Jalgaon News: जिवंतपणी कुणी नव्हतं, मृत्यूनंतरही अवहेलना; शववाहिका सोडून मृतदेह नेला कचऱ्याच्या गाडीतून, जळगावातील संतापजनक घटना


अमळनेर : अमळनेरात बेवारस मृतदेह चक्क घंटागाडीतून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल (शुक्रवारी, ता २६) दुपारी एक बेवारस (Jalgaon News) मृतदेह चक्क घंटागाडीतून अंत्यसंस्कारासाठी (Jalgaon News) नेण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे अमळनेरकर परिसरात नगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध प्रचंड संताप आहे. नगरपालिका प्रशासन याची जबाबदारी व दोष कचरा संकलन (Jalgaon News) करणाऱ्या ठेकेदारावर ढकलून मोकळे झाले. ज्या व्यक्तीला जिवंतपणी आणि मृत्यूनंतरही कुणी आपलेसे केले नाही, त्याचा शेवटचा प्रवासही इतका असंवेदनशील पद्धतीने व्हावा, याबद्दल अनेकांनी हळहळ व्यक्त केली.(Jalgaon News)

Jalgaon News: मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेतून नेण्याऐवजी तो चक्क घंटागाडीतून

शहरात तीन दिवसांपूर्वी एक बेवारस व्यक्ती मृतावस्थेत आढळून आली होती. पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात ठेवला होता; मात्र दोन दिवस कुणीच तपास करण्यासाठी आले नसल्याने या बेवारस व्यक्तीचे ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी दुपारी हा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी शववाहिकेतून नेण्याऐवजी तो चक्क घंटागाडीतून स्मशानभूमीत नेण्यात आला. मृतदेह घंटागाडीत ठेवला जात असतानाचे व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाले आणि नगरपालिकेच्या या असंवेदनशील कारभाराविरोधात अमळनेर शहरात संतापाची लाटच पसरली. (Jalgaon News)

Jalgaon News: अमळनेर पालिकेच्या असंवेदनशीलतेवर प्रश्न चिन्ह 

अंत्यविधीसाठी बेवारस मृतदेह चक्क कचरा वाहण्याच्या घंटा गाडीतून नेल्याचा संतापजनक प्रकार जळगाव जिल्ह्यात अमळनेर तालुक्यात समोर आल्याने जनमानसात संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अमळनेर पालिकेच्या असंवेदनशीलतेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अमळनेर शहरात एक बेवारस मृतदेह आढळून आला होता, या मृतदेहावर  ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून झाले, मात्र दोन दिवस पर्यंत कोणतेही नातेवाईक आले नसल्याने मृतदेहावर विधिवत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र यासाठी नगरपालिकेच्या ठेकेदाराने संवेदनशीलतेचा कळस गाठत हा मृतदेह चक्क पालिकेच्या कचरा वाहतूक करणाऱ्या घंटा गाडीतून अंत्य संस्कार साठी नेल्याचं समोर आले आहे.(Jalgaon News)

Jalgaon News: घटनेबाबत समाज माध्यमात रोष

अगोदरच बेवारस मृत्यू त्यात नातेवाईक कोणीही जवळ नसल्याने पालिका आणि रुग्णालय प्रशासनाने मृतदेह सन्मानाने अंत्यसंस्कारासाठी शव वाहिनीतून घेऊन जाणे अपेक्षित होते, मात्र मानवी मूल्य किती ढासळली आहेत, याचा प्रत्यय या घटनेत समोर आला आहे. या घटनेबाबत समाज माध्यमात रोष निर्माण झाल्याचं दिसताच नगराध्यक्ष डॉ परीक्षित बाविस्कर यांनी या घटनेबाबत सखोल चौकशी करत कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

हेदेखील वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *