IND vs SA : स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, राधा यादव…ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धोका दिला, टीम इंडियाच वर्ल्ड कपच स्वप्न भंगणार | क्रीडा बातम्या (Sports News in Marathi)


Last Updated:

टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेने हा सामना 6 विकेट राखून जिंकला आहे.

India W vs  South Africa W
India W vs South Africa W

India W vs South Africa W : वुमेन्स वर्ल्ड कपमध्ये आज साऊथ आफ्रिकेने टीम इंडियाचा 7 विकेट राखून पराभव केला आहे.टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना 158 धावा केल्या होत्या. या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेने हा सामना 6 विकेट राखून जिंकला आहे.

टीम इंडियाने दिलेल्या 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना साऊथ आफ्रिकेची सूरूवात चांगली झाली नव्हती. कारण साऊथ आफ्रिकेची कॅप्टन लॉरो वोल्हार्ट 20 धावांवर बाद झाली. तिच्या पाठोपाठ आनेरी डर्कसन शुन्यावर बाद झाली होती.या दोन्ही विकेट श्री चरणीने एकाच ओव्हरमध्ये घेतल्या आहेत. त्यामुळे इथून टीम इंडिया सहज मॅच जिंकेल असे वाटत होते.

पण मेरीजन कॉपने एकाबाजूने साऊथ आफ्रिकेचा डाव सावरला होता.या दरम्यान श्री चरणीने पुन्हा एकदा नंदीनी डी क्लर्ककला 5 धावा करून बाद केले होते. यानंतर मेरीजन कापने शेवटपर्यंत मैदानात टीकून 81 धावांची नाबाद खेळी केली.तिच्यासोबत क्लो ट्रायन 10 वर नाबाद राहिली होती.अशाप्रकारे साऊथ आफ्रिकेने हे लक्ष्य 19.1 ओव्हरमध्ये पूर्ण करत हा सामना 6 विकेट राखून जिंकला.

हा सामना टीम इंडिया जिंकू शकली असली पण टीम इंडियाकडून काही चूका घडल्या.पहिली चूक म्हणजे स्मृती मानधना चांगल्या लयीत खेळत होती पण रिषभ पंतच्या स्टाईलमध्ये खेळण्याच्या प्रयत्नात ती क्लिनबोल्ड झाली.स्मृती मानधनाने जर चुकीचा शॉर्ट खेळला नसता तर ती टीम इंडियासाठी धावा आणखीण करता आल्या असत्या. तसेच स्मृतीसारखीच दिप्ती शर्मा देखील आऊट झाली. त्यामुळे टीम इंडियाला या दोन विकेट भारी पडल्या.

त्याच्यासोबत टीम इंडियाने आज खूपच खराब फिल्डींग केली. अनेक कॅच ड्रॉप केल्या. ज्या खेळाडूने आज साऊथ आफ्रिकेला सामना जिंकून दिला त्याला मेरीजेन कापच्या टीम इंडियाने तीन कॅच ड्रॉप केल्या. प्रेमा रावतच्या 10 व्या ओव्हरला नंदीनीची कॅच ड्रॉप केली.त्यानंतर श्रीचरणीच्या 13 व्या ओव्हरला राधा यादवने कॅच सोडली त्यानंतर राधाने पुन्हा 17 व्या ओव्हरला कॅच सोडली. या तीनपैकी टीम इंडियाने एक कॅच जरी जिंकली असली तरी टीम इंडिया हा सामना जिंकली असती.

टीम इंडियाची ही वर्ल्ड कपमधली पहिलीच हार आहे. आता टीम इंडियाच वर्ल्ड कपच्या फायनलला पोहोचण्याचा प्रवास खडतर झाला आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/

IND vs SA : स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, राधा यादव…ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच धोका दिला, टीम इंडियाच वर्ल्ड कपच स्वप्न भंगणार



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *