Ghabadkund Box Office Collection: मराठीतला सस्पेन्स थ्रिलर (Marathi Suspense Thriller) ‘घबाडकुंड’ सिनेमा (Ghabadkund Movie) सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरतोय. नुकत्याच प्रदर्शित झालेला सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळतोय. या सिनेमात संदीप पाठक (Sandeep Pathak), देवदत्त नागे (Devdatta Nage), शशांक शेंडे (Shashank Shende) आणि प्राजक्ता हनमघर (Prajakta Hanamghar) यांसारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. केवळ 6 कोटी रुपयांच्या माफक बजेटमध्ये तयार झालेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय. या सिनेमानं पाचव्या दिवशी किती कमाई केली, ते सविस्तर जाणून घेऊयात…
‘घबाडकुंड’ सिनेमानं पाचव्या दिवशी किती कमावले? (Ghabadkund Box Office Collection Day 5)
‘सॅकनिल्क’ (Sacnilk) च्या आकडेवारीनुसार, या सिनेमानं पाचव्या दिवशी 43 लाख रुपयांची कमाई केली. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी सिनेमानं 42 लाख रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी कमाईत वाढ होऊन 76 लाख रुपये जमा झाले, तर तिसऱ्या दिवशी 1.25 कोटी रुपयांची कमाई झाली. चौथ्या दिवशी सिनेमानं 49 लाख रुपये कमावले. अशा प्रकारे, या सिनेमानं आतापर्यंत एकूण 3.35 कोटी रुपयांची कमाई केलीय.
यामुळे सिनेमानं आपल्या एकूण बजेटपैकी 55.83 टक्के रक्कम वसूल केली आहे. सिनेमाला समिक्षकांकडूनही सकारात्मक रिव्यू मिळाले आहेत आणि ‘वर्ड-ऑफ-माउथ’चाही ‘घबाडकुंड’ सिनेमाला मोठा फायदा होतोय. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर अशीच दमदार कामगिरी करत राहील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जर सिनेमानं अशीच धुवांधार कमाई सुरू ठेवली, तर सिनेमा अनेक दिग्गजांच्या सिनेमाचे रेकॉर्ड्स मोडू शकतो.
‘घबाडकुंड’ सिनेमाची बजेटच्या 55 टक्क्यांची वसुली
बजेट: 6 कोटी
निव्वळ कमाई (Net Collection): 3.35 कोटी
वसुली: 55.83 टक्के
सिनेमाचं दिग्दर्शन प्रीतम एस. के. पाटील यांनी केलं असून निर्मिती रसिक कदम यांनी केलीय. या सिनेमात अहमद देशमुख, कुशल बद्रिके, प्रवीण दलिंबकर, वैष्णवी कल्याणकर, आरोही भोईर, साहिल अन्नलदेवर आणि स्मिता पेगुडे अंजुटे यांसारख्या कलाकारांचा समावेश आहे.
दरम्यान, मराठी सिनेमा ‘घबाडकुंड’नं बॉक्स ऑफिसवर चांगलीच खळबळ उडवून दिली आहे. सुरुवातीला, रितेश देशमुखच्या ‘राजा शिवाजी’ सिनेमानं 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करून मोठी कामगिरी केलेली. त्यानंतर, प्रवीण तरडे यांच्या ‘देऊळ बंद 2’ सिनेमानंही बॉक्स ऑफिसवर वर्चस्व गाजवलंय. या सिनेमानं 80 कोटींहून अधिक कमाई केली असून तो सर्वाधिक कमाई करणारा तिसरा मराठी सिनेमा ठरलाय. याव्यतिरिक्त, ‘तुंबडची मंजुळा’ सिनेमाही बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करतोय.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष