Bhiwandi Crime : घरासमोर खेळणाऱ्या 7 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार; नराधमाचा एन्काउंटर करा, भिवंडीत संतप्त नागरिकांची मागणी


Bhiwandi Kasheli Case : भिवंडी तालुक्यातील कशेळी परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. घराखाली भावासोबत खेळत असलेल्या एका सात वर्षीय चिमुरडीला खाऊचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरात तीव्र संतापाची लाट उसळली. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत नारपोली पोलीस पथकाने तात्काळ कारवाई करत फरार होण्याच्या तयारीत असलेल्या नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

अटक करण्यात आलेला नराधम हा अल्पवयीन असल्याची माहिती आहे. या अमानुष अत्याचारानंतर पीडित चिमुरडीची प्रकृती खालावली असून तिच्यावर भिवंडीतील स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात (IGM Hospital) तातडीने उपचार सुरू आहेत. चिमुरडीच्या पालकांनी तात्काळ धाडस दाखवून पोलिसांत तक्रार केल्यामुळे या नराधमाचा पळून जाण्याचा डाव फसला आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, पीडित चिमुरडी आपल्या लहान भावासोबत घराखाली खेळत होती. यावेळी तिथे राहणाऱ्या आरोपीने मुलीला खाऊ खाण्यासाठी पैशांचे आमिष दाखवले आणि तिला आपल्या फ्लॅटमध्ये घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर आरोपीने मुलीच्या लहान भावाला पाणी आणण्यासाठी बाहेर पाठवून दिले. भाऊ बाहेर जाताच आरोपीने मुलीला घरात कोंडून तिच्यावर जबरदस्तीने अत्याचार केला.

Bhiwandi Arrest : फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला बेड्या

काही वेळानंतर मुलीने रडत रडत आपल्या पालकांना घडलेल्या सर्व प्रकाराची माहिती दिली. मुलीची अवस्था पाहून पालकांना मोठा धक्का बसला आणि त्यांनी तातडीने तिला स्व. इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या संतापजनक घटनेची माहिती मिळताच नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस पथक तात्काळ ॲक्शन मोडमध्ये आले. आरोपी हा गुन्हा करून शहरातून फरार होण्याच्या तयारीत होता, मात्र पोलिसांनी नाकेबंदी करत त्याला बेड्या ठोकल्या.

Public Protest Bhiwandi : ‘तारीख पे तारीख नको, आरोपीचा एन्काऊंटर करा!’

या अमानुष घटनेची बातमी कशेळी आणि भिवंडी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. यामुळे संतप्त झालेल्या शेकडो नागरिकांनी आणि महिलांनी नारपोली पोलीस ठाण्याबाहेर प्रचंड गर्दी केली होती. नागरिकांच्या संतापाचा बांध फुटल्याने त्यांनी पोलिसांसमोरच जोरदार घोषणाबाजी सुरू केली.

या नराधमाला कोर्टात नेऊन ‘तारीख पे तारीख’ देण्याची गरज नाही, त्याचा थेट एन्काऊंटर करा, अशी संतप्त मागणी उपस्थित नागरिकांनी लावून धरली होती.

आरोपी हा कशेळीतील एका इमारतीत बॅचलर राहत असल्याची माहिती आहे. घरमालकाने कोणत्याही प्रकारची कायदेशीर पडताळणी किंवा विना पोलीस व्हेरिफिकेशन आणि विना ॲग्रीमेंट (Agreement) त्याला घर भाड्याने दिल्याचा गंभीर आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे. याप्रकरणी पोलीस कायदेशीर कारवाई करत असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.

ही बातमी वाचा:



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *