Venezuela Earthquake: व्हेनेझुएलाची राजधानी आणि सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या कराकस शहराला बुधवारी संध्याकाळी भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के बसले. 7.1 आणि 7.5 रिश्टर स्केल क्षमतेच्या भूकंपाच्या या धक्क्यांनी (Big Earthquake) कराकस शहरातील इमारती आणि घरे अक्षरश: पत्त्यासारखी कोसळली. या दुर्घटनेत तब्बल 10 हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. बुधवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कराकस (Caracas Earthquake) शहराला हे भूकंपाचे धक्के बसले. या शक्तिशाली भूकंपानंतर काही नागरिक त्यांच्या घरांमधून बाहेर पडत धावत रस्त्यावर आले. हे भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की, अनेक इमारती पूर्णपणे कोसळल्या आहेत. कराकस शहरात फक्त इमारतींचे ढिगारे उरले आहेत. लोकांना आसरा घेण्यासाठीही जागा शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे काल भूकंपाच्या धक्क्यानंतर येथील नागरिकांना रात्रभर रस्त्यावरच राहावे लागले. (Venezuela news)
व्हेनेझुएलाचे गृहमंत्री डियोस्डाडो काबेयो यांनी दिलेल्या माहितीनुसार, कराकस शहरातील अल्तामिरा भागात सर्वाधिक नुकसान झाले असून तेथील परिस्थिती चिंताजनक आहे. या परिसरातील अनेक इमारती आणि घरं पडली आहेत. भूकंपाचे आणखी हादरे बसू शकतात, या शक्यतेने सरकारने लोकांना पुन्हा घरात जाऊ नये, अशी सूचना दिली होती. या दुर्घटनेत हजारो नागरिक जखमी झाल्याची माहिती आहे.
नॅशनल हॉलिडे असल्यामुळे भूकंपावेळी अनेक लोक आपल्या घरी उपस्थित होते. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 6.04 वाजता भूकंप आला. भूकंपाचे केंद्र कराकासच्या पश्चिमेला मोंटालबान क्षेत्रात होते. हा झटका इतका तीव्र होता की कोलंबियाची राजधानी बोगोटापर्यंत याचे हादरे जाणवले. या झटक्यांची तीव्रता त्रूजिलो, याराकुई, काराबोबो, अरागुआ, मिरांडा, कराकास आणि ला गुआइरा या ठिकाणी जाणवली.
एका मिनिटात भूकंपाचे दोन शक्तिशाली धक्के बसल्यामुळे कराकस शहराची वाताहात झाली आहे. हे भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की, मोठमोठ्या इमारती गदागदा हलून जमीनदोस्त झाल्या. हे दृश्य पाहताना अनेकांचा आपल्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. भूकंपाचे धक्के बसले तेव्हा लोकांना जमिनीवर उभे राहणेही मुश्कील झाले होते. या इमारती एकाचवेळी कोसळल्यामुळे कराकस शहराच्या आकाशात धुळीचे प्रचंड लोट उठले होते. यानंतर व्हेनेझुएलाच्या राष्ट्राध्यक्षांनी देशात आणीबाणीची घोषणा केली आहे.
Así se vio el Terremoto en caracas VENEZUELA, La pastora se rumora que los temblores continuarán así que todos permanezcan en un lugar seguro y aseguren a sus familiares, DIOS TIENE EL CONTROL pic.twitter.com/aeG9vB7oXT
— BAEZ (@Baeztvshow) June 24, 2026
BMC Manhole Reality Check Special Report : मुंबईत पावसाचा पहिलाच तडाखा अन् पालिकेची नाचक्की!