‘भाई, माझं काम झालंय, मी परत येतोय..’ रिषभ पंतचा पहिला फोन जिगरी दोस्ताला, पण दोनवेळा करूनही उचललाच नाही! आता बापूनं सांगितलं नेमकं घडलं तरी काय?


Axar Patel on Rishabh Pant: लखनऊ सुपर जायंट्स (LSG) मधील दोन वर्षांच्या खराब कामगिरीनंतर रिषभ पंत पुन्हा एकदा दिल्ली कॅपिटल्स (DC) संघात परतला आहे. दोन्ही फ्रेंचायझींमधील ट्रेड पूर्ण झाल्यानंतर त्याचे पुनरागमन निश्चित झाले. या पुनरागमनासाठी पंतने ₹12 कोटींची मोठी कपात (Pay Cut) स्वीकारली आहे. दुसरीकडे हा करार पूर्ण झाल्यानंतर रिषभ पंतने सर्वात आधी दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आणि त्याचा भारतीय संघातील सहकारी जिगरी दोस्त अक्षर पटेलला फोन केला.

अक्षरने सुरुवातीला फोन उचलला नाही

अक्षर पटेल त्यावेळी आपल्या लहान मुलासोबत वेळ घालवत असल्याने त्याचा फोन बाजूला होता. त्यामुळे पंतने केलेले पहिले दोन फोन अक्षरकडून मिस झाले. नंतर मुलाला झोपवल्यानंतर जेव्हा अक्षरने उलट फोन केला, तेव्हा पंतने त्याला “भाई, हे कन्फर्म झालंय. मी परत येतोय” (Bhai, it’s confirmed. Main wapas aa raha hu) असे सांगून ही आनंदाची बातमी दिली.अक्षरने स्पष्ट केले की, कर्णधार म्हणून तो पंतला खेळण्याचे पूर्ण स्वातंत्र्य देईल. त्यांच्यातील नाते कधीही ‘एक जण नेतृत्व करतोय आणि दुसरा ऐकतोय’ असे नव्हते, तर नेहमीच परस्पर सामंजस्याचे राहिले आहे.

दडपण न घेण्याचा सल्ला 

अक्षरने एक मित्र आणि कर्णधार या नात्याने पंतला सांगितले की, त्याने फ्रेंचायझीचे किंवा कर्णधाराचे कोणतेही अतिरिक्त दडपण घेऊ नये. दिल्ली हे त्याचे घर आहे आणि त्याने फक्त आपल्या नैसर्गिक शैलीत खेळून आनंद घ्यावा. लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात पंतला ₹27 कोटींना खरेदी केले होते, पण 2026 च्या हंगामात पंतला केवळ 312 धावाच करता आल्या. दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून अक्षर पटेललाही 2026 चा हंगाम कठीण गेला; त्याने 14 सामन्यांत 11 विकेट्स घेतल्या आणि केवळ 173 धावा केल्या.

इतर महत्वाच्या बातम्या





Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *