Rain Alert: पावसाचा कुठे कहर, तर कुठे क्षणभर विश्रांती! राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट, अकोल्याच्या पातूर शहरासह तालुक्यात अतिवृष्टी, IMD चा अंदाज काय?


Maharashtra Rain Updates : राज्यभरात मान्सूनचं अखेर आगमन झालं आहे. मात्र आगमनानंतरही काही भागात पावसाने दडी मारलेल्याचे चित्र आहे. तर कुठे पावसाने कहर केल्याचे चित्र आहे. त्यामुळे पाठ फिरवलेल्या मान्सूनची सर्वाधिक प्रतीक्षा बळीराजाला लागली आहे. अशातच प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (Yello Alarts) जाहीर केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या (IMD) ताज्या नोंदींनुसार, शनिवारी महाराष्ट्रात हवामानात मिश्र स्थिती दिसून आली. बहुतेक भागांत पावसाचे प्रमाण नगण्य किंवा शून्य होते, तर काही मोजक्या ठिकाणीच मोजण्यायोग्य पाऊस (Rain Updates)  पडला. मुंबई, सांताक्रूझ, अलिबाग, रत्नागिरी, पणजी आणि डहाणू यांचा समावेश असलेल्या कोकण पट्ट्यात निरीक्षण कालावधीत हवामान प्रामुख्याने कोरडे राहिले आणि बहुतेक केंद्रांवर पावसाची नोंद झाली नाही. तर अकोल्याच्या पातूरमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालाय. या पावसामुळे शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी सखल भागामध्ये घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. (Maharashtra Rain Updates) 

Akola Rain News : अकोल्याच्या पातूरमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस

दरम्यान, शनिवारच्या संध्याकाळी अकोला जिल्ह्यातील पातुर शहराचा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय. अतिवृष्टी सदृश्य झालेल्या पावसामुळे शहरासह तालुक्यात अनेक ठिकाणी पावसाचे पाणी सखल भागामध्ये घुसल्याने नागरिकांचे हाल झाले. यासोबतच तालुक्यातील सुवर्णा नदीसह इतर नद्या आणि नाल्यांना पूर आलेत. पातुर शहरातील मुजावरपुऱ्यात पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी असल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

Washim Rain: खरीप पिकांना मोठा दिलासा, लहान-मोठे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले

वाशिम जिल्ह्यात शनिवारच्या संध्याकाळी मानोरा, रिसोड आणि वाशिम तालुक्यात काही ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस बरसला. बरसलेल्या पावसामुळे अनेक लहान-मोठे नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून शेतांमध्ये पावसाचे पाणी साचल्याचे चित्र पाहवयास मिळालं. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला असून खरीप रखडलेल्या पेरणीला सुरुवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Akola Rain News : वादळी पावसात पोलीस स्टेशनचे छप्पर उडाले

अकोला जिल्ह्यातील हिवरखेड येथे झालेल्या जोरदार वादळी वारा आणि पावसामुळे हिवरखेड पोलीस स्टेशनचे मोठे नुकसान झालेय. जुन्या इमारतीवरील टीनपत्रे उडून गेल्याने मोठी दुर्घटना टळली असून अनेक पोलिसांचा जीव थोडक्यात बचावलाय. जोरदार वादळी वाऱ्याच्या तडाख्यात हिवरखेड पोलीस स्टेशनच्या ऐतिहासिक आणि जीर्ण झालेल्या इमारतीचे टीनपत्रे उडून गेलेय. घटनेच्या वेळी पोलीस कर्मचारी इमारतीत उपस्थित होतेय. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाहीय. अनेक वर्षांपासून पोलीस स्टेशन आणि पोलीस वसाहतीची नवीन इमारत उभारण्याची मागणी होत असतानाही ती अद्याप पूर्ण झालेली नाहीय. या घटनेनंतर पोलिसांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, तातडीने नवीन इमारत उभारण्याची मागणी जोर धरू लागलीये.

27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट (IMD Important Forecast) 

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, राज्यातील 27 जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जाहीर केला आहे. या जिल्ह्यांमध्ये पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, पुणे घाट परिसर, कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, सातारा, सातारा घाट परिसर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *