Ketan Murder Case: केतनच्या हत्येसाठी राजा रघुवंशी पॅटर्न; सोनम रघुवंशीप्रमाणेच सियाकडून खूनाची प्लॅनिंग… मर्डर पॅटर्नने हादरले पोलीस – Marathi News | Pune Ketan Agarwal Murder Case Raja Raghuvanshi pattern used for Ketan murder Siya Goyal planned the killing just like Sonam Raghuvanshi Police shaken by the modus operandi


केतनच्या हत्येसाठी राजा रघुवंशी पॅटर्न

Ketan Agarwal Murder Case: अगोदर मुस्कान, मग सोनम आणि आता सिया… या तिघींनी क्रुरतेचा कळस गाठला आहे. मनाप्रमाणे सर्व काही करण्यासाठी या तिघींनी आयुष्यात आलेल्या तरुणांचा कायमचा काटा काढला. या तीनही प्रकरणातील तरुणांची काहीच चुकी नव्हती. इंदुरच्या सोनम हिला लोक विसरले नाहीत. तोच सिया गोयलने देशाला हादरवले. सोनमप्रमाणेच तिने आयुष्यात नवीन एंट्री झालेल्या तरुणाची हत्या केली. खून केल्यानंतर त्याच्या घरी गेली. व्हिडिओ तयार केले. शोक व्यक्त केला. सोनम आणि मुस्कान यांनी केलेल्या हत्येचाच पॅटर्न सियाने अंमलात आणल्याचे समोर येत आहे.

18 जून रोजी लोहगड किल्ल्याजवळ केतन अग्रवाल याची खोल दरीत पडून मृत्यू झाला. पोलिसांनी ही दुर्घटना असल्याचे मानून आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सुरुवातीला सिया गोयलविषयी सुहानुभूती होती. कारण लग्नापूर्वीच तिचा होणारा नवरा दरीत कोसळून मयत झाला होता. दोन्ही कुटुंबावर एकप्रकारे दुखाचा डोंगर कोसळला होता. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, 19 जून रोजी सिया गोयलचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने केतन त्याच्या काही मित्रांसह आणि सियासोबत ट्रेकिंगसाठी गेला होता. सियानेच केतनला धक्का दिला आणि त्याचा मृत्यू झाला.

सोनम रघुवंशीने अशीच केली राजाची हत्या

इंदुरच्या सोनम रघुवंशीने राजा रघुवंशी याची याच पद्धतीने हत्या केली होती. तिने लग्नानंतर पती राजा रघुवंशी याला मेघालय राज्यातील शिलांग जवळील चेरापुंजी येथे पर्यटनासाठी नेले. या दरम्यान सोशल मीडियावर दोघांचे प्रेमाचे, एकमेकांसोबतचे गुडगुडी व्हिडिओज तिने शेअर केले. तिचे पतीवर किती प्रेम आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला. पण चेरापुंजी येथील एका खोल दरीत तिने प्रियकर आणि इतर साथीदारांच्या मदतीने त्याचा निर्घृण खून केला. राजा स्वतःला वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केले. पण अखेरच्या क्षणी सोनमने त्याला खोल दरीत ढकलून दिले. राजाच्या हत्येनंतर ती उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे लपली होती. आता या घटनेला अनेक महिने उलटून गेले तरी सोनमला राजाचा खून केल्याचा कुठलाही पश्चाताप नसल्याचा दावा समोर आला आहे.

सोनमसारखाच पॅटर्न

सिया गोयलने सोनम आणि राजा रघुवंशीची कथा वाचल्याचा अंदाज बांधल्या जात आहे. तिने सोनम प्रमाणेच केतनची हत्या करण्याची योजना आखली. त्यासाठी प्रियकर चेतन चौधरीची मदत घेतली. त्याला ट्रेकिंगसाठी लोहगड येथे घेऊन गेली. त्यानंतर संधी मिळताच दोघांनी केतन अग्रवाल याला खोल दरीत ढकलले. त्यानंतर आरडाओरड केली. दुख व्यक्त केले. सोशल मीडियावर शोक भावना व्यक्त केल्या. केतनच्या घरी त्याच्या कुटुंबाला भेटायला गेली. पण सियाची ही चालाखी जास्तवेळी लपली नाही. तिच्या डिजिटल रेकॉर्डने तिचे मनसुबे समोर आले. तिची काळी बाजू समोर आली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *