PF मधून आज काढले 1 लाख तर निवृत्तीनंतर 11 लाखाचे नुकसान?, एक्सपर्टने समजावले गणित – Marathi News | Withdrawing Rs 1 lakh from your PF today results in a loss of Rs 11 lakh at retirement—see the calculation.


EPFO Investment Tips: नोकरी करणाऱ्या वर्गासाठी ईपीएफ खाते हे भविष्याच्या आर्थिक सुरक्षेसाठी महत्वाचे असते. त्यामुळे जर अचानक कोणताही विचार न करता तुम्ही जर ईपीएफ खात्यातून पैसे काढत असाल तर तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. अनेकांना वाटते की हे केवळ जमलेले पैसे आहेत. मात्र, तुम्हाला माहिती आहे का वास्तविक ईपीएफमध्ये ठेवलेल्या पैशांवर दीर्घकाळात मोठी बचत होत असते.

मनी कंट्रोलच्या बातमीनुसार तज्ज्ञांच्या माहितीनुसार वेळेच्या आधी जर तुम्ही ईपीएफमधून पैसे काढत असाल तर केवळ तुमच्या सध्याच्या बचतीवर याचा परिणाम होत नाही तर त्यातून मिळणा्ऱ्या दीर्घकालीन व्याज आणि चक्रवाढ व्याजावरही परिणाम होतो. ईपीएफमधून काढलेले पैसे निवृत्तीच्या वेळी मिळणाऱ्या फंडाला देखील कमी करु शकते.

EPF का आहे भविष्याची आर्थिक सुरक्षा?

EPF चा हेतू नोकरीतून निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना आर्थिक मदत देणे आहे. यात कर्मचारी आणि कंपनी दोन्हींकडून दर महिन्याला काही रक्कम जमा केली जात असते. ज्यावर सरकारच्या वतीने व्याज देखील मिळत असते.

EPF ची सर्वात मोठी खासियत चक्रवाढ व्याज असते. काळासोबत जमणाऱ्या रकमेवर व्याजही पुढे जाऊ चक्रवाढ व्याज मिळते. त्यामुळे जर तुम्ही दीर्घकाळ पैसे खात्यात जमा करत असाल तर तुमची छोटीशी रक्कम देखील मोठ्या फंडाच्या रुपात बदलू शकते.

छोटी रक्कम काढली तरी मोठे नुकसान ?

जर तुम्ही लग्न, कार खरेदी, पर्यटना आणि अन्य खर्चासाठी ईपीएफमधून पैसे काढले तीर ही तुमची सर्वात मोठी चुक ठरु शकते. कारण ईपीएफमधून रक्कम काढली तर भविष्यात तिच्यापासून मिळणारे व्याज तुम्ही गमावता.

जर तुम्ही नोकरी सुरु केल्यानंतर काहीवर्षांनंतर ईपीएफमधून १ लाख रुपये काढत असाल तर ही रक्कम पुढे वाढत नाही. जर तुमची रक्कम खात्यात राहिली आणि त्यावर सुमारे 8.25 टक्के वार्षिक व्याज मिळते, तर निवृत्तीनंतर ही रक्कम सुमारे 11.78 लाख रुपयांपर्यंत पोहचू शकते.

EPF ला सामान्य बचत खाते समजू नये ?

जर तु्म्ही मोठी रक्कम म्हणजे 5 लाख रुपये EPF काढले तर दीर्घकाळात याचा परिणाम खूप जास्त असू शकतो. अंदाजानुसार रिटायरमेंटनंतर ही रक्कम सुमारे 60 लाख रुपयांपर्यंत कमी आणू शकते.

तज्ज्ञांच्या मते EPF ला सामान्य सेव्हींग्स अकाऊंट सारखा वापर करु नये. गरज पडल्यानंतर खर्च करण्यासाठी वेगळा इमर्जन्सी फंड तयार करावा. म्हणजे मेडिकल इमर्जन्सी वा कोणत्याही गरजेच्या कामासाठी तुमच्या EPF चा वापर करण्याची गरज लागू नये.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *