Bhandara Crime News : भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. घरमालक नेहमी टोचून बोलतो, याचा राग मनात धरुन भाडेकरुनं आपल्या घरमालकाची निर्जनस्थळी नेत दगडानं ठेचून हत्या केली आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या निष्टी ते भुयार या जंगल परिसरातील मार्गावरील ठाणेगाव येथील तलावाच्या निर्जनस्थळी उघडकीस आली. याप्रकरणी पवनी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
आरोपीला अटक, पोलिसांकडून चौकशी सुरु
लीलाधर मोहरकर 60 वर्षीय मृत सेवानिवृत्त शिक्षकाचं नावं आहे. तर, महेश विश्वकर्मा (32) असं पोलिसांनी अटक केलेल्या आरोप भाडेकरूचं नावं आहे. मृतक हे पवनी तालुक्यातील कोसरा येथील असून भाडेकरू असलेल्या महेश विश्वकर्मा याचं मिठाईचं दुकान आहे. आरोपी महेशनं घरमालक लिलाधर यांना दुचाकीनं प्रथम पवनी इथं आणलं. त्यानंतर दोघेही निष्टी या जंगल परिसरातून भुयार गावाकडं निघाले. मात्र, जंगलातील निर्जनस्थळ बघून आरोपी महेशनं दुचाकी ठाणेगाव येथील तलाव परिसरात नेत तिथं त्यांचा प्रथम दुपट्ट्यानं गळा आवळला. त्यानंतर दगडानं ठेचून चेहरा विद्रूप करून हत्या केली. रक्ताच्या थरोड्यातील मृतदेह बघून गुराख्यानं घटनेची माहिती पोलिसांना दिली. पवनी पोलिसांनी तपासाची चक्र वेगानं फिरवीत आरोपी महेशला ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं घटनेची कबुली दिली. या प्रकरणी पवनी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
बदलापुरात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या
बदलापुरात पत्नीची नाक-तोंड दाबून हत्या करत हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचा बनाव पतीनं केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोस्टमॉर्टमचा रिपोर्टने आल्यानंतर या प्रकरणाचे बिंग फुटलं आहे. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पती आणि सासूला बेड्या ठोकल्या आहेत. पतीचे एका अन्य महिलेसोबत प्रेमसंबंध होते. तो पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. मात्र पत्नीने घटस्फोटाला नकार दिल्यानं पतीनं तिचा काटा काढल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून नाक तोंड दाबून खून करण्यात आल्याचं निष्प
प्राजक्ता मेहेर असं मृत पत्नीचं नाव होतं. तिचं 2010 साली बदलापूरच्या एरंजाड गावात राहणाऱ्या योगेश मेहेर सोबत लग्न झालं. त्यांना 15 आणि 11 वर्षांची दोन मुलंही आहेत. मात्र काही काळापासून योगेशचे गावातच राहणाऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध जुळले. यातूनच योगेशने पत्नी प्राजक्ताला घटस्फोटासाठी त्रास द्यायला सुरुवात केली. 14 मार्च 2026 रोजी प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून हवे तितके पैसे घ्या आणि मुलीला घेऊन जा, अशी ऑफर योगेशने दिल्याचा आरोप प्राजक्ताच्या वडिलांनी केलाय. यानंतर 8 एप्रिल रोजी योगेश आणि प्राजक्तामध्ये पुन्हा भांडण झालं. 9 एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना तिचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंदही केली. मात्र प्राजक्ताच्या माहेरच्यांनी संशय व्यक्त केल्यानं मुंबईच्या जेजे हॉस्पिटलमध्ये तिचं पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि व्हिसेरा सांभाळून ठेवण्यात आला. याचाच रिपोर्ट 23 जून रोजी आला, ज्यात प्राजक्ताचा मृत्यू हार्ट अटॅकने झालेला नसून नाक तोंड दाबून खून करण्यात आल्याचं निष्पन्न झालं.
Operation Tiger Breaking : एकनाथ शिंदेंच्या ‘ऑपरेशन टायगर’ मोहीमेत मुख्यमंत्र्यांचा महत्वाचा रोल?