Last Updated:
एक वृद्ध व्यक्ती रिटायरमेंटच्या वयात प्रचंड मेहनत करताना दिसत आहे. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्या कारणाने त्याच्यावर ही वेळ आली आहे. पण त्याच्या परिस्थिती पाहून डोळ्यात पाणी येतेय.
Viral Video News : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात.काही व्हिडिओ मनोरंजन करणारे असतात तर काही व्हिडिओ खूपच धक्कादायक असतात. असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एक वृद्ध व्यक्ती रिटायरमेंटच्या वयात प्रचंड मेहनत करताना दिसत आहे. आर्थिक परिस्थिती ठीक नसल्या कारणाने त्याच्यावर ही वेळ आली आहे. पण त्याच्या परिस्थिती पाहून डोळ्यात पाणी येतेय.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आराधना नावाच्या एका तरुणीने हा व्हिडिओ तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती 75 वर्षात एक वृद्ध व्यक्ती आपल्या आयुष्यात जगण्यासाठी कसा संघर्ष करतो आहे. हे तिने या व्हिडिओत दाखवलं आहे.
खंर तर हा वृ्द्ध व्यक्ती जुहू बीचवर मिकी माऊस घालून लहान पोरांना आनंद देतो आणि त्यांच्यासोबत फोटो काढतो.या बदल्यात लहान मुलांचे कुटुंबिय त्याच्या समोरील ठेवलेल्या पेटीत पैसै ठेवतात. तुम्हाला हे वाचून वाटत असेल हे किती सोप्प आहे. पण अजिबात नाही कारण प्रचंड गरमीत तो मिकी माऊसचा ड्रेस परिधान करून 75 व्या वयात मुलांना आनंद देतोय. ज्यावेळेस जो ड्रेस परिधान करतो तेव्हा तो घामाने अक्षरच्या भिजून जातो हे करताना त्याच्या डोळ्यात अश्रू असतात पण लहानग्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी हे करतो.
खरं तर वृद्ध व्यक्तीला कुणीही काम देत नसल्याने त्याने हे काम करायला सूरवात केली या कामाद्वारे आता त्याने आपलं पोट भरायला सूरूवात केली. विशेष म्हणजे त्याची बायको देखील अंधेरीच्या जुहू बीचवर फुगे विकते. अशाप्रकारे दोघेही कमाई करून आपलं घर चालवतात. आयुष्याच्या या टप्प्यातही या वृद्ध व्यक्तीचा संघर्ष पाहून हृदय भरून येत. त्यांचा हा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 25, 2026 11:55 PM IST
शरीर थकलं पण संघर्ष पाठ सोडेना,75 व्या वर्षी करतोय हृदय पिळवटून टाकणार काम, VIDEO पाहून डोळे पाणावतील
