OTT crime Thrillers Like Ketan Siya Lohgad Crime Case: पुण्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या ‘केतन अग्रवाल प्रकरणाने संपूर्ण देश हादरला आहे. (Ketan Siya Lohgag Crime Case) 26 वर्षीय केतनच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याची होणारी बायको सिया आणि तिचा प्रियकर चेतन यांना अटक केलीय. सुरुवातीला हा प्रकार ट्रेकिंगदरम्यान झालेला अपघात असल्याचं मानलं जात होतं. मात्र, तपास जसजसा पुढे गेला, तसतसं समोर आलं की केतनचा मृत्यू अपघात नसून एक आखलेला कट होता. या घटनेत रोज नवनवे खुलासे होतायत. या प्रकरणावर प्रचंड चर्चा रंगलीय. एखाद्या सिनेमासारखी कथा असलेल्या या थराराने सगळेच सुन्न झाले आहेत. आज आम्ही तुम्हाला OTT वरील अशाच काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या कथा ‘केतन-सिया’ प्रकरणा सारख्याच थरारक आहेत. या चित्रपटांमध्ये पती-पत्नीच्या नात्यातून अनैतिक संबंध, त्यातून निर्माण झालेला विश्वासघात आणि गुन्हेगारीचा थरार दाखवण्यात आलाय. (OTT Crime Thrillers)
कर्ज (Karz)
पुण्यातील केतन-सिया प्रकरणाने प्रेम, विश्वासघात आणि खुनाचा थरार समोर आणला. अशाच धक्कादायक वळणांनी भरलेला कर्ज हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. 1980 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात रवी वर्मा आपल्या वडिलांची संपत्ती परत मिळवतो, पण कामिनीच्या प्रेमात पडतो. लग्नानंतर कामिनी त्याचा जीव घेते आणि संपत्ती बळकावते. प्रेमाच्या नावाखाली रचलेला हा कट अंगावर काटा आणतो. हा चित्रपट ZEE5 वर पाहता येईल.

हसीन दिलरुबा (Haseen Dilruba)
प्रेम, वासना आणि फसवणुकीच्या गुंतागुंतीत अडकलेली हसीन दिलरुबाची कथा प्रचंड थरारक आहे. राणीचं लग्न रिशूसोबत होतं, पण नंतर तिचं मन नीलकडे वळतं. या प्रेम त्रिकोणात पुढे जे घडतं, ते प्रेक्षकांना हादरवून टाकतं. शेवटचा ट्विस्ट तर पूर्ण चित्रपटाचं चित्रच बदलून टाकतो. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

गॉन गर्ल (Gone Girl)
बाहेरून परफेक्ट दिसणारं नातं आतून किती भयावह असू शकतं, हे गॉन गर्लमध्ये दिसतं. पत्नी अचानक गायब झाल्यानंतर सगळा संशय पतीवर जातो. मात्र तपास जसजसा पुढे सरकतो, तसं एक भयानक सत्य समोर येतं. क्लायमॅक्सपर्यंत प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा हा सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर पाहता येईल.

डार्लिंग्स (Darlings)
आलिया भट्टचा डार्लिंग्स हा चित्रपट सूड आणि नात्यांमधील तणाव यावर आधारित आहे. सततच्या अत्याचाराला कंटाळलेली पत्नी आपल्या पतीविरोधात एक मोठा डाव आखते. कथानक जसजसं पुढे सरकतं, तसतसं त्यातील ट्विस्ट्स अधिकच धक्कादायक ठरतात. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

अंधाधुंद (Andhadhun)
सस्पेन्स आणि क्राईम थ्रिलरच्या दुनियेत अंधाधुंदचा वेगळाच चाहतावर्ग आहे. एका खुनाचा साक्षीदार ठरलेला पियानोवादक आणि त्यानंतर घडणाऱ्या घटना प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. प्रत्येक वळणावर नवा ट्विस्ट आणि नवा धक्का देणारा हा चित्रपट शेवटपर्यंत उत्कंठा वाढवतो. हा चित्रपट जिओ हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

मर्डर (Murder)
प्रेम, अफेअर आणि संशयाच्या भोवऱ्यात अडकलेली मर्डरची कथा तुफान चर्चेत राहिली होती. सिमरनचं आयुष्य तिच्या जुन्या प्रियकराच्या एन्ट्रीनंतर पूर्णपणे बदलतं. पण या नात्याचा शेवट एका मृत्यूने होतो आणि कथा अनपेक्षित वळण घेते. हा चित्रपट अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहता येईल.

नेमकं प्रकरण काय? (Ketan Agrawal Pune Lohagad Case)
बालीचा बेत फसल्यानंतर, 14 जून रोजी सुद्धा सियाने केतनला लोहगड किल्ल्यावर नेले होते. मात्र, त्या दिवशी परिस्थिती अनुकूल न मिळाल्यामुळे किंवा धाडस न झाल्यामुळे त्यांचा कट पूर्ण होऊ शकला नाही. 19 जून रोजी दोघांच्या कुटुंबीयांनी मिळून सियाचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवले होते. मात्र सियाने केतनकडे 18 जून रोजीच लोहगडला ट्रेकिंगसाठी जाण्याचा आग्रह धरला. ठरलेल्या कटानुसार, तिचा प्रियकर चेतन चौधरी हा आधीच लोहगड किल्ल्यावर पोहोचला होता. केतन पुढे असताना चेतन पाठीमागून आला आणि त्या दोघांनी मिळून केतनला खोल दरीत ढकलून दिले, ज्यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष