Last Updated:
टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने बांगलादेशवर 5 विकेटने विजय मिळवला आहे, तरीही भारतीय महिला टीमचं सेमी फायनलला पोहोचणं संकटात सापडलं आहे.
मुंबई : टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने बांगलादेशवर 5 विकेटने विजय मिळवला आहे. बांगलादेशने दिलेलं 137 रनचं आव्हान भारतीय महिला टीमने 16.5 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून पार केलं. शफाली वर्माने 34 बॉल 53 रनची आक्रमक खेळी केली. याशिवाय जेमिमा रॉड्रिग्जने 26, यास्तिका भाटियाने 23 रनचं योगदान दिलं. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला, यानंतर त्यांनी 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमावून 136 रन केले.
भारताकडून राधा यादवने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या तर श्री चरिणीला 2 विकेट मिळाल्या. रेणुका सिंग ठाकूर आणि नंदिनी शर्मा यांना 1-1 विकेट घेण्यात यश आलं. यंदाच्या टी-20 वर्ल्ड कपमधला टीम इंडियाचा 4 सामन्यांमधला हा तिसरा विजय आहे. पॉईंट्स टेबलमध्ये भारतीय महिला टीम दुसऱ्या क्रमांकावर आहे, पण अजूनही टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं संकटात आहे.
सेमी फायनलचं समीकरण संकटात
टीम इंडियाचा ग्रुप स्टेजमधला शेवटचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. ऑस्ट्रेलियाने या वर्ल्ड कपमध्ये 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत, त्यामुळे त्यांच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. ऑस्ट्रेलियाचा पराभव केला तर टीम इंडियाचं सेमी फायनलला पोहोचणं निश्चित होईल, तर या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा विजय झाला तर ऑस्ट्रेलिया सेमी फायनलला क्वालिफाय होईल.
ऑस्ट्रेलिया सेमी फायनलला पोहोचली तर ग्रुप ए मधून टीम इंडिया किंवा दक्षिण आफ्रिका यांच्यापैकी एकच टीम सेमी फायनलमध्ये प्रवेश करेल. दक्षिण आफ्रिकेचे शेवटचे दोन सामने कमकुवत असलेल्या नेदरलँड्स आणि बांगलादेशविरुद्ध आहेत. भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव झाला आणि दक्षिण आफ्रिकेने बांगलादेश आणि नेदरलँड्सला हरवलं तर मात्र ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका सेमी फायनलला पोहोचतील.
नेट रनरेट हा मात्र टीम इंडियासाठी दिलासादायक आहे. भारताचा नेट रनरेट हा +2.268 एवढा आहे, तर दक्षिण आफ्रिकेचा नेट रनरेट -0.546 एवढा आहे, त्यामुळे भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि दक्षिण आफ्रिकेने उरलेले दोन्ही सामने जिंकले तरी त्यांना टीम इंडियाला नेट रनरेटवर मागे टाकणं जवळपास अशक्य आहे.
Mumbai,Maharashtra
Jun 26, 2026 12:01 AM IST
T20 World Cup : बांगलादेशवर दणक्यात विजय, तरी टीम इंडिया संकटात, सेमी फायनलला जाण्यासाठी काय करावं लागणार?
