराठी इंडस्ट्रीत योग्य वागणूक मिळत नसल्याचेही ती म्हणलीय. ऑडिशन देताना तिच्यासोबत घडलेल्या एका विचित्र प्रसंगाविषयी तिने ‘इट्स मज्जा’ ला सांगितलं.
इव्हेंटच्या कपड्यात स्टेजवरून ओढत आणलं अन्..
अभिनेत्री मीरा जोशीने तिच्यासोबत घडलेले अनेक असे प्रसंग सांगितले आहेत. ती म्हणाली ‘एका इव्हेंटला पोहोचल्यानंतर, कोरिओग्राफर मित्र सतत ‘कोणालातरी बोलून घे’ असं सांगत होता. परफॉर्मन्स झाल्या झाल्या, त्याने इव्हेंटचाच कपड्यात मला स्टेजवरून ओढत आणलं, गाडीत कोंबलं पैसे दिले आणि आत्ताच्या आत्ता निघून जा असं सांगितलं. माझा मित्र आणि मी गाडी चालवत निघालो, त्यावेळी एका बंद टोल नाक्यावर अचानक 15-20 लोक दगड घेऊन आले. आम्हाला कळलं नाही काय होतंय. आमच्या गाडीचा खूप वेळ पाठलाग केला. आम्ही गाडी पळवतोय आमच्या मागे त्या लोकांची गाडी पाठलाग करत होती. 100 नं ला फोन लावत होतो पण तोही लागत नव्हता. एक पेट्रोलिंगची गाडी दिसली, पोलिसांनी आम्हाला एका टोल नाक्यापर्यंत पोहोचलो त्यावेळी पाठलाग करणारे लोकांची गाडी आमची वाट बघत तिथेच थांबली होती . पोलिसांनी आमची गाडी पुढे पाठवली. पुढचा टोलवर पोहोचलो त्यावेळेस तो माणूस बॅरिकेट उघडायला तयार नव्हता . ‘आम्ही गाडी सोडणार नाही तुम्हाला वापस बोलावलंय ‘असं सांगितलं गेलं. शेवटी माझ्या मित्राने बॅरिकेट तोडलं आणि मग आम्ही मुंबईत आलो. नंतर एक दोन महिन्यांनी मला फोन आला की ‘आमची सर्विस कशी वाटली तुम्हाला, आमच्या इव्हेंटला पुन्हा या ‘ मला माहित नाही ते मला किडनॅप करणार होते की अजून काय! पण तेव्हा मी खूप हादरले होते, असं मीरा जोशीने सांगितलं .
कपडे बदलायला सांगितलं अन् ..
अभिनेत्री मीरा जोशी म्हणाली ‘मी खूप नवीन होते तेव्हा ऑडिशनला गेले होते..ऑडिशनसाठी मी वेस्टर्न कपडे घातले होते. मला म्हणाला की पारंपरिक कपड्यात ऑडिशन हवी आहे.मी त्यांना विचारलं की चेंजिंग रूम कुठे आहे ? त्यावर त्यांनी सांगितलं की चेंजिंग रूम नाहीये तू ऑडिशन रूममध्येच चेंज कर. मी म्हणलं ठीक आहे. मी कपडे बदलणार तेवढ्यात मला दिसलं की हॅंडीकॅम रेकॉर्डिंग मोडवर होता. पण तेव्हा मी एवढी बोर्ड नव्हते की समोरच्याला चार शब्द ऐकवूनन बाहेर पडावं. मी हँडीकॅमचा अँगल बदलला. ऑडिशन दिली आणि बाहेर पडले. ज्या कॉर्डिनेटरने मला त्या ऑडिशनला पाठवलं होतं त्याला मी सांगितलं की असं झालं आहे.त्यांनी तो मेसेज बाकीच्या मुलांना एक अलर्ट म्हणून पाठवला.हा अलर्ट म्हणून पाठवलेला मेसेज ऑडिशन घेणाऱ्या माणसापर्यंत पोहोचला.तुम्हाला ब्लॅकमेल करायला लागला.मी तुला इंडस्ट्रीमध्ये टिकूनच देणार नाही.तुझा मर्डर करतो.तुझ्या घरी येतो वगैरे ..मी एकटी राहायचे त्यामुळे घाबरले.त्यामुळे मग मी त्याची पोलिसात तक्रार केली.
पोलिसांनी त्याला पकडलं.तोपर्यंत माझे काही फोटोज व्हायरल झाले होते ज्यावर Available असं लिहिलं होतं. हे फोटो सगळीकडे व्हायरल झाले होते, त्यावर माझा नंबरही होता. त्यानंतर मी एक फेसबुक पोस्ट केली होती,हे सगळं कोण करताय वगैरे..आणि माझा नंबरही बदलून टाकला.” असं मीरा जोशीने सांगितलं. तिच्या या मुलाखतीची सध्या मनोरंजनसृष्टीत चर्चा आहे.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष