Dahyatil Mirchi Recipe : जेवणाला येईल झणझणीत पणा, दह्यातली मिरची बनवा खास पद्धतीने, सोपी रेसिपी Video | रेसिपी (Recipes in Marathi)


Last Updated:

तळल्यानंतर कुरकुरीत आणि झणझणीत लागणारी ही मिरची वरण-भात, खिचडी किंवा भाकरीसोबत उत्तम लागते. चला तर मग जाणून घेऊया दह्यातली मिरची बनविण्याची सोपी रेसिपी.

+

News18

News18

अमरावती : वर्षभर साठवण्यासाठी महिला विविध प्रकारची वाळवणं करून ठेवतात. त्यापैकी दह्यातली मिरची हा अनेक घरांमध्ये आवर्जून बनवला जाणारा पारंपरिक पदार्थ आहे. तळल्यानंतर कुरकुरीत आणि झणझणीत लागणारी ही मिरची वरण-भात, खिचडी किंवा भाकरीसोबत उत्तम लागते. चला तर मग जाणून घेऊया दह्यातली मिरची बनविण्याची सोपी रेसिपी.

दह्यातली मिरची बनवण्यासाठी लागणारे साहित्य

हिरवी मिरची, आंबट दही, मीठ आणि मसाले. त्यात धने पावडर, चाट मसाला, हिंग, जिरे पूड हे मसाले येतील.

दह्यातली मिरची कृती

सर्वप्रथम मिरच्या स्वच्छ धुऊन कोरड्या करून घ्या. त्यानंतर मिरचीला मधोमध हलकी चीर द्यायची आहे. सर्व मिरचीला चिर देऊन झाली की, एका भांड्यात आंबट दही आणि मसाले टाकून घ्यायचे आहे. नंतर हे एकत्र करून मिश्रण तयार करून घ्यायचं आहे.

तयार मिश्रणात मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. त्या पूर्णपणे दह्यात बुडतील याची खात्री करून घ्यायची आहे. नंतर हे मिश्रण रात्रभर झाकून ठेवायचं आहे. जेणेकरून मिरच्यांमध्ये दह्याची चव मुरेल. दुसऱ्या दिवशी मिरच्या दह्यातून काढून स्वच्छ कापडावर किंवा ताटामध्ये काढून उन्हात वाळवत ठेवायच्या आहेत. 3 ते 4 दिवसांत या मिरच्या वाळतात. मिरच्या पूर्णपणे कोरड्या झाल्यानंतर हवाबंद डब्यात साठवून ठेवता येतात.

मिरच्या जेवणात घेताना आवश्यक तेवढ्या मिरच्या तेलात हलक्या तळून घ्या. कुरकुरीत दह्यातली मिरची कोणत्याही साध्या जेवणाची चव वाढवते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *