July Month Grah Gochar 2026 : ज्योतिष शास्त्रानुसार,अवघ्या काही दिवसांतच जुलैचा (July 2026) महिना सुरु होणार आहे. ज्योतिषीय मानेनुसार, जुलैचा महिना फार विशेष असणार आहे. या काळात अनेक मोठमोठ्या ग्रहांचं संक्रमण होणार आहे. द्रिक पंचांगानुसार, जुलैचा महिना सुरु होताच 4 जुलै रोजी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. 16 जुलै रोजी सूर्य क्रक राशीत असेल, तर 24 जुलै रोजी बुध ग्रह मार्गी होणार आहे. तर 27 जुलै रोजी शनि मीन राशीत वक्री होणार आहे. जुलै महिन्यात ग्रहांच्या होणाऱ्या संक्रमणाचा काही राशींना चांगलाच फायदा होणार आहे. या राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी जुलैचा महिना मान-सन्मान आणि प्रतिष्ठेचा असणार आहे. या काळात नोकरदार वर्गातील लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. तसेच, तुम्हाला एखादी चांगली शुभवार्ता ऐकायला मिळेल. जर तुम्हाला नवीन व्यवसायाची सुरुवात करायची असल्यास हा काळ तुमच्यासाठी चांगला आहे. घरातील वातावरण आनंदी असणार आहे. जोडीदाराची तुम्हाला चांगली साथ मिळेल.
तूळ रास (Libra Horoscope)
तूळ राशीसाठी जुलैचा महिना मानसिक शांती आणि भौतिक सुख-सुविधांचा असणार आहे. या काळात तुम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम असाल. तुमचे रखडलेले पैसे तुम्हाला परत मिळतील. तुमच्या सुख-समृद्धीत भरभराट पाहायला मिळेल. कुटुंबियांबरोबर तुम्ही फिरायला जाण्याचा प्लॅन करु शकता.
मकर रास (Capricorn Horoscope)
मकर राशीच्या लोकांना या काळात नशिबाची चांगली साथ मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फार अनुकूल असणार आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाच्या निमित्ताने लांबचा प्रवास करावा लागू शकतो. धार्मिक कार्यात तुमची रुची वाढेल. आरोग्याच्या बाबतीत चिंता करण्याची गरज नाही.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीसाठी जुलैचा महिना फारच अनुकूल असणार आहे. या काळात जर तुम्ही नवीन नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल. जुन्या कर्जातून तुम्हाला मुक्ती मिळेल. तसेच, मित्रांचा सहयोग तुमच्यासाठी मोलाचा ठरेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Weekly Horoscope : तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन राशींसाठी जुलैचा पहिला आठवडा कसा असणार? 6 पैकी 2 राशींसाठी आठवडा धोक्याचा; साप्ताहिक राशीभविष्य
Ketan Agarwal Case Pune :मुलीच्या कृत्याने सियाचे आई-वडील हादरले, म्हणाले; दोषी असेल तर माझ्या मुलीलाही लोहगडावरुन ढकलून द्या!