Sanjay Dina Patil Opration Tiger Uddhav Thackeray: शिवसेना ठाकरे गटाच्या 6 बंडखोर खासदारांचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत काल (22 जून) अधिकृत प्रवेश झाला. आम्ही जे करतो ते फुलप्रुफ करतो. त्यामुळे ऑपरेशन टायगर (Opration Tiger) यशस्वी झाल्याची घोषणा यावेळी शिवसेनेचे मुख्यनेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली. विशेष म्हणजे 6 खासदार धनुष्यबाण चिन्हावर उभे राहतील आणि निवडूनही येतील अशी घोषणाही यावेळी एकनाथ शिंदेंनी केली. 2024 मध्ये ईशान्य मुंबई आणि धाराशिव हे 2 मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आले होते. मात्र शिंदेंच्या घोषणेनंतर हे दोन्ही मतदारसंघ भाजपनं शिवसेनेला सोडलेत का?, असा प्रश्न समोर येत आहे. याचदरम्यान, एक महत्वाची माहिती समोर आली आहे.
ठाकरेंच्या शिवसेनेच्या सहा खासदारांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश झाला. या प्रवेशावेळी हे सहाच्या सहा खासदार 2029 च्या लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हावर शिवसेनेकडून उभे राहतील आणि निवडून येतील असा एक प्रकारे विश्वास आणि आश्वासन शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलं. एकनाथ शिंदेंच्या या पत्रकार परिषदेला वक्तव्यामुळे लोकसभा निवडणूक 2029 मध्ये एक प्रकारेसहाच्या सहा खासदार लोकसभेचे उमेदवार शिवसेनेकडून असतील हे एक प्रकारे आश्वासन देण्यात आलं आहे. या सहा खासदारांपैकी ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil) यांच्या विरोधात भाजपने जागा लढवली होती. या आधी दोन टर्म भाजप पक्षाचे तिथे खासदार किरीट सोमय्या आणि मनोज कोटक होते. 2024 मध्ये सुद्धा संजय दिना पाटील यांच्या विरोधात मिहीर कोटेचा यांनी निवडणूक लढवली होती. त्यामुळे या जागेवर भाजपकडूनसुद्धा महायुतीत 2029 ला भविष्यात दावा सांगितला जाऊ शकतो. (Opration Tiger Shivsena MP)
शिंदे गटात प्रवेश करण्याआधी संजय दिना पाटील यांना आश्वासन- (Sanjay Dina Patil Opration Tiger)
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा ही आपल्यालाच मिळावी. त्या ठिकाणी भाजपच्या उमेदवाराला जागा मिळू नये, हे आश्वासन आपल्याला मिळावं हे आधी संजय दिना पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याच्या आधी घेतला. त्यामुळे येणाऱ्या 2029 च्या लोकसभा निवडणुकीत मतदारसंघ पुनर्रचना विधेयक (delimitation bill ) मंजूर करून लोकसभा मतदारसंघात वाढ केली जाणार आहे आणि त्यामुळेच मतदार संघाची विभागणी होऊन ज्या ठिकाणी भाजप आणि शिवसेना पक्षामध्ये उमेदवारी देण्यावरून पेच निर्माण होईल, त्या ईशान्य मुंबई मतदारसंघाच्या पुनर्रचनेनूसार विचार केला जाणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकारची आश्वासन देऊनच सहा खासदारांना आपल्यासोबत घेतल्याचं सांगितलं जात आहे.
दोन तृतीयांशचा कोरम माझ्या शिवाय पूर्ण होणार नव्हता- संजय दिना पाटील (Sanjay Dina Patil Opration Tiger)
मला ठाकरेसेनेत फक्त एका व्यक्तीची समस्या होती. एका व्यक्तीमुळे हे सगळं झालं आहे. मी तर आधीच बोलत होतो. त्या व्यक्तीला माझ्या घरासमोर येत माफी मागायला सांगा. मी लगेच त्यांच्यासोबत मातोश्रीवर येतो. मात्र, काहीही ऐकलं गेलं नाही. त्यामुळे ही वेळ आज माझ्यावर आली आहे, असं संजय दिना पाटील म्हणाले. दोन तृतीयांशचा कोरम माझ्या शिवाय पूर्ण होणार नव्हता. मी या विषयावर मातोश्रीला भेटून बोललो. मात्र काहीच हालचाल झाली नाही. आयडेंटीटी क्राइसिस असल्यामुळे दुसरं कुणीही मोठं झालेलं यांना चालत नाही. स्टेजवरून शिव्या देण्याच काम करण्यात आलं. 7 वर्षे झाली माझे कार्यकर्ते हे भोगत आहेत, असा आरोपही संजय दिना पाटील यांनी यावेळी केला.
संबंधित बातमी:
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story