तुमची जन्मतारीख 4, 13, 22 किंवा 31 आहे का? मग या चुका टाळा, नाहीतर पश्चातापाची वेळ | राशी भविष्य (Rashi Bhavishya in Marathi)


Last Updated:

कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. अंकशास्त्रानुसार मूलांक 4 वर राहू ग्रहाचा प्रभाव असतो. 

+

News18

News18

पुणे : अंकशास्त्रानुसार व्यक्तीचा स्वभाव, करिअर, आर्थिक स्थिती आणि आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा अंदाज मूलांकावरून लावता येतो. एखाद्या व्यक्तीचा जन्म महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला झाला असेल, तर त्याचा मूलांक 4 मानला जातो. हा मूलांक राहू ग्रहाशी संबंधित मानला जातो. मूलांक 4 असलेल्या व्यक्तींच्या स्वभावापासून ते करिअरपर्यंत अनेक गोष्टींबाबत माहिती मिळू शकते. याबाबतची माहिती ज्योतिषतज्ज्ञ तृप्ती भोसले यांनी लोकल 18 ला दिली आहे.

तर अशा असतात मूलांक 4 च्या व्यक्ती

तृप्ती भोसले यांनी सांगितले की, कोणत्याही महिन्याच्या 4, 13, 22 किंवा 31 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मूलांक 4 असतो. अंकशास्त्रानुसार मूलांक 4 वर राहू ग्रहाचा प्रभाव असतो. त्यामुळे या व्यक्तींचा स्वभाव इतरांपेक्षा काहीसा वेगळा असतो. मूलांक 4 असलेल्या व्यक्ती मेहनती, जिद्दी आणि आपल्या निर्णयांवर ठाम असतात. एखादे ध्येय ठरवले की ते पूर्ण करण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करतात. कोणतेही काम घाईघाईने करण्यापेक्षा विचारपूर्वक नियोजन करून निर्णय घेणे त्यांना अधिक पसंत असते.

वेळेचे महत्त्व त्यांना चांगले समजते, त्यामुळे ते शिस्तबद्ध पद्धतीने काम करतात. नवीन गोष्टी जाणून घेण्याची आणि माहिती मिळवण्याची उत्सुकता त्यांच्यात कायम असते. तसेच ते स्पष्टवक्ते असल्याने आपल्या मतांबाबत प्रामाणिकपणे भूमिका मांडतात. कामासोबतच आयुष्याचा आनंद घेणे, नवीन ठिकाणी फिरणे आणि विविध अनुभव घेणे यांचाही त्यांना विशेष छंद असतो.

मूलांक 4 च्या लोकांनी या गोष्टीची काळजी घ्या

मूलांक 4 असलेल्या व्यक्तींमध्ये जिद्द, मेहनत आणि निर्णयक्षमता हे गुण असले तरी त्यांना राग लवकर येणे, हट्टीपणा आणि स्वतःच्या मतांवर ठाम राहण्याची प्रवृत्तीही असू शकते. त्यामुळे काहीवेळा नातेसंबंध किंवा कामाच्या ठिकाणी मतभेद निर्माण होण्याची शक्यता असते. अशा व्यक्तींनी संयम राखणे आणि समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर करणे गरजेचे असते. मूलांक 4 साठी निळा, राखाडी आणि तपकिरी हे रंग शुभ मानले जातात. तसेच शनिवार हा दिवसही त्यांच्यासाठी शुभ असतो. मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी मोबाईल, टॅब किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर मोकळ्या आकाशाचा किंवा शांत निसर्गाचा फोटो ठेवणे फायदेशीर ठरू शकते, असे भोसले यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *