कोकण विभागातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता आहे. या भागांत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. त्यामुळे हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.काही भागात पावसाने हजेरी लावली असल्यामुळे नागरिकांना उष्णते पासून दिलासा मिळत आहे.
