Deepali Sayyed On Rupali Chakankar: नाशिकमधील भोंदू अशोक खरात प्रकरणाने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली होती. अंधश्रद्धेच्या जाळ्यात ओढत महिलांवर अत्याचार करणाऱ्या लिंगपिसाट भोंदू अशोक खरातवर ‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपट येणार आहे. या चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचा नुकताच टीझर रिलीज झाला. यामध्ये रूपाली चाकणकरांच्या भूमिकेत अभिनेत्री दिपाली सय्यद (Deepali Sayyed) यांचा पहिला लूक समोर आल्यानंतर चित्रपटात आणखी कोणा कोणाच्या भूमिका असणार याकडे अनेकांची नजर आहे.
हे प्रकरण समोर आलं त्यावेळी राज्यातील अनेक बडे राजकारणी, अधिकारी, प्रतिष्ठित लोक या भोंदू खरातचे भक्त असल्याचा समोर आलेलं. याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे अशोक खरातशी आर्थिक संबंध असल्याचे उघडकीस आलं होतं. यातच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा त्यांना राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणानंतर राजकीय वर्तुळातही मोठी खळबळ उडाली आहे. रूपाली चाकणकरांना लूक कसा झाला, हे पहायला पाठवेन असंही अभिनेत्री दिपाली सय्यद म्हणाल्या.
नेमकं काय म्हणाले दीपाली सय्यद ?
बहुचर्चित ‘महाराष्ट्र एपस्टिन फाइल्स’ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झाल्यानंतर Tv9 शी बोलताना दीपाली सय्यद म्हणाल्या ‘ शूटिंग आत्ताच सुरू झालं आहे. टिझरला चांगला प्रतिसाद देतायत. चित्रपट 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शन होणार आहे. चित्रपटाचा शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे.मजा येत आहे काम करायला. हा वेगळा विषय आहे. खऱ्या घडलेल्या गोष्टीवरचा सिनेमा आहे.लोकांपर्यंत सत्य पोहोचवण्याचा आणि भोंदू बाबांविषयी जागरूक करण्यासाठीचा प्रयत्न आहे. ‘ रूपाली चाकणकरांच्या लुक विषयी बोलताना ते म्हणाल्या ‘ मी आधी रूपाली चाकणकरांचा लुक पाहिला.कशा पद्धतीने करायला पाहिजे यासाठी माझी टीम आहे.त्यांनी त्यांच्या विषयीचा सगळा रिसर्च केला. त्या कोणत्या प्रकारच्या साड्या नेसतात.कशा पद्धतीने साडी नेसतात.हेअर स्टाईल कशा पद्धतीने असते.दागिने काय घालतात.हे सगळं सर्च केल्यानंतर पहिल्या दिवशी आम्ही तो लुक केला. मग फोटोशूट वगैरे झालं. त्यातनं कळलं की हा लूक बरोबर जातोय.त्या पद्धतीने आम्ही ठरवलं.काल टिझर पाहिल्यानंतर अनेकांना तो लुक आवडला आहे.अनेक जण हा लूक सेम आल्याचा सांगत आहेत. ‘
त्यांना विचारण्यात आलं की हा लुक तुम्ही रूपाली चाकणकरांना पाठवणार का ? यावर अभिनेत्री दिपाली सय्यद म्हणाल्या ‘अजून तरी पाठवलेला नाही. पण मी पाठवेन.असं काही नाही. पाठवीन आणि बघायला सांगेन की लूक कसा झालाय ते पहा म्हणून कसं वाटतंय.’ असं दीपाली सय्यद म्हणाल्या. चित्रपट आल्यानंतर तो सगळेच पाहणार आहेत. पण त्यांनीही हा चित्रपट पहावा. या चित्रपटात नेमकं काय दाखवलं, कसं दाखवलंय हे त्यांनी पहावं. कारण या प्रकरणात प्रत्येक जण इनव्हॉल्व झालाय.आणि जे जे इनवॉल आहेत त्यांनी हा चित्रपट पहावा ‘ असेही दीपाली सय्यद म्हणाल्या.
हेही वाचा:
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष