टीम इंडियात वैभव सूर्यवंशीला कपडे बदलण्यासाठी मिळणार स्पेशल रूम! असं करण्याचं कारण समजून घ्या – Marathi News | Vaibhav Sooryavanshi to get a special changing room in Team India for england tour know why


टीम इंडियात वैभव सूर्यवंशीला कपडे बदलण्यासाठी मिळणार स्पेशल रूम! वेगळं करण्याचं कारण समजून घ्याImage Credit source: GETTY IMAGES

आयर्लंड विरूद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडिया आयर्लंडमध्ये दाखल झाली आहे. भारत आणि आयर्लंड यांच्यातील पहिला सामना 26 जून रोजी होणार आहे. या दौऱ्यात टीम इंडियासोबत 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी आहे. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेसाठी त्याची संघात निवड केली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची शक्यता वाढली आहे. खरं तर त्याचं पदार्पण टीम इंडियात होणार हे निश्चित आहे. आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळताच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणारा सर्वात कमी वयाचा भारतीय क्रिकेटपटू ठरेल. त्याच्या पदार्पणापूर्वी काही आश्चर्यकारक बातम्याही समोर येत आहे. इंग्लंड मीडियानुसार, वैभव सूर्यवंशी टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये कपडे बदलू शकत नाही, वैभव सूर्यवंशीला वेगळी स्पेशल ड्रेसिंग रूम द्यावी लागेल. आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा तसाच नियम आहे.

वैभव सूर्यवंशी टीम इंडियाचा ड्रेसिंग रूम का वापरू शकत नाही?

आयसीसी आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डाचा नियम आहे की, 16 वर्षांपेक्षा कमी वयाच्या खेळाडूंना सिनिअर खेळाडूंसोबत चेजिंग रुमचा वापर करू शकत नाही. यासाठी वैभव सूर्यवंशीला इंग्लंडच्या प्रत्येक मैदानात एक वेगळं चेजिंग रूम मिळेल. जिथे त्याचे आई वडीलही असतील. वैभव सूर्यवंशीला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये जाण्याची परवानगी फक्त सामना आणि टीम मीटिंगमध्ये दिली जाईल. इंग्लंडमध्ये या नियमाचं पालन कठोरपणे केलं जातं. फुटबॉल संघ असलेल्या आर्सनलच्या मॅक्स डोमॅन यालाही मागच्या पर्वापर्यंत वेगळं चेजिंग रूम दिली जात होती. जेव्हा डिसेंबर 2025 मध्ये16 वर्षांचा झाला तेव्हा त्याला सिनिअर खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची परवानगी मिळाली.

वैभव सूर्यवंशीच्या बाबतीतही हाच नियम लागू होणार आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. ईसीने गार्डीयनशी बोलताना सांगितलं की, इंग्लंडमध्ये या नियमाचं पालन केलं जातं. संपूर्ण दौऱ्यात वैभव सूर्यवंशी आपल्या कुटुंबियांसोबत राहिल. त्यांना एकचा हॉटेलमध्ये राहावं लागेल. कदाचित एकाच रूममध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली जाऊ शकते.

सर्वात कमी वयात पदार्पण

वैभव सूर्यवंशीचं आयर्लंडमध्ये पदार्पण होईल असं बोललं जात आहे. पण त्या दौऱ्यात खेळण्याची संधी मिळाली नाही तर नक्कीच इंग्लंड दौऱ्यात संधी मिळेल. इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत पदार्पण करेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *