24 Jun 2026 07:58 PM (IST)
विलास घुले हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर आरोपींना 30 जुनपर्यंत पोलीस कोठडी
विलास घुले हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीसह इतर आरोपींना 30 जुनपर्यंत पोलीस कोठडी
काल दिवसभरात आणि रात्रीतून अटक केलेल्या इतर आरोपींना न्यायालयासमोर करण्यात आलं हजर
न्यायालयाने आरोपींना सुनावली 30 जून पर्यंत पोलीस कोठडी
एसआयटीच्या माध्यमातून तपासाला सुरुवात
24 Jun 2026 07:45 PM (IST)
परभणीच्या गंगाखेड रोडवर पिकअप आणि मोटरसायकलचा भीषण अपघात
परभणीच्या गंगाखेड रोडवर पिकअप आणि मोटरसायकलचा भीषण अपघात
अपघातात मोटरसायकलवरील दोन जण गंभीर जखमी
ब्राह्मणगाव पाटीजवळ घडली घटना
जखमींना उपचारासाठी परभणीच्या शासकीय रुग्णालयात हलवलं
24 Jun 2026 07:30 PM (IST)
रावेरमध्ये जोरदार पाऊस, खिरवड येथील नदीला पूर
रावेरमध्ये जोरदार पाऊस, खिरवड येथील नदीला पूर
खिरवड – नेहेते रस्त्यावरील पुलावरून पाणी, दोन्ही गावांचा संपर्क तुटला
शाळकरी मुल, तसेच शेतातील मजुर केळी वाहतूक करणारी वाहनं अडकली
जोरदार पावसामुळे नागरिकांचे हाल
24 Jun 2026 07:15 PM (IST)
मुक्ताईनगर तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली, कर्कीसह अनेक भागात ढगफुटीस सदृश्य पाऊस
कर्की येथे साखरपुड्यासाठी आलेली खाजगी बस नाल्यावरून पाणी आल्याने अडकली
चालकाने तत्परता दाखवल्याने मोठा अनर्थ टळला
अनेकांच्या घरात पाणी घुसून संसार उपयोगी वस्तूंचे नुकसान
तर काही दुकानात घुसले पाणी मोठे नुकसान पंचनामे करून मदतीची मागणी
24 Jun 2026 06:47 PM (IST)
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनाला दाखल
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी दाखल झाले आहे. रोहित पवार विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनानंतर माध्यमांसह संवाद साधणार आहेत. त्यामुळे रोहित पवार नेमकं कोणत्या मुद्द्यावर बोलणार? याकडे लक्ष लागून आहे.
24 Jun 2026 06:45 PM (IST)
सांगली-मिरजेत पावसाची हजेरी, शेतकरी सुखावले
सांगली-मिरज शहरासह परिसरामध्ये दुपारी जोरदार पाऊस पडला आहे.का ल सायंकाळ पासून रिमझिम स्वरूपात पाऊस पडायला सुरुवात झाली होती. मात्र आज सकाळपासून पुन्हा उन्हाचा कडाका वाढला. पण दुपारनंतर ढगाळ वातावरण झालं. सांगली आणि मिरज शहरामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. तर मान्सूनचा पाऊस दाखल झाल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.
24 Jun 2026 06:37 PM (IST)
अमरावतीत मान्सूनच्या पहिल्याच पावसात नालेसफाईची पोलखोल
मान्सूनच्या पहिल्याच पावसात अमरावती महानगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून केलेल्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह बाजारपेठेतील दुकानांसह अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयातील सिटीस्कॅन विभागात पाणीच पाणी पाहायला मिळालं. रुग्णालयमध्ये पाणी शिरल्याने तारांबळ उडाली.रुग्णालयातील पाणी तासाभरानंतर बाहेर काढण्यात आलं.
24 Jun 2026 06:11 PM (IST)
आगामी 4-5 दिवसांत महाराष्ट्रसह विदर्भात चांगला पाऊस : प्रवीण कुमार
येणाऱ्या चार ते पाच दिवसांपर्यंत महाराष्ट्रसह विदर्भात चांगला पाऊस पाहायला मिळणार आहे. काही भागांमध्ये 30 ते 40 टक्के पावसाचा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या बऱ्याच क्षेत्रात चांगला पाऊस मिळण्याची शक्यता आहे. पावसाचा अंदाज साधारण असला तरी तो पाऊस चांगला राहणार आहे, अशी माहिती नागपूरमधी हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिली.
24 Jun 2026 05:30 PM (IST)
बोरिवली लोकलमधील हत्येचा आरोपी अटकेत, 24 तासांत जीआरपीची कारवाई
बोरिवली लोकल ट्रेनमध्ये तरुणाची हत्या करणाऱ्या आरोपीला अखेर अटक करण्यात आली आहे. आरोपीचे नाव रोशन सुवर्णा आहे.23 जूनच्या रात्री चर्चगेट-नालासोपारा लोकल ट्रेनमध्ये मुसळधार पावसानंतर दरवाजा बंद करण्यावरून आरोपी आणि मृत मयंक लोहार यांच्यात वाद झाला. वादानंतर आरोपीने बॅगमधून चाकू काढून मयंकची हत्या केली होती.
24 Jun 2026 05:12 PM (IST)
शेतकरी महिलेवरील हल्ला प्रकरणात दानवेंचा खळबळजनक आरोप
छत्रपती संभाजीनगर : पैठण तालुक्यातील लाखेगाव येथील शेतकरी महिलेवर झालेल्या अमानुष हल्ला प्रकरणावरून विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गंभीर आरोप केला आहे. कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. आरोपींना पोलिसांकडून संरक्षण दिले जात असल्याचा दानवेंनी आरोप केला आहे.
24 Jun 2026 05:05 PM (IST)
केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी
केडीएमसी महासभेत सभापतींनी अजब फतवा जारी केला आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यमांना त्यांनी प्रवेशबंदी केली आहे. महासभेच्या वार्तांकनासाठी फक्त दैनिक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधींनाच सभागृहात परवानगी देण्यात आलेली आहे. इलेक्ट्रॉनिक व डिजिटल माध्यमांच्या पत्रकारांना सभा संपल्यानंतर माहिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
24 Jun 2026 04:54 PM (IST)
दरड कोसळल्याने रायगड किल्ल्याचा पायरी मार्ग दोन दिवस बंद
अतिवृष्टीमुळे रायगड किल्ल्यावरील महादरवाजा परिसरात दरड कोसळल्याने पायरी मार्ग 24 आणि 25 जून रोजी बंद ठेवण्यात आला आहे. दरड हटविण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून पर्यटकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. महाड प्रशासनाने नागरिकांना पायरी मार्गाचा वापर टाळण्याचे आवाहन केले असून आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
24 Jun 2026 04:40 PM (IST)
भंडाऱ्यात वाघिणीच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी
खरीप हंगामाची शेतीत काम करत असताना झुडुपात दबा धरून बसलेल्या एका वाघिणीनं शेतकऱ्यावर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं. ही घटना भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यातील आमगाव बुद्रुक इथं घडली. हरिश्चंद्र मडावी (40) असं गंभीर जखमी शेतकऱ्यांचं नावं आहे.
24 Jun 2026 04:26 PM (IST)
छत्रपती संभाजीनगर : जरंडी परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावातील जरंडी परिसरात आज दीडतास ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने परिसरातील सर्व नदी नाल्यांना पूर आल्याने वाहतूक बंद झाली होती. जरंडी जवळील ग्रामपंचायतीची घंटा गाडी पुराच्या पाण्यात वाहून जातांना ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी वाचवली तर एका इसमाची बजाज कंपनीची प्लॅटिना मोटारसायकल पुराच्या पाण्यात वाहून गेली, सुदैवाने ग्रामस्थांनी मोटरसायकलस्वाराचे प्राण वाचविले.
24 Jun 2026 04:13 PM (IST)
जळगाव : पावसामुळे कापूस-मका पिकांचे नुकसान
जळगावच्या अमळनेर कळमसरे परिसरातील शेतांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कापूस, मका पिकांचे नुकसान झाले आहे. पुलाच्या चुकीच्या बांधकामामुळे जोरदार पावसामुळे नाल्याला आलेले पाणी थेट शेतात शिरल्याने नुकतेच लागवड केलेली कपाशी, मका पाण्यात गेली आहे, यामुळे मोठे नुकसान झाले आहे.
24 Jun 2026 03:52 PM (IST)
अध्यक्ष पेझेश्कियानकडून पंतप्रधान मोदींना इराणला भेट देण्याचे निमंत्रण
अयातुल्ला अली खामेनी यांच्या अंत्यविधीसाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इराणमध्ये आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र, त्यांचा कार्यक्रम अद्याप निश्चित झालेला नाही.
24 Jun 2026 03:45 PM (IST)
अन्न आणि औषध प्रशासनाचं शिर्डीत पुन्हा धाडसत्र
अन्न आणि औषध प्रशासनाने शिर्डीत पुन्हा एकदा धाडसत्र सुरू केलं आहे. निकृष्ट दर्जाचे 500 किलोहून अधिकचे पेढे जप्त करण्यात आले आहेत. साई मंदिर परिसरातील खासगी पेढे विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.
24 Jun 2026 03:35 PM (IST)
नितेश राणेंनी थोपाटली आदित्य ठाकरे यांची पाठ
मंत्री नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांची पाठ थोपटल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहेत. नितेश राणे कायम आदित्य ठाकरेंवर टीका करत असतात, पण यावेळी वेगळं चित्र दिसलं. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
24 Jun 2026 03:20 PM (IST)
वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरवा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश
वारकऱ्यांना सर्व सुविधा पुरवाव्यात असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. विमा प्रक्रिया योग्य प्रकार राबवण्याचे आदेशही दिले आहेत. यंदा डीजे मुक्त वारी करा, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
24 Jun 2026 03:11 PM (IST)
शिवसेना (यूबीटी) आज लोकसभा अध्यक्षांना भेटणार
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांनी शिवसेनेला (यूबीटी) आज सायंकाळी 5 वाजता बैठकीसाठी बोलावले आहे. आज अध्यक्षांसमोर आपली बाजू मांडण्याचा संदेश त्यांना पाठवण्यात आला आहे. पक्षाचे खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे बंडखोर खासदारांच्या गटाला मान्यता किंवा परवानगी न देण्याची विनंती करण्यासाठी आज सायंकाळी 5 वाजता अध्यक्षांची भेट घेणार आहेत.
24 Jun 2026 02:56 PM (IST)
रस्ता दुरुस्तीसाठी प्रहार संघटनेच्या धरणा आंदोलन
गोंदियामध्ये रस्ता दुरुस्तीसाठी प्रहार संघटनेच्या धरणा आंदोलन करण्यात आले आहे. वारंवार निवेदन देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे धरणे आंदोलन करण्यात आले आहे. ठाणा परिसरातील रस्ते खराब झाल्याने हे आंदोलन पुकारण्यात आले आहे.
24 Jun 2026 02:45 PM (IST)
आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी प्रस्थानला सुरुवात
जळगावात आदिशक्ती मुक्ताईच्या पालखी प्रस्थानला सुरुवात झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील, गिरीश महाजन यांच्या हस्ते महाआरती सुरु.
24 Jun 2026 02:09 PM (IST)
चंद्रपूर : तीन दिवसांच्या दमदार पावसानंतर पेरण्यांना वेग
चंद्रपूर जिल्ह्यात मागील तीन दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील पेरण्यांना वेग आला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी आता शेतात उतरला असून सोयाबीन आणि कापूस पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. कृषी विभागाने 75 ते 100 मिलीमीटर पाऊस आणि जमिनीत किमान सहा इंच ओलावा झाल्यानंतरच पेरणी करण्याचे आवाहन केले होते. जून महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसामुळे ही अट पूर्ण झाली असून जिल्हाभरात पेरणीची लगबग सुरू आहे.
24 Jun 2026 01:00 PM (IST)
सोलापूर विद्यापीठात कुलगुरुंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर उधळला भंडारा
सोलापूर विद्यापीठात कुलगुरुंसह अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील अहिल्यादेवींच्या स्मारकाचं काम संथ गतीने सुरू असल्याने पदाधिकारी आक्रमक झाले. स्मारक समितीमधील पदाधिकारी शरणू हांडे यांनी हा भंडारा उधळला. अहिल्यादेवी स्मारक समितीतील अधिकाऱ्यांना सुबुद्धी यावे यासाठी भंडारा उधळल्याचा दावा करण्यात आला. कुलगुरु प्रकाश महानवर यांच्यासह अधिकाऱ्यांच्या अंगावर भंडारा उधळल्यानंतर काळे वस्त्र दाखवत निषेध व्यक्त केला.
24 Jun 2026 12:50 PM (IST)
बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीचे छापे
बेळगाव – सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांचे जावई आणि बेळगावचे अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला आहे. बेळगाव, म्हैसूर, बंगळूर आणि आरसिकेरे यासह सहा ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले आणि अनेक ठिकाणी वाय मंजुनाथ यांच्याशी संबंधित कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी मंजुनाथ यांच्या म्हैसूरमधील एका मित्राच्या घरावर, बंगळूरमधील एका अपार्टमेंटवर, हसन जिल्ह्यातील आरसिकेरे येथील एका जवळच्या मित्राच्या घरावर आणि अथणी तालुक्यातील ऐनापूर गावातील एका मित्राच्या घरावरही छापे टाकले आहेत.
24 Jun 2026 12:40 PM (IST)
लग्नपत्रिकेवरती आता नवरा-नवरीच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार
लग्नपत्रिकेवरती आता नवरा-नवरीच्या नावापुढे जन्मतारीख लिहावी लागणार आहे. राज्य सरकार लवकरच हा नियम लागू करणार आहे. राजस्थान सरकारच्या निर्णयानंतर आता महाराष्ट्र सरकारही निर्णय घेणार आहे. बालविवाहाचं धक्कादायक वास्तव समोर आल्यानंतर सरकारला जाग आली आहे. परभणी जिल्हात 48% मुलींचं अल्पवयात लग्न झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांत बालविवाहाचं प्रमाण चिंताजनक असल्याची माहिती विधानसभेत सरकारकडून सादर करण्यात आली.
24 Jun 2026 12:30 PM (IST)
लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा; 12,415 शासकीय कर्मचारी लाभार्थी, वसुलीची कारवाई सुरू
लाडकी बहीण योजनेत मोठा घोटाळा झाला आहे. 12,415 शासकीय कर्मचारी लाभार्थी असून त्यांच्याकडून वसुलीची कारवाई सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेत 12,415 शासकीय महिला कर्मचाऱ्यांनी नियमबाह्य लाभ घेतल्याचं सरकारकडून मान्य करण्यात आलं. अपात्र लाभार्थ्यांनी मिळून सुमारे 165 कोटींचा लाभ घेतल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला. पुरुष लाभार्थीही आढळल्याने त्यांचे हप्ते तात्काळ बंद करण्यात आले असून रक्कम वसुलीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच e-KYC पूर्ण न केलेल्या लाभार्थी महिलांचाही लाभ थांबविण्यात आला आहे.
24 Jun 2026 12:20 PM (IST)
प्रवरानगर इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात शरद पवार यांचं आगमन
प्रवरानगर इथल्या रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालयात शरद पवार यांचं आगमन झालं आहे. कनिष्ठ महाविद्यालयाचा आज अमृतमहोत्सव आणि माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते शरद पवार, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार निलेश लंके यांची प्रमुख उपस्थिती आहे. शरद पवार हे महात्मा गांधी विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. 1954/55 साली शरद पवार प्रवरानगर इथं शिक्षण घेत होते.
24 Jun 2026 12:15 PM (IST)
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत चर्चा
स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत चर्चा होत आहे. 100 टक्के फिडरवर स्मार्ट मीटर लागले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. 2029-30 मध्ये महाराष्ट्राचं टॅरिफ 7.40 रुपये असेल, असंही ते म्हणाले. “उद्योगांमध्ये विजेचा वापर प्रचंड वाढला आहे. राज्यात उद्योग येत आहेत, तसा विजेचा वापरही वाढतोय. गेल्या दोन वर्षांत वीजेची मागणी वीस टक्के वाढली आहे”, असं फडणवीस पुढे म्हणाले.
24 Jun 2026 12:10 PM (IST)
जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेचं भीक मांगो आंदोलन
जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेकडून भीक मांगो आंदोलन करण्यात आलं असून जिल्हाप्रमुखासह शहर प्रमुखांनी खोके आणि लोटा घेऊन भीक मागितली. ठाकरे यांच्या शिवसेनेतून फुटलेल्या 6 खासदारांच्या विरोधात जालन्यात ठाकरेंची सेना आक्रमक झाली आहे. यावेळी घोषणाबाजी करत त्यांनी जोरदार निषेध केला. फुटलेल्या खासदारांना निधी म्हणून जालना शहरातील बस स्थानक आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांकडे भीक मागत आंदोलन केलं.
24 Jun 2026 11:57 AM (IST)
धुळे जिल्ह्यासाठी पुढील 3 तास ऑरेंज अलर्ट
धुळे जिल्ह्यासाठी पुढील 3 तास ऑरेंज अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आवाहन. भारतीय हवामान विभाग, मुंबई यांनी धुळे जिल्ह्यासाठी पुढील तीन तासांसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, मेघगर्जना, विजांचा कडकडाट तसेच जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.
24 Jun 2026 11:47 AM (IST)
राहुल नार्वेकरांना मनसेने मराठी शुद्धलेखनाची पुस्तके पाठवली
मनसेच्या वतीने विधान परिषदेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांविरोधात निदर्शने. राहुल नार्वेकर यांना मनसे पदाधिकाऱ्यांनी मराठी शुद्धलेखनाची पुस्तके पोस्टामार्फत पाठवली. विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना आज आम्ही मराठी पुस्तके पाठवत आहोत. त्यांनी लवकरात लवकर मराठी भाषा शिकावी अन्यथा त्यांच्या चेहऱ्यावर बाराखडी काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसेने दिला आहे.
24 Jun 2026 11:20 AM (IST)
ठाकरेंच्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावलं
फुटीर खासदारांनंतर ठाकरेंच्या खासदारांना लोकसभा अध्यक्षांनी भेटीसाठी बोलावलं. फुटीर खासदारांच्या गटाला परवानगी देऊ नका अशी विनंती करणार. अरविंद सावंत, अनिल देसाई लोकसभा अध्यक्षांची भेट घेणार.
24 Jun 2026 11:08 AM (IST)
वाचन करताना माझ्याकडून चूक घडली – राहुल नार्वेकर
सर्वांसारखा मराठीचा अभिमान मलाही आहे. वाचन करताना माझ्याकडून चूक घडली. घडलेल्या घटनेबाबत दिलगिरी व्यक्त करतो. सभागृहाची कार्य पद्धती मराठीतून हाताळली आहे. प्रिंट अस्पष्ट होती, फॉन्ट लहान होता असं स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलं आहे.
24 Jun 2026 10:57 AM (IST)
जळगावच्या पारोळा तालुक्यातील वेल्हाणे खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत तोडफोड..
शाळेतील शौचालयाचे दरवाजे, प्रसाधनगृह तसेच नळ कनेक्शनची तोडफोड केल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने तोडफोड केल्याची माहिती समोर आली असून यासंदर्भात कारवाईची मागणी केली जात आहे. ग्रामसेवक तसेच गावातील पोलीस पाटील यांनी घटनेची गंभीर दखल घेत कारवाई संदर्भात पाऊल उचलले आहेत. शाळा संपल्यानंतर शाळेत कोणीही जाऊ नये तसेच जाणाऱ्या वर कारवाई केली जाणार असल्याच्या सूचना दवंडीद्वारे गावात देण्यात आले आहे.
24 Jun 2026 10:47 AM (IST)
जळगाव शहरात उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ४८ तळीरामांवर पोलिसांची कारवाई
जळगाव शहरात उघड्यावर मद्यपान करणाऱ्या ४८ तळीरामांवर पोलिसांची कारवाई करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालय परिसरात सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या ७१ जणांवर देखील कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या विशेष मोहिमेत शहरातील तसेच शहरालगत १५३ हॉटेल, ढाबे, कॅफेची देखील तपासण्यात आलेत. मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करून वाहतूक नियम मोडणाऱ्या वाहनचालकांकडून ५ लाख १६ हजार ४०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
24 Jun 2026 10:35 AM (IST)
सिडकोतील फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्रीस्कूलमधील 23 महिन्याच्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्याकडून मारहाणीचा आरोप
सिडकोतील फर्स्टक्राय इंटेलिटॉट्स प्रीस्कूलमधील 23 महिन्याच्या विद्यार्थ्याला विद्यार्थ्याकडून मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे, घटनेचा सीसीटीव्ही समोर आला असून बराच वेळ सुरू असलेल्या वादात शाळेतील कुणाचाही हस्तक्षेप नाही. शाळेच्या प्राचार्य, सीईओ, मालक, रिजनल मॅनेजर व महाराष्ट्र हेड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शाळा प्रशासनाने निष्काळजीपणा केल्याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 महिन्याच्या बालकावर छत्रपती संभाजी नगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
24 Jun 2026 10:25 AM (IST)
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा साखळी शिरपूर सह धुळे तालुक्यात दोन दिवसापासून काही प्रमाणात पाऊस..
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा साखळी शिरपूर सह धुळे तालुक्यात दोन दिवसापासून काही प्रमाणात पाऊस सुरु झाला आहे. पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे. गेल्या पंधरा दिवसापासून रखडलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्यांना सुरुवात केली. पुढे देखील समाधानकारक पाऊस पडावा शेतकऱ्यांची अपेक्षा…
24 Jun 2026 10:15 AM (IST)
जळगावच्या अमळनेरात मध्यरात्री पावसाची दमदार एन्ट्री..
अमळनेर शहरासह तालुक्यातील विविध ग्रामीण भागांत जोरदार पाऊस झाला आहे. पहिल्याच पावसात अमळनेर शहरातील तुडुंब भरलेल्या नाल्यांमधील पाणी रस्त्यावर आलं आहे. रेल्वे बोगद्यातून नाल्याच्या साचलेल्या घाणेरड्या पाण्यातून वाहनधारकांचा प्रवास सुरु आहे. अमळनेर शहरातील प्रांताधिकारी कार्यालयातील आवारात देखील पावसाचे पाणी साचले आहे.
24 Jun 2026 09:51 AM (IST)
चाळीसगावात मध्यरात्री पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; 44 सराईत गुन्हेगार ताब्यात
चाळीसगावात मध्यरात्री पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन करत 44 सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतलं. पोलीस दलाच्या मोठ्या फौजफाट्यासह मध्यरात्री धडक कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं. शस्त्र कायद्याचा गुन्हा दाखल झाला असून प्राणघातक शस्त्र जप्त करण्यात आली. तसेच 60 लिटर गावठी दारू नष्ट केली आणि तीन वाहनेही जप्त करण्यात आली.
24 Jun 2026 09:41 AM (IST)
टीव्ही9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट, अंधेरी सबवेबाहेरील उघड्या मॅनहोलला तत्काळ बॅरिकेडिंग
टीव्ही9 मराठीवर बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. अंधेरी सबवेच्या बाहेरील उघड्या मॅनहोलला बीएमसी आणि पोलिसांनी तातडीने बॅरिकेडिंग केलं आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार सबवेबाेर असलेलं हे मॅनहोल काल रात्रीपासून उघडा होतं. पावसामुळे रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने हे मॅनहोल दिसतही नव्हता. त्यामुळे इथे मोठा अपघात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.
टीव्ही9 मराठीने या धोकादायक मॅनहोलची बातमी दाखवली. बातमी प्रसारित होताच बीएमसी आणि मुंबई पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने मॅनहोलभोवती बॅरिकेडिंग करून सुरक्षा व्यवस्था केली.
24 Jun 2026 09:31 AM (IST)
विक्रोळी पश्चिम येथे संरक्षक भिंत कोसळली
विक्रोळी पश्चिम येथील जेव्हीएलआर (JVLR) मार्गावरील सनसिटी कॉम्प्लेक्समध्ये, आणि सनहाइट्स इमारतीलगत असलेली सुमारे 50 मीटर लांबीची संरक्षक भिंत रात्री १.३० वाजता कोसळली. भिंत रस्त्यालगत असल्याने परिसरात सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाले आहेत . घटनास्थळी स्थानिकांची मोठी गर्दी जमली आहे.
24 Jun 2026 09:25 AM (IST)
अंधेरी सबवेबाहेर उघड्या मॅनहोलचा धोका
मुंबई उपनगरात सध्या काल रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आणि अंधेरी सबवे पण वाहनांसाठी सुरू आहे. मात्र सबवेच्या बाहेर असलेला हा उघडा मॅनहोल मोठ्या दुर्घटनेचे कारण ठरण्याची शक्यता आहे.
पावसामुळे अंधेरी सबवेच्या बाहेर गुडघाभर पाणी साचतं. पाण्यामुळे रस्त्यावर काहीच दिसत नाहीये, अशा स्थितीत उघडा मॅनहोल नागरिकांसाठी जीवघेणा ठरू शकतो.
24 Jun 2026 09:17 AM (IST)
पावसाने मध्य रेल्वेची गती मंदावली
पावसाने मध्य रेल्वेची गती मंदावली. एकीकडे मध्य रेल्वे विस्कळीत झाली असून रोज उशिरा येणाऱ्या 8:33 लोकलमुळे प्रवासी संतापले आहेत. पावसामुळे मध्य रेल्वे 5 ते 7 मिनिटे उशिराने घावत अून कल्याण स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे.
बदलापूर लोकलला प्राधान्य, कल्याण लोकलकडे दुर्लक्ष कल्याणकरांसोबत दुजाभाव केला जातो का असा सवाल उपस्थित होत आहे.
वारंवार पत्रव्यवहार करूनही रेल्वे प्रशासन कडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी नोंदवली.
24 Jun 2026 09:12 AM (IST)
विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्र्यांचा केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन
बीड – विलास घुले हत्या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केज पोलीस ठाण्यासमोरील आंदोलकांना फोन केला. रमेश घुले यांचा पुरवणी जबाब नोंदविल्यानंतर केज पोलीस ठाण्यात ठेवलेल्या विलास घुलेच्या पार्थिवावर रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. सखोल चौकशी करण्याचे आश्वासन पोलीस अधीक्षक नवनीत कॉंवत यांनी दिलं.
24 Jun 2026 09:03 AM (IST)
ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात हॉटेलच्या छतावरती कोसळलं झाड , वाहतुकीसाठी अडथळा
ठाण्यातील पाचपाखाडी परिसरात दुर्गा विहार हॉटेलच्या छतावरती झाड कोसळलं आहे. भले मोठे झाड रस्त्याच्या मधोमध पडल्यामुळे वाहतुकीसाठी अडथळा होत आहे. सुदैवाने यात कोणालााही दुखापत झालेली नाही. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून झाड हटवण्याचं काम सुरू आहे.
24 Jun 2026 08:50 AM (IST)
नंदुरबारमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात
नंदुरबार शहरासह परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण होत रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. ढगांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या रिमझिम पावसामुळे नुकत्याच लागवड करण्यात आलेल्या पिकांना दिलासा मिळणार आहे. पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होऊन पिकांना आणि उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
24 Jun 2026 08:40 AM (IST)
कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरण सह रिमझिम पावसाची हजेरी
अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर गेल्या दोन दिवसांपासून शहरात पावसाची सुरुवात. काल काही भागांत पावसाचा जोर वाढल्याने पाणी साचल्याच्या घटना. मात्र काही वेळातच पावसाचा वेग कमी होताच साचलेल्या पाण्याचा झाला निचरा. उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
24 Jun 2026 08:35 AM (IST)
देवळाली प्रवरा येथे विजेच्या तारा कोसळून 8 गायींचा दुर्देवी मृत्यू…
वादळी वाऱ्यासह पावसामुळे वीजवाहिन्या तुटल्या. गोठ्याच्या परिसरात विद्युत प्रवाह पसरल्याने जनावरांचा शॉक बसून मृत्यू. मच्छिंद्र बापू काळे यांचे मोठे आर्थिक नुकसान. काही क्षणांतच 8 गायी जागीच मृत्युमुखी. घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त. नगराध्यक्ष सत्यजीत कदम , शेतकरी सेनेचे रवि मोर यांची घटनास्थळी भेट…
24 Jun 2026 08:30 AM (IST)
कांदिवली पूर्व हनुमान नगरमधील राधा कृष्ण सोसायटीत घरांमध्ये पाणी
कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता थेट लोकांच्या घरापर्यंत पोहोचला आहे. कांदिवली पूर्व हनुमान नगर येथील राधा कृष्ण सोसायटीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याचे समोर आले आहे. राधा कृष्ण सोसायटीतील रहिवाशांच्या घरात रात्री पाणी शिरले. त्यामुळे या सोसायटीतील लोकांनी रात्रभर घरातील पाणी बाहेर काढण्याचे काम केले.
24 Jun 2026 08:26 AM (IST)
गोकुळ गीते यांच्या विजय मिरवणुकीत चोरट्यांचा डल्ला
विजय मिरवणुकीच्या जल्लोषात गर्दीत चोरट्यांनी केली हातसफाई. गर्दीचा फायदा घेत दोन जणांच्या गळ्यातील सुमारे सात लाख रुपयांच्या सोनसाखळी केल्या चोरी. गोकुळ गीते यांच्या मिरवणुकीत सहभागी झालेले येवला येथील ठेकेदार शुभम पाटील आणि मनोज इघे यांच्या सोन साखळीवर मारला चोरट्यांनी डल्ला
24 Jun 2026 08:25 AM (IST)
ठाणे ते वाशी दरम्यान बरोबर ट्रान्स हर्बल रेल्वे विस्कळी
१ तासानंतर पहिली रेल्वे ठाणे ते पनवेल जाणारी लोकल सोडत आहे.. फलाट वर रेल्वे गाडी पकडण्यासाठी गर्दी. पावसाचा फटका ट्रान्स हार्बर मार्गावर बसला आहे. तुर्भे आणि कोपरखैरणेच्या ठिकाणी तांत्रिक बिघाड झाला होता….