Deool Band 2 Box Office Collection: ‘देऊळ बंद 2’ या सिनेमानं अल्पावधीतच लोकप्रियता मिळवली. या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील बरेच रेकॉर्ड्स मोडले आहेत. ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक सिनेमानं बॉक्स ऑफिसवर धडाकेबाज कमाई केली आहे. 100 कोटींचा टप्पा पार करत या सिनेमानं अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. आता ‘देऊळ बंद 2’ या सिनेमाची क्रेझ पाहायला मिळत आहे. श्री स्वामी समर्थ यांच्या भक्तांनी हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात अक्षरश: गर्दी केली. आता हा सिनेमा 100 कोटींचा टप्पा गाठण्याच्या दिशेनं वाटचाल करत आहे. 36 व्या दिवशी या सिनेमानं नेमकं किती कोटींचे कलेक्शन केले? जाणून घेऊयात.
10 कोटी रुपयांत तयार झालेल्या या सिनेमानं मराठी सिनेसृष्टीतील अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत. या सिनेमानं भारतात जवळपास 72 कोटींच्या आसपास कमाई करत विक्रम रचला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमानं आतापर्यंत जगभरात 93.50 कोटींचे कलेक्शन केले आहे. सध्या हा सिनेमा मराठी सिनेसृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. 21 मे रोजी हा सिनेमा सिनेमागृहात रिलीज झाला होता. हा सिनेमा प्रदर्शित होऊन 36 दिवस पूर्ण झाली आहे.
‘देऊळ बंद 2’ या सिनेमानं 36 व्या दिवशी किती कोटींचे कलेक्शन केले आहे? (Deool Band 2 Box Office Collection)
सॅकनिल्कच्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, 36 व्या दिवशी म्हणजेच सहाव्या गुरुवारी या सिनेमानं 0.16 लाखांचं कलेक्शन केले आहे. गुरुवारी या सिनेमाचे 348 शोज पार पडले होते. 348 शोजमधून या सिनेमानं 0.16 लाखांचं कलेक्शन केले आहे. तर, 0.14 लाखांचं नेट कलेक्शन केलं आहे. दरम्यान, या आठवड्यात या सिनेमानं 2.70 कोटींचं बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या सिनेमानं आतापर्यंत 72.67 कोटींचं नेट कलेक्शन केलं आहे. तर, जगभरात या सिनेमानं 93.50 कोटींच्या आसपास कमाई केली आहे. दरम्यान, हा सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा ओलांडेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मोहन जोशी आणि स्नेहल तरडे अभिनीत आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित या सिनेमात शेतकऱ्यांचे प्रश्न आणि त्यांची व्यथा मांडण्यात आली आहे. दरम्यान, पाचव्या आठवड्यात या सिनेमाच्या कमाईत वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
‘मेरे संग फोटो तो..’ ”गुलाबी साडी’चा बॉलिवूड Version ऐकलंत का? रितेश देशमुखचा खास अंदाज, VIDEO
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष