The India Story Teaser : प्रत्येक घरातील धोका! श्रेयस तळपदे लपलेलं सत्य सगळ्यांसमोर आणणार | ताज्या मनोरंजन बातम्या


Last Updated:

The India Story Teaser : द इंडिया स्टोरी या फिल्ममधून दैनंदिन आहारातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषारी रसायनांमुळे, विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर निर्माण होणाऱ्या धोक्यांवर यात प्रकाश टाकण्यात आला आहे.

News18
News18

‘द इंडिया स्टोरी : स्लो पॉइझन इन प्रोग्रेस’ या चित्रपटाचा दमदार टीझर प्रदर्शित झाला असून, कीटकनाशक शेती आणि त्याचा समाजावर होणारा गंभीर परिणाम यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात दररोज लाखो लोकांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या वाढत्या धोक्याबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

झी स्टुडिओज आणि एमआयजी प्रॉडक्शन अँड स्टुडिओज यांच्या संयुक्त विद्यमाने प्रस्तुत ‘द इंडिया स्टोरी’चे दिग्दर्शन चेतन डीके यांनी केले असून, कथा, पटकथा आणि निर्मिती सागर बी. शिंदे यांची आहे. हा चित्रपट २४ जुलै २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

चित्रपटाच्या उत्कंठावर्धक टीझरमध्ये काजल अग्रवाल आणि श्रेयस तळपदे न्यायासाठी लढताना तसेच कीटकनाशक शेतीमागील भयावह वास्तव उघड करताना दिसतात. दैनंदिन आहारातून शरीरात प्रवेश करणाऱ्या विषारी रसायनांमुळे, विशेषतः तरुण पिढीच्या आरोग्यावर निर्माण होणाऱ्या धोक्यांवर यात प्रकाश टाकण्यात आला आहे. भावनिक आणि सामाजिक आशय असलेल्या कथेद्वारे, अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या पण दूरगामी परिणाम करणाऱ्या या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्याचा चित्रपट प्रयत्न करतो.

चित्रपटाविषयी बोलताना दिग्दर्शक चेतन डीके म्हणाले, “‘द इंडिया स्टोरी’ हा केवळ एक चित्रपट नाही, तर समाजाने एकत्र येऊन चर्चा करावी असा विषय आहे. या कथेद्वारे आम्ही कीटकनाशक शेतीमुळे निर्माण होणाऱ्या गंभीर वास्तवावर आणि त्यातून उद्भवणाऱ्या आरोग्य संकटावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. टीझर ही या मोठ्या समस्येची केवळ एक झलक आहे. आमचा उद्देश जनजागृती करणे, विचारांना चालना देणे आणि आपल्या ताटात नेमकं काय येतं याबद्दल लोकांनी प्रश्न विचारावेत, हा आहे.”

या चित्रपटाविषयी माहिती देताना सांगितले कि, “‘द इंडिया स्टोरी’कडे मला आकर्षित करणारी गोष्ट म्हणजे त्याचा अत्यंत समर्पक विषय. कीटकनाशक शेती ही प्रत्येक घराशी संबंधित समस्या आहे, पण तिच्या दीर्घकालीन परिणामांचा आपण फारसा विचार करत नाही. माझ्या व्यक्तिरेखेच्या प्रवासातून एका सामान्य वडिलांचा मोठ्या व्यवस्थेविरुद्धचा भावनिक संघर्ष प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल, अशी मला आशा आहे. हा चित्रपट मनोरंजन तर करेलच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे एका आवश्यक चर्चेला सुरुवात करेल.”

“‘द इंडिया स्टोरी’ हा एक प्रभावी सामाजिक संदेश देणारा चित्रपट आहे. आई म्हणून ही कथा मला वैयक्तिक पातळीवर खूप भावली, कारण आज अनेक पालकांच्या मनात असलेल्या भीती आणि चिंतेचं प्रतिबिंब यात दिसतं. टीझर समाजापासून अनेकदा लपून राहणाऱ्या वास्तवाची झलक दाखवतो. हा चित्रपट लोकांमध्ये जागरूकता निर्माण करेल आणि ते आपल्या अन्नाबाबत तसेच त्याचा पुढील पिढ्यांवर होणाऱ्या परिणामांबाबत अधिक सजग होतील, अशी अपेक्षा आहे.” असे अभिनेत्री काजल अग्रवाल यांनी सांगितले.

या चित्रपटाचे सहनिर्माते स्वाती विनायक सैंदाणे, अनिता जाधव, विनायक सैंदाणे, कल्पेश शाह, देवयानी खोराटे आणि प्रेम जोशी आहेत. चित्रपटाच्या तांत्रिक टीममध्ये छायाचित्रण निशांत भागवत, संगीत मंगेश धाकडे, संकलन आशिष म्हात्रे, गीतकार शकील आझमी आणि ध्वनी संयोजन अनमोल भावे यांचा समावेश आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *