INDW vs BANW : टीम इंडियासमोर तिसऱ्या विजयासाठी 137 धावांचं आव्हान, बांगलादेश विरुद्ध मोठी संधी, नक्की काय? – Marathi News | Indw vs banw icc t20i world cup 2026 bangladesh set 137 runs target against india at manchester


Yastika Bhatia Smriti Mandhana Womens Team IndiaImage Credit source: bcci women X Account

वुमन्स टीम इंडियाच्या गोलंदाजांनी आयसीसी टी 20I वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील 23 व्या सामन्यात बांगलादेश विरुद्ध चिवट बॉलिंग केलीय. भारतीय गोलंदाजांच्या चिवट बॉलिंगसमोर बांगलादेशला 140 हा आकडाही गाठता आला नाही. बांगलादेशने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 136 धावा केल्या. त्यामुळे आता टीम इंडियाला 137 धावांचं आव्हान मिळालं आहे. टीम इंडियाने या मोहिमेत आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. त्यामुळे टीम इंडियाला तिसरा विजय मिळवायचा असेल तर बांगलादेश विरुद्ध 6.85 च्या रनरेटने धावा कराव्या लागणार आहेत. त्यामुळे टीम इंडिया हे आव्हान किती ओव्हरमध्ये पूर्ण करते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बांगलादेशने टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र बांगलादेशच्या फक्त 5 फलंदाजांनाच दुहेरी आकडा गाठता आला. या 5 फलंदाजांना अपेक्षित सुरुवात मिळाली. मात्र त्यापैकी एकीलाही या खेळीचं मोठ्या आकड्यात रुपांतर करता आलं नाही. भारतीय गोलंदाजांनी एकीलाही मोठी खेळी करण्याआधीच मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

बांगलादेशची बॅटिंग

बांगलादेशसाठी जुवैरिया फिरदौस हीने सर्वाधिक 33 धावा केल्या. कॅप्टन निगर सुल्ताना हीने 27 चेंडूत 32 धावा केल्या. या खेळीत तिने 4 चौकार लगावले. शोभना मोस्त्री हीने 22 रन्स केल्या. शोरना अक्टर हीने 13 रन्स करुन मैदानाबाहेरचा रस्ता धरला. शार्मिन अक्टर हीने नाबाद 10 धावा केल्या. शार्मिन रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर गेली. तर इतरांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही.

टीम इंडियासाठी राधा यादव हीने सर्वाधिक 3 विकेट्स मिळवल्या. श्री चरणी हीने दोघींना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर रेणूका सिंग ठाकुर आणि नंदीनी शर्मा या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट मिळवली. टीम इंडियाकडे झटपट 137 धावा करुन नेट रनरेट आणखी चांगला करण्याची संधी आहे. त्यामुळे महिला ब्रिगेड हे आव्हान किती बॉलआधी पूर्ण करते यासाठी निकालाची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

टीम इंडिया पॉइंट्स टेबलमध्ये कितव्या स्थानी?

दरम्यान टीम इंडिया ए ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. टीम इंडियाने आतापर्यंत 3 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर 1 सामना गमावला आहे. टीम इंडिया 4 गुणांसह दुसऱ्या स्थानी विराजमान आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *