Vidhan Parishad Election Result 2026 Omraje Nimbalkar: ठाकरे गटाचे फुटीर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी विधान परिषद निवडणुकीत धाराशिव-लातूर मतदारसंघात महाविकास आघाडीला (MVA) दगा दिल्याचे समोर आले आहे. सोमवारी राज्यातील विधानपरिषदेच्या 17 पैकी 11 जागांवरील निवडणुकीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. यामध्ये धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद मतदारसंघातून भाजपचे बसवराज पाटील (Basavraj Patil) यांचा विजयी झाला. तर काँग्रेसच्या महेश देशमुख यांचा पराभव झाला. या निकालावर नजर टाकल्यास याठिकाणी महाविकास आघाडीची मतं फुटल्याचे स्पष्ट होत आहे. ओमराजे निंबाळकर (Omraje Nimbalkar) यांनी रविवारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षात जाण्याची घोषणा केली. मात्र, त्यांचा हा निर्णय अगोदरच ठरला होता. ते शेवटपर्यंत माझ्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी बोलून मी शिंदे गटात जायचे की नाही, हा निर्णय घेईन, असे सांगत होते. मात्र, 18 जूनला झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत ओमराजे निंबाळकर यांनी धाराशिवमधील आपली सर्व मतं भाजपच्या बसवराज पाटील यांच्याकडे वळवल्याचे आता स्पष्ट झाले आहे. (Dharashiv Latur Beed Vidhan Parishad Election Result 2026)
धाराशिव-लातूर- बीड विधान परिषद निवडणुकीत बसवराज पाटील यांना 845 मतं मिळाली आहेत. 14 मतपत्रिका कोऱ्या होत्या. तर 14 मतं बाद ठरली. काँग्रेसच्या महेश देशमुख यांना फक्त 124 मतं मिळाली. त्यामुळे भाजपच्या बसवराज पाटील यांचा 721 मतांनी विजय झाला. हा राज्यातील सर्वाधिक मताधिक्याने झालेला विजय आहे. ओमराजे निंबाळकर यांनी दगाफटका केल्यामुळे या निवडणुकीत मविआची तब्बल 150 मतं फुटल्याचा अंदाज आहे.
विधान परिषदेच्या 17 पैकी 17 जागांचा निकाल- (Vidhan Parishad Election Result 2026 Winner List)
- ठाणे – रवींद्र फाटक – शिवसेना, (बिनविरोध)
- यवतमाळ – दुष्यंत चतुर्वेदी – शिवसेना, (बिनविरोध)
- रायगड – रत्नागिरी – सिंधुदुर्ग – अनिकेत तटकरे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
- पुणे – विक्रम काकडे – राष्ट्रवादी काँग्रेस, (बिनविरोध)
- वर्धा – गडचिरोली – चंद्रपूर – अरुण लखाणी – भाजप, (बिनविरोध)
- अहिल्यानगर – प्राजक्त तनपुरे – भाजप, (बिनविरोध)
- छत्रपती संभाजीनगर-जालना- सुहास शिरसाट- भाजप
- नाशिक– गोकुळ गिते, (अपक्ष) भाजपचे बंडखोर उमेदवार
- भंडारा– गोंदिया– अविनाश ब्राह्मणकर, भाजप
- सांगली– सातारा– धैर्यशील कदम, भाजप
- परभणी– हिंगोली- सईद खान, शिवसेना
- सोलापूर– राजेंद्र राऊत, भाजप
- धाराशिव–लातूर– बीड– बसवराज पाटील, भाजप
- नागपूर– राजीव पोतदार, भाजप
- जळगाव– नंदकिशोर महाजन, भाजप
- अमरावती– प्रवीण पोटे, भाजप
- नांदेड– अमर राजूरकर, भाजप
आणखी वाचा
ओमराजे मला मुलासारखे, ऑपरेशन टायगरमध्ये तानाजी सावंत हेच पडद्यामागचे सूत्रधार, सावंतांची कबुली
Omraje Nimbalkar : रीलस्टार म्हणून माझी हिणवणी करतात, तीन दिवसात नुसत्या चर्चेनं वाईट झालो का?