Vyatipat Yog 2026 : जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच जुळून येणार अशुभ ‘व्यतिपात योग’; ‘या’ 5 राशींना आतापासूनच सावधानतेचा इशारा


Vyatipat Yog 2026 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, येत्या 10 जुलै 2026 रोजी व्यतिपात योग निर्माण होणार आहे. हा एक अत्यंत महत्त्वाचा आणि सतर्क करणारा योग मानला जातो. द्रिक पंचांगानुसार, हा योग सकाळी 6 वाजून 53 मिनिटांनी सुरु होऊन दुपारी 12 वाजून 27 मिनिटांपर्यंत प्रभावी असणार आहे. सूर्य आणि चंद्राच्या विशेष स्थितीने निर्माण होणारा हा योग फार आव्हानात्मक आणि क्रूर मानला जातो. याचा नकारात्मक प्रभाव व्यक्तीच्या निर्णयावर, आर्थिक स्थितीवर आणि मानसिक आरोग्यावर होतो. 

या काळात 5 राशींच्या लोकांना सावधानता बाळगण्याची गरज आहे. या राशी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात. 

वृषभ रास (Taurus Horoscope)

वृषभ राशीच्या लोकांना या काळात आर्थिक बाबतीत सावध राहण्याची गरज आहे. तुमच्या खर्चात अचानक वाढ होऊ शकते. तसेच, पैशांच्या बाबतीत गुंतवणूक करताना सावधानता बाळगा. घरातील शुभ कार्यात सहभागी न होऊ शकल्याने कुटुंबीय तसेच, नातेवाईक नाराज होण्याची शक्यता आहे. 

मिथुन रास (Gemini Horoscope)

मिथुन राशीच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर याचा जास्त परिणाम होऊ शकतो. तसेच, कामाच्या ठिकाणी कोणत्याही कागदपत्रांवर विचार न करता सही करु नका. व्यवसायिक निर्णय घेताना नीट विचारपूर्वक घ्या. तसेच, या कालावधीत तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. 

सिंह रास (Leo Horoscope)

सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ मानसिक अशांती आणि दबावाचा असण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गातील लोकांना कामाचा विनाकारक ताण जाणवेल. अधिकाऱ्यांशी ताळमेळ जुळवून घेण्यात तुम्हाला अडचणी जाणवतील. तसेच, नात्यात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. 

कुंभ रास (Aquarius Horoscope)

कुंभ राशीच्या लोकांना संपत्ती आणि नवीन प्रोजेक्टच्या बाबतीत सावधानता बाळगण्याची गरज आहे. 10 जुलैच्या रोजी कोणत्याही नवीन प्रोजेक्टची सुरुवात तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. तुमच्या व्यवसायात मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. या काळात नवीन वस्तूंची खरेदी करताना सावधानता बाळगा. 

मकर रास (Capricorn Horoscope)

मकर राशीच्या लोकांसाठी देखील हा योग नुकसानकारक ठरणार आहे. या काळात तुम्हाला शारीरिक थकवा जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत निर्णय घेताना सावधानता बाळगा. कोणतीही मोठी डील हाती घेऊ नका. तसेच, कोणाला पैसे उधारही देऊ नका. 

(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Nirjala Ekadashi 2026 : निर्जला एकादशी का साजरी करतात? सर्व राशींनी करा ‘हे’ उपाय, वाचा ज्योतिषशास्त्रात काय म्हटलंय…



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *